Search This Blog

Wednesday, June 20, 2018

मना गवना इरला (आगरी काव्य)


मना गवंना इरला
[आगरी 'पावसाला']

या मावलतीचे बाजूशी
वारा जोशानं फिरला,
धांदल उरली माझी
मना गवंना इरला.

कसा सांजचे वख्ताला
आभ पान्यानी भरला,
कावट आली तरी
मना गवंना इरला.

पयले पान्याचा जोर
माझे अंगान जिरला,
वलाधीन झालू तरी
मना गवंना इरला.

असा दरसालाचा पावना
आला वस्तीला -हावाला,
आल्या सतीर, कोठ्या डोईवरी
आमी इसारलो इरला.

-तुषार म्हात्रे

Saturday, June 9, 2018

उधवानीची चिवणी (आगरी काव्य)

उधवानीची चिवणी

(दैनिक कर्नाळा, 9 जून 2018)

उधवानीची चिवनी
(आगरी काव्य)

उभधाय यो पानी म्हनून,
खाजना मी जेलो;
कांडी बुरलेली शेता बघून,
मनानशीच मेलो.

नवा इनलेला पाग घेवून,
बांधावरती चऱ्हलो;
पाग तलीन न मी चालीन,
असा आरवा तिरवा परलो.

“पाग सलामत तं चिवनी पचास”,
बोलून कसातरी उठलो;
आखंदन गवं नाय म्हनून,
खोशीकरं पलत सुटलो.

उघरीवरती आसू मांडून,
म्होटे आशंन मी बसलो;
वावासंगती वाव्हून जेलो,
नं दुसरे दारान फसलो.

पाग फाटला आसू मोरली,
खाज माझी निवली; 
खाली डोबुकरी घरा हानून,
फाटकी आसू शिवली;

परत उधवानीला जावाचू नाय, 
बोलून बाववालीकरं जेलो;
शंभरची पाच चिवनी,
मुकाट्यान घेऊन आलो

तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...