पोस्ट्स

सूर्यग्रहण आणि दानसंस्कृती

इमेज
    २०१९ या वर्षाची अखेर जवळ आली आहे. यावर्षीचं अखेरचं सूर्यग्रहण येत्या २६ डिसेंबरच्या मार्गशीर्ष अमावस्येला होईल. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ६ जानेवारीला तर दुसरे २ जुलैला होते. २६ डिसेंबर रोजीचे हे सूर्यग्रहण भारतासोबतच सौदी अरब, कतार, इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया, सुमात्रा, फिलीपाईन्स, सिंगापूर आणि गुआम इथेही दिसणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येऊन चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते, तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्यासारखे दिसते. सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले, तर ‘खग्रास सूर्यग्रहण’ आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेलेे, तर ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ होते. भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे. खरेतर ग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना. परंतु विज्ञानासह ज्योतिष आणि धार्मिक दृष्टीनेही ग्रहणकाल महत्त्वाचा समजला जातो. सामान्यपणे धार्मिक दृष्ट्या सूर्यग्रहण हे अशुभ मानले जाते. ग्रहणाला अशुभ मानन्यातून, त्यापासून आपल्याला अपाय होऊ...

हातपाटीच्या हातावरील पोट!

इमेज
हातपाटीच्या हातावरील पोट!         दीर्घ श्वास घेऊन शिडशिडीत अंगाचा, कांती रापलेला एक मनुष्य थोड्या उथळ समुद्राचा तळ गाठतो. त्याच्या हातात दोरखंडांनी बांधलेली एक प्लास्टिक फायबरची मजबूत घमेलेवजा पाटी आहे. आपल्या ताकदीच्या बळावर तो समुद्रतळाची वाळू खरवडून घमेले भरतो. पृष्ठभागावर तरंगणाऱ्या मचव्यापासून एक काठी तळापर्यंत सोडलेली आहे. घमेले भरल्याबरोबर तो मनुष्य विशिष्ट प्रकारे काठी वाजवून आपल्या वरच्या साथीदारांना इशारा करतो. इशारा मिळताच मचव्यावरील माणसे वाळूने भरलेले घमेले वर खेचून घेतात. या वाळूसरशी पाण्याखालील व्यक्तीदेखील वर येते; पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेण्यासाठी.... बांधकामासाठी लागणारी रेती हातपाटीच्या साह्याने उपसा करणाऱ्यांची ही कथा. यालाच डुबी पद्धतीने रेती काढणे असेही म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात उरण, पेण, अलिबाग पासून ते अगदी माणगाव, महाड पर्यंतच्या समुद्रकिनारी या पद्धतीने वाळू काढली जाते. केवळ समुद्रच नव्हे तर अगदी खाडी व नदीपात्रातूनही वाळू उपसा होत असतो.         बऱ्यापैकी साठवणक्षमता असलेला मचवा (होडी), पाटी, दोरखंड, बांबू, ...

रयत: शतकानंतरची पहाट

इमेज
रयत: शतकानंतरची पहाट        दिवस होता विजयादशमीचा. एकोणिसशे एकोणिस सालातल्या ऑक्टोबरच्या चार तारखेचा प्रसंग. भाऊराव पायगौंडा पाटील नावाच्या कर्मवीराने कराड तालुक्यातील काले गावात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही घोषणा सर्वसामान्य रयतेला उत्कर्षाची संधी मिळवून देणारी ठरली. ही घोषणा होती रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची. स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात बहुजनांसाठी, ग्रामीण भागातील जनतेला सुशिक्षित करण्याचे काम या संस्थेने केले. स्वत:च्या मालकीची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव 'रयत शिक्षण संस्था' असणे स्वाभाविकच होते. अथांग विस्तारणारा व दीर्घायुष्य लाभलेला वटवृक्ष या संस्थेचे बोधचिन्ह आहे. आजघडीला जवळपास साडेचार लाख विद्यार्थी या वटवृक्षाच्या छायेत अध्ययन करत आहेत. सातशेहून अधिक शाखा आणि सुमारे सोळा हजार कर्मचारी वर्ग यामुळे ही संस्था आशिया खंडात विस्ताराने सर्वात मोठी शिक्षणसंस...

