पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

करक : मातीच्या गडव्यात साठलेली संस्कृती

इमेज
 हिंदी चित्रपटातला एखादा प्रेमाचा प्रसंग आठवा. सजलेली नायिका, हातात पूजेचं ताट, आकाशात चंद्राची प्रतीक्षा आणि चाळणीतून पतीचा चेहरा पाहण्याचा तो खास क्षण! करवा चौथ म्हटलं की बॉलिवूडने आपल्या डोळ्यांसमोर उभी केलेली हीच दृश्यं आठवतात. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या चित्रपटांनी या व्रताला लोकप्रिय संस्कृतीत एक खास स्थान दिलं. महाराष्ट्रात करवा चौथची परंपरा पूर्वी फारशी प्रचलित नसली, तरी हिंदी चित्रपटांमुळे या सणाची ओळख अनेक घरांपर्यंत पोहोचली. चित्रपटात दिसणाऱ्या झगमगाटामागे मात्र एक साधं, मातीचं पात्र असतं. करक किंवा करवा! दिसायला एखाद्या लहानशा गडव्यासारखं असलेलं हे भांडं केवळ पाणी साठवण्यासाठी नसतं. त्याला श्रद्धेची जोड असते, नात्यांची ऊब असते आणि मानवी संस्कृतीच्या इतिहासाशी जोडलेली एक रंजक गोष्टही असते.  उत्तर भारतात करवा चौथचा उपवास विवाहित महिलांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो. या व्रताला करक चतुर्थी असंही म्हटलं जातं. पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या करकाला काही भागांत करवा म्हणतात. मातीपासून तयार केलेल्या या पात्रात पाणी भरलं जातं. त्याला रंगवून, न...

मोरपिशी

इमेज
  मोरपिशी  आज, २२ ऑक्टोबर. अमेरिकेत हा दिवस नॅशनल कलर डे म्हणून साजरा केला जातो. रंगांच्या दुनियेत रमण्याचं माणसाला भारी वेड! नुकतीच नवरात्र संपली. नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालून अनेकांनी उत्सवाचा आनंद घेतला. सोशल मीडियावर रंगीबेरंगी छायाचित्रांची रेलचेल होती.  लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, जांभळा... प्रत्येक रंगाचा आपला थाट! याच रंगांच्या यादीत एक दिवस ‘मोरपिशी’ रंगाचाही होता. नाव ऐकताच डोळ्यांसमोर मोराचा देखणा पिसारा उभा राहतो. पण ज्याला आपण मोरपिशी रंग म्हणतो तसा मोरपिसांचा रंगचं नसतो. “खरं तर मोरपिसाचा मूळ रंग तांबूस किंवा तपकिरी असतो!” पण मग आपल्या डोळ्यांना सुखावणारा मोरपिशी रंग येतो कुठून?  पावसाळ्यात रस्त्यावरच्या एखाद्या खड्ड्यात पेट्रोल किंवा तेलाचा पातळ तवंग पसरलेला दिसतो. (अलीकडे असे खड्डे सहज पाहायला मिळतात!) त्यावर निळे, हिरवे, जांभळे, पिवळसर रंग चमकू लागतात. जणू इंद्रधनुष्याचा एक तुकडाच पाण्यावर उतरला आहे! हे रंग तेलात कुणी मिसळलेले नसतात. सूर्यप्रकाश तेलाच्या पातळ थरावर पडतो, तेव्हा त्यातील काही प्रकाशकिरण परत आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात. तेलाच्या थराची जाडी आणि ...

दोन हातांची दुर्गा

इमेज
  दोन हातांची दुर्गा        नवरात्रात देवीची मूर्ती पाहताना सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ते तिचे अनेक हात. प्रत्येक हातात वेगळे आयुध, वेगळी जबाबदारी आणि वेगळी शक्ती. कुठे त्रिशूळ, कुठे चक्र, कुठे तलवार, तर कुठे कमळ! देवीच्या या अनेक हातांतून तिच्या सामर्थ्याची कल्पना केली जाते. पण आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर एक वेगळंच दृश्य दिसतं. ग्रामीण महिलेच्या हातात ना त्रिशूळ असतो, ना चक्र. असतात फक्त दोन हात. आणि त्या दोन हातांनी ती दिवसभरात एवढी कामं करते की, देवीचे अनेक हातही कमी पडावेत!          १५ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन. ग्रामीण महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्याचा हा दिवस. भारतासारख्या कृषिप्रधान देशात या दिवसाचं महत्त्व अधिक आहे. कारण शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर ग्रामीण महिलेचे हात लागलेले असतात. पेरणीपूर्वीची तयारी, रोपांची लागवड, तण काढणे, कापणी, धान्याची स्वच्छता आणि साठवणूक, जनावरांची देखभाल अशी कामांची मोठी यादी तिच्या दिवसात असते. शेतातून परतल्यानंतरही तिचा दिवस संपत नाही. स्वयंपाक...

देवतांच्या सोबतीला आलेले वन्यजीव

इमेज
    आज वन्यजीव सप्ताहाचा अखेरचा दिवस. वन्यजीव सप्ताह म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर जंगल उभं राहतं. वाघ, बिबट्या, हत्ती, अस्वल, गरुड, मोर... पण एखाद्या जुन्या मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा सभामंडपात जाऊन देवतेच्या हाताकडे, पायाशी किंवा मुकुटाकडे जरा बारकाईने पाहिलं, तर जंगलाची एक वेगळीच दुनिया तिथे सापडते. वाघ, सिंह, हत्ती, वानर यांसारख्या परिचित प्राण्यांबरोबरच मुंगूस, गोधा, विंचू, मेष आणि हरिण यांसारखे जीवही देवतांच्या प्रतिमेत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. गंमत अशी की हे प्राणी आपल्याला ओळखीचे असले, तरी त्यांच्या मूर्तिशास्त्रीय अर्थाकडे आपलं लक्ष क्वचितच जातं.  कुबेराच्या हातातील मुंगूस, गौरीसोबतची गोधा, चामुंडेच्या पोटावरचा विंचू, अग्निदेवाचा मेष आणि शिवाच्या हातातील चपळ हरिण! जंगलात स्वतंत्रपणे जगणारे हे जीव मंदिरात पोहोचले आणि प्रत्येकाला एक नवा अर्थ मिळाला. काही देवतांची वाहनं झाले, काही हातातील आयुधासारखे प्रतीक झाले, तर काहींनी देवतेच्या गुणधर्माचीच आठवण करून दिली. म्हणजे भारतीय मूर्तिशास्त्रात प्राणी केवळ सजावटीसाठी आले नाहीत; ते स्वतःची एक प्रतीकात्मक भाषा घेऊन आले...