पोस्ट्स

इतिहास लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गंगावतरण आणि गंगाधर शिव

इमेज
गंगावतरण आणि गंगाधर शिव        आपली संस्कृती किती गूढ, किती भावपूर्ण आहे, हे गंगेच्या स्मरणातून सहज उमजतं. गंगा ही केवळ एक नदी नाही, तर ती स्मृती आहे, ती श्रद्धा आहे, आणि ती जीवनाच्या अखंड प्रवाहाची साक्ष आहे. म्हणूनच गंगासप्तमीसारखी तिथी आपल्या आयुष्यात येते आणि आपल्याला त्या पवित्र प्रवाहाशी पुन्हा एकदा जोडून जाते.    पौराणिक कथांमध्ये सांगितलेला गंगावतरणाचा प्रसंग केवळ ऐकण्यापुरता नाही, तर तो आपल्या कलेत, शिल्पात आणि संस्कृतीत जिवंत आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या समुद्राच्या कुशीत वसलेल्या घारापुरीच्या लेण्यांमध्ये हा प्रसंग अक्षरशः दगडात गोठवलेला दिसतो. येथे उभी असलेली गंगाधर शिवमूर्ती म्हणजे एक शिल्प नसून एक संपूर्ण कथा आहे, एक भावविश्व आहे.  या शिल्पात सुमारे पाच मीटर उंच असलेले शिव आणि त्यांच्या शेजारी उभी असलेली पार्वती, या दोघांच्या मध्यभागी गंगेचा अवतरणाचा क्षण पकडलेला आहे. गंगेचा प्रचंड वेग पृथ्वी सहन करू शकणार नाही, म्हणून तिला आपल्या जटांमध्ये धारण करणारा शिव; ही कल्पना जितकी विराट, तितकीच नाजूकपणे शिल्पकाराने व्यक्त केली आहे. शिवाच्या जटां...

बेलापूरचा किल्ला: मराठ्यांच्या सागरी पाऊलखुणा

इमेज
समुद्र म्हणजे विशालतेचं प्रतीक. लाटांच्या ओघात वाहणारी शांतता आणि आत दडलेली ताकद दोन्ही एकाचवेळी जाणवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या समुद्राची ताकद ओळखली आणि किनाऱ्याच्या प्रत्येक वळणावर आपले अस्तित्व उमटवले. मराठा साम्राज्य केवळ डोंगरदऱ्यांमध्ये नव्हे, तर लाटांवरही उभं राहावं, हे त्यांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या साक्षीदारांपैकी एक आहे... बेलापूरचा किल्ला. शिवाजी महाराजांनी थेट बेलापूर किल्ला जिंकला नसला तरी, त्यांनी उभारलेल्या आरमाराच्या आणि स्वराज्याच्या विस्ताराच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, हे महत्त्वाचे आहे. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला, पनवेल खाडीच्या किनारी वसलेलं बेलापूर हे गाव एकेकाळी सागरी व्यापाराचं केंद्र होतं. या खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आक्रमणांना रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी इ.स. १५६० च्या सुमारास हा किल्ला उभारला. तो काळ समुद्रावर वर्चस्व गाजवणाऱ्यांचा होता. अरब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज या सगळ्यांनी सागराच्या किनाऱ्याकडे लोभाने पाहिलं. परंतु नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने या समुद्राला स्वराज्याच्या सीमेचा भाग बनवलं. शिवर...

सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा

इमेज
सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा ठाण्याच्या गर्दीतून थोडं बाजूला वळलं की शहराचं रूप शांत होतं. सिग्नल आणि ट्रॅफिक मागे टाकत सिद्धेश्वर तलावाजवळ पोहोचलं की, वातावरणात एक वेगळी निवांतता जाणवते. त्या तलावालगत असलेलं सिद्धेश्वर राम मंदिर दिसतं आणि मंदिराच्या एका काचेच्या पेटीत एक दुर्मिळ शिल्प उभं आहे, चतुर्मुख ब्रह्मदेवाचं. १९९५ मध्ये हे शिल्प सिद्धेश्वर तलावाजवळ सापडलं. साधारण आठव्या शतकातील ही मूर्ती शिलाहारकालीन कलाशैलीचा उत्तम नमुना मानली जाते. शिल्पाची उंची साधारण साडेचार फूट असून ते काळ्या दगडात कोरलेले आहे. समोर तीन आणि मागे एक अशी ही चतुर्मुख मूर्ती आज भग्न अवस्थेत असली, तरी तिच्या प्रत्येक रेषेत त्या काळातील कलाकौशल्य जाणवतं. मूर्तीचं चेहरं शांत आणि गंभीर आहे. तीन मुखांतील प्रत्येक भाव वेगळा. एक ज्ञानमग्न, एक स्मितहास्यपूर्ण आणि एक स्थिर. पाठीमागे कोरलेलं चौथं मुख थोडं झिजलेलं आहे, पण त्या झिजेतूनही काळाचा ठसा उमटलेला जाणवतो. शिरावर कोरलेला जटा-मुकुट, कपाळावर रेषा, आणि अंगावरील अलंकार या सर्व गोष्टींमध्ये शिलाहारकालीन दगडी शिल्पकलेची मृदु लय स्पष्ट दिसते. पायाजवळ कोरलेले हंस...