‘अज्ञात’ मराठी वीर दौडले सात

इमेज
‘अज्ञात’ मराठी वीर दौडले सात!      १९१८ सालातल्या नोव्हेंबर महिन्यातला अकरावा दिवस. सकाळी १० वाजून ५९ मिनिटे झाली असताना एक अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. त्याच्या मृत्यूनंतर  मिनिटाभरातच सर्व युरोपभर युद्ध बंदी लागू झाली. सव्वा चार वर्षे अविरत चाललेले हे विनाशकारी युद्ध संपले. युरोपमधील चर्चमधून घंटानाद करून ही बातमी जनतेला कळवली गेली. गेली दोन वर्षे बंद असलेल्या लंडनच्या प्रसिद्ध बिग बेन या घड्याळाने सकाळी ११.०० वाजता पुन्हा एकदा टोल दिले. सर्व युरोपभर शांतता पसरली; अर्थातच काही काळापुरती. हा घटनाक्रम आहे पहिल्या महायुद्धाचा. या महायुद्धात एकूण २४ लहान मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला. अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडातील कुठला न कुठला देश ह्या युद्धात सामील होता. युद्ध संपे पर्यंत ह्यात दोन्ही बाजूचे मिळून साधारणपणे दीड कोटीहून अधिक लोक मरण पावले तर त्याहून अधिक लोक जखमी झाले. शंभर वर्षापूर्वीचा काळ पाहता ही आकडेवारी भीषण आहे. पहिल्या महायुद्धाचा खर्च तब्बल ३३८ अब्ज डॉलर्स झाला. तोही १९१८ मध्ये. २०१९ मध्ये हा खर्च काढायचा झाल्यास किती हो...

दिन दिन दिवाळी!

इमेज
दिवाळीवर प्रभाव कृषी संस्कृतीचा! ( मुंबई सकाळ, रायगड टुडे 26 ऑक्टोबर 2019 )        आपल्या संस्कृतीला ‘सण-कृती’ म्हणावे लागेल इतक्या मोठ्या संख्येने विविध प्रकारचे सण, उत्सव शहरी आणि ग्रामीण भागात सातत्याने साजरे होत असतात. कधी आवड आहे म्हणून, तर कधी सवड आहे म्हणून आपला समाज रोजची चाकोरी सोडून या सणांमध्ये सहभागी होत असतो. दिवाळी देखील या सणांपैकीच एक. सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणावर रायगडच्या ग्रामीण भागात मात्र इथल्या कृषिसंस्कृतीचा मोठा प्रभाव जाणवतो. मुलांच्या  हातात फुलबाजी आली की ती गोलगोल फिरवत ‘दिन दिन दिवाळी’ हे गाणे आपसूकच तोंडावर येते. “दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी...”  परंपरेने चालत आलेले हे गाणे ग्रामीण कृषीसंस्कृतीतील आहे. रायगड जिल्ह्यात पूर्वी गावाकडे घराघरातले गोवारी म्हणजेच गुराखी आपापली गुरे-ढोरे घेऊन रानात जायचे. तिथे त्या गुरांना वाघ, बिबटे यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे...

पाचवीला पुजलेली सटी

इमेज
सटीचा लेखाजोखा       आतल्या खोलीतून नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाहेरच्या बाजूला मात्र काही साहित्याची जमवाजमव चाललीय. ‘मालटा’ नावाने ओळखला जाणारा दगडी दिवा, जाते, पाटा-वरवंटा अशा दगडी साहीत्याची यादी केली जातेय. कधीकाळी नेहमीच्या वापरात असलेल्या या वस्तू,  पण सध्याच्या काळात मिळवणे दगडासारखेच कठीण झाल्यासारख्या. ही सर्व जमवाजमव चालली आहे ती जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये, त्याला चांगले आयुष्य व आरोग्य लाभावे या हेतूने केल्या जाणाऱ्या पाचवीची. सहसा मुलीकडे होणारा हा विधी. संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार साम्य-भेदाने होत असलेला हा विधी पश्चिम किनारपट्टीवरील रायगड परिसरातही होताना दिसतो.     या विधीवेळी लहान बाळाला वस्त्रांशिवाय निंगडीच्या म्हणजेच निरगुडीच्या पानांवर झोपवले जाते. या पानांवरून उचलण्याचा मान आत्याचा असतो. निरगुडी ही वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मानले जाते. पाचवीच्या या विधीमध्ये एका सुपात तांदळावर कलश ठेवतात. त्यावर नारळ ठेवून केळीच्या पानाचा लहानसा भाग उभा केला जातो. समोर पानाचे पा...

शिव गौरा

इमेज
       उरणच्या दक्षिणपूर्व विभागाला तालुका ठिकाणापासून विलग करणाऱ्या खाडीकिनारी वसलेले खोपटे हे विस्ताराने मोठे गाव.  सात पाड्यांनी मिळून बनलेल्या या गावात इतरांसारखाच गणेशोत्सव साजरा होतोच, पण त्याच जोडीला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव इथले गावकरी साजरा करतात. तोही तब्बल आठ दशकांपासून! पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. शिव आणि शक्तीतील वर्चस्ववादाचे प्रतिक असणारे कलगी-तुऱ्याचे जंगी सामने आणि पारंपरिक नृत्य हे या विविधरंगी कार्यक्रमांचे वैशिष्ट्य. संपूर्ण महाराष्ट्र भाद्रपद महीन्यात गौरी-गणपतींची प्रतिष्ठापना करत असताना खोपटे गावातील शिवगौरा उत्सव मंडळ एकप्रकारे शिवोत्सवच साजरा करतात. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी गावातील पाटील पाड्यात थेट भगवान शंकर सुंदर आरास असलेल्या जागेत विराजमान होतात. भाद्रपद शुक्ल द्वादशीला गौराविसर्जन होते. शाडूच्या मातीपासून बनलेल्या ‘गौरा’ म्हणजेच शिवमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. शिवमूर्तीची निर्मिती आणि पूजन हे याच परिसरापुरते होते की आणखी कुठे?  सहसा प्रतिक रुपात होत असलेले शि...

चुलीवरचे जेवण!

इमेज
  चुलीवरचे  जेवण! (मुंबई सकाळ, रायगड टुडे 23 ऑगस्ट 2019) महामार्गावरून सुस्साट गाडी निघालीय. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली. प्रवाशांच्या पोटात कावळे ओरडण्याची स्थिती. पोटातली भूक डोळ्यांवर स्वार होऊन हे प्रवासी रस्त्याच्या कडेचे फलक अधाशीपणे वाचू लागलेत.  हॉटेल, ढाबा, खाणावळी या अपेक्षीत नावांच्या रांगेत आणखी एक फलक लक्ष वेधून घेतो. ते विशिष्ट नाव वाचून आपसूकच गाडीचा वेग कमी होऊन, चाके त्या शब्दांच्या दिशेने वळली जातात.  पोटातली भूकेची अाग अधिकच उसळवणारे ते शब्द असतात, “चुलीवरचे अस्सल गावरान जेवण”. सध्याच्या काळात चलती असणारा म्हणजेच ‘ट्रेंड’मध्ये असणारा हा प्रकार.         तसे पाहता ‘चुलीवरचे जेवण’ हा प्रकार आपल्याला नविन नाही. रायगड जिल्ह्यातील कोणतेही गाव घ्या, गावात चूल नाही असे गाव शोधूनही सापडत नव्हते. ‘घरोघरी मातीच्या चुली” ही म्हण सत्यात उतरवणारा हा परिसर. इथे अग्नीदेवाच्या आग्नेय स्थानाला इतर काही असेल नसेल, पण चूल होतीच. काही घरांमध्ये तर दोन-दोन चुली असायच्या. दोन्ही चुलींचे कार्य आणि ध्येय वेगवेगळे. यातील एक चूल शक्यतो आं...

मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते

इमेज
मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते! ( कोकण मराठी साहीत्य परिषद आयोजित निबंध स्पर्धेत, शिक्षक गट प्रथम क्रमांक)        जगभरात सुमारे सहा हजार भाषा बोलल्या जातात. यातील  कित्येक भाषा प्रतिवर्षी मरण पावतात. वाचायला थोडे चमत्कारिक वाटेल पण हे खरे आहे; भाषांचाही मृत्यू होतो. विशिष्ट भाषा वापरणाऱ्यांचे प्रमाण शून्यावर येणे, व्यवहारातून  वापर नाहीसा होणे म्हणजेच भाषेचे मरण. त्याचबरोबर कित्येक भाषांमध्ये लक्षणीय बदल घडत असतात. सर्वाधिक भाषिक लोकसंख्येच्या यादीत मराठी भाषेचा एकोणिसावा क्रमांक लागतो. जगभरातील अकरा कोटीहून अधिक लोक मराठी भाषेचा वापर करतात. ही भाषा बोलणारे लोक (जागतिक स्तरावर)  ७२ देशांमध्ये पसरलेले आहेत.भारतातल्या ३५ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत मराठी भाषिक लोक महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. त्यामुळे ती केवळ एखाद्या प्रांताची भाषा न राहता, राष्ट्रीय भाषा ठरते. संविधानाने मान्य केलेल्या २२ राजभाषांपैकी मराठी ही एक राजभाषा आहे. शिलाहार, यादव काळातील कित्येक शिलालेख, ताम्रपटांवर संस्कृतसह मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे. शिवकाळात इंग्...

भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!

इमेज
भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!     भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात खरिपात म्हणजेच पावसाळी हंगामात प्रामुख्याने भातशेती होते. जिल्ह्यात लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होते, यंदाही होण्याची शक्यता आहे. या वर्षी जून महिन्याच्या पहील्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मध्यंतरी फोनच्या नेटवर्कप्रमाणे अचानक गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. या पावासामुळे लावणीच्या हंगामाला सुरूवात होईल; काही भागात भात लावणीला प्रारंभदेखील झाला आहे. योग्य वातावरणाचा फायदा घेत सर्वत्र भात लावणी होत असली, तरी काही गावांमध्ये मात्र लावणी सुरू होण्यासाठी विशिष्ट दिवसाची वाट पहावी लागते. संपूर्ण गावात ‘तो’ विशिष्ट दिवस आल्याशिवाय लावणी करायची नाही असे संकेत आहेत. आधुनिक काळात असे खरेच कुठे घडते का?      मुंबई-गोवा महामार्गालगत पेण तालुक्यातील जिते नावाचे एक सर्वसामान्य गाव. या गावात जुलै महीन्याच्या पहील्या आठवड्यात एक जत्रा संपन्न झाली. महाराष्ट्रातील विविध जत्रांचा हंगाम कधीचाच संपून गेला असताना, भर पावसात ही कसली जत्रा भरते याचेच...