Search This Blog

Saturday, June 9, 2018

उधवानीची चिवणी (आगरी काव्य)

उधवानीची चिवणी

(दैनिक कर्नाळा, 9 जून 2018)

उधवानीची चिवनी
(आगरी काव्य)

उभधाय यो पानी म्हनून,
खाजना मी जेलो;
कांडी बुरलेली शेता बघून,
मनानशीच मेलो.

नवा इनलेला पाग घेवून,
बांधावरती चऱ्हलो;
पाग तलीन न मी चालीन,
असा आरवा तिरवा परलो.

“पाग सलामत तं चिवनी पचास”,
बोलून कसातरी उठलो;
आखंदन गवं नाय म्हनून,
खोशीकरं पलत सुटलो.

उघरीवरती आसू मांडून,
म्होटे आशंन मी बसलो;
वावासंगती वाव्हून जेलो,
नं दुसरे दारान फसलो.

पाग फाटला आसू मोरली,
खाज माझी निवली; 
खाली डोबुकरी घरा हानून,
फाटकी आसू शिवली;

परत उधवानीला जावाचू नाय, 
बोलून बाववालीकरं जेलो;
शंभरची पाच चिवनी,
मुकाट्यान घेऊन आलो

तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...