वीरगळांचे कोडे

इमेज
  वीरगळांचे कोडे .            २९ जानेवारी, भारतीय कोडे दिन! शब्दांच्या खेळातून विचारांना दिशा देणारा, आणि प्रश्न विचारण्याची कला साजरी करणारा हा दिवस. शाळांमध्ये मुलं कोडी सोडवतात, हसतात, विचार करतात, आणि नकळत एक मोठं शिक्षण घेतात. ‘प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजेच जगण्याची कला शिकणं.’ आपल्या संस्कृतीत कोड्यांचा उगम खूप जुना आहे. संत ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी, अगदी लोककवितांमधील स्त्रियांनीही कोड्यांच्या माध्यमातून गूढ विचार मांडले. कोड्याचं सौंदर्य हे असतं की ते उलगडलं की आनंद मिळतो, आणि न उलगडलं तरी विचार मिळतो.      पण आज मी एका वेगळ्या कोड्याबद्दल बोलू इच्छितो, दगडात कोरलेल्या कोड्याबद्दल. नवी मुंबईलगतच्या परिसरात तळोजा, उरण, पिरकोन, दिघोडे, पुनाडे आणि आवरे या गावांमध्ये काही शांत, उभट शिळा दिसतात. गावाच्या वेशीजवळ, एखाद्या मंदिराच्या कोपऱ्यात किंवा झाडांच्या सावलीत त्या उभ्या असतात. कोणाचं लक्ष नसलेली ही शिळा म्हणजेच वीरगळ. दगडावर कोरलेले योद्ध्यांचे आकृतीबंध, धनुष्य, तलवारी, घोडे आणि आकाशात कोरलेला सूर्य–चंद्र यांच...

पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला

इमेज
पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला  डोंगर माणसाच्या आयुष्यात केवळ भौगोलिक रचना नसतात; ते त्याच्या संस्कृतीचे, श्रद्धेचे आणि संघर्षाचे साक्षीदार असतात. प्रत्येक डोंगराच्या कड्यावर, प्रत्येक दरीत एखादी कथा दडलेली असते, कधी रणाची, कधी अध्यात्माची, तर कधी निसर्गाशी एकरूप झालेल्या मानवी अस्तित्वाची. अशा असंख्य डोंगरांपैकी रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी पर्वत एक वेगळीच ओळख ठेवतो. ११ डिसेंबरला साजरा होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या निमित्ताने या पर्वताचा मागोवा घेतला, तर तो केवळ भूगोल नव्हे तर इतिहास, पर्यावरण आणि जैवविविधतेची एकत्रित कहाणी उलगडतो. उरणजवळ समुद्राच्या सान्निध्यात उभा असलेला हा द्रोणागिरी पर्वत समुद्रकाठच्या वाऱ्याशी संवाद साधत उभा आहे. सकाळच्या सूर्यकिरणांत न्हालेला हा किल्ला पाहताना एखाद्या जुन्या योद्ध्याची छबी डोळ्यांसमोर उभी राहते. एकेकाळी यादव, पोर्तुगीज, आदिलशाही आणि अखेर मानाजी आंग्रे यांच्या हातून गेलेल्या या किल्ल्याने असंख्य संघर्ष पाहिले आहेत. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे तीन चर्च उभारली होती; त्यांच्या अवशेषांत आजही त्या काळाचे प्रतिध्वनी ऐकू येतात. पण द्र...

सतीशिळा ते सतीबंदी

इमेज
  सतीशिळा ते सतीबंदी       सह्याद्रीच्या परिसरात भटकताना एखादा कोरलेला दगड दिसतो—त्यावर हाताचा ठसा, बांगड्यांची वलये, काही आकृत्या, शिलालेखांचे तुटलेले ओळी. हे केवळ दगड नसतात, तर काळाच्या ओघात गहाळ झालेल्या कथा असतात. अशा दगडांना लोक ‘सतीशिळा’ म्हणतात. पतीच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ तिच्या कुटुंबीयांनी किंवा गावकऱ्यांनी उभारलेली ही स्मारकशिळा म्हणजे सतीच्या ‘सहगमन’ प्रथेची निःशब्द साक्ष आहे.   सतीशिळा हा फक्त दगड नाही; तो एका काळाचा, एका समाजाचा आरसा आहे. मध्ययुगीन काळात सती प्रथा व्यापक होती. समाजाने त्याला धर्मरूप दिलं होतं, आणि या प्रथेमुळे असंख्य स्त्रिया जिवंत जळल्या. त्यांच्या स्मरणार्थ उभारल्या गेलेल्या शिळा—त्या स्त्रीच्या सन्मानासह , तिच्या बलिदानाची अभिव्यक्ती बनल्या. या शिळांचा अभ्यास केवळ ऐतिहासिक नव्हे तर मूर्तिशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. सतीशिळांवर कोरलेल्या प्रतिमांमध्ये एक विशिष्ट रचना आणि प्रतीकात्मकता दिसते. बहुतेक शिळांवर सती स्त्रीचा उजवा हात उंचावलेला दाखवतात—हा हात ‘आशीर्वाद’ किंवा ‘सन्मान’ या...

विजयाची घंटा!

इमेज
विजयाची घंटा!     रायगड जिल्ह्यातील सरसगडाच्या पायथ्याशी असलेले अष्टविनायकांपैकी एक देवस्थान म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर.  येथून जवळच्या सुधागडावरील एक श्रद्धास्थान भोराईदेवी.  अलिबागजवळील प्राचिन कनकेश्वर आणि श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर; रायगड जिल्ह्यातील ही सर्व सुप्रसिद्ध श्रीक्षेत्रे. यापैकी पाली, हरिहरेश्वर आणि कनकेश्वर ही क्षेत्रे तशी नेहमीच भक्तांनी गजबजलेली. गणेश, शिव, हरिहर आणि शक्ती यांसारखी उपास्य देवतांमध्ये विविधता असणाऱ्या ही स्थाने. या चार वेगवेगळ्या देवस्थानांची एकत्रितपणे चर्चा करण्यासारखे काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे, जी या मंदिरांना एका समान धाग्याने जोडते? या सर्व क्षेत्रांतील समान गोष्ट म्हणजे या मंदिरांतील घंटा! “आगमनार्थ तु देवानां, गमनार्थ तु राक्षसाम। कुरू घंटे रवं तत्र देवताहा न लक्षणम।।” अर्थात ‘हे घंटे, देवतांच्या आगमनासाठी आणि असुरांना पळवून लावण्यासाठी, तू देवतांना पुकारणारा नाद कर!’ असे घंटेच्या बाबतीत म्हटले जाते. घंटा ही हिंदू, जैन, ख्रिश्चन या धर्मात  विशेष महत्त्व असणारी वस्तू.  सर्वसाधारणपणे मंदिरांच्या प्रवेशद्वार...

मिशीवाले मारूती

इमेज
मिशीवाले मारूती ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥'        पुराणकाळांत वर्णन केलेले हे सात चिरंजीव. हनुमंत अर्थात मारूतीराया यांपैकीच एक. यातील उर्वरीत चिरंजीवांचे ठाऊक नाही, पण हनुमंत मात्र मूर्तीरुपाने तरी चिरंजीवच झाल्यासारखा आहे. कारण भारतातील कित्येक गावांत मंदिरांमध्ये, गावाच्या वेशीवर अथवा एखाद्या पिंपळाखाली शेंदुर फासलेला, रंगरंगोटी केलेला मारुती आढळतो. दास्यभक्ती करणाऱ्यांसाठी आचार्य, मल्लांसाठी उपास्य देव, तंत्रमार्गातील दैवत आणि भूत-प्रेत-पिशाच्च बाधेपासून सोडविणारा  अशा अनेक रूपात मारुती प्रसिद्ध आहे. सुमारे साडे तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी हनुमंत उपासनेला चांगलाच उजाळा दिला, त्याचप्रमाणे उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदास यांनीही मारुती भक्तीचा भरपूर प्रचार केला. पुराणांच्या मते मारुतीच्या पित्याचे नाव केशरी व आईचे अंजनी आहे. अकराव्या रुद्राने मारुतीच्या रूपात अंजनीच्या पोटी अवतार घेतल्याचे मानले जाते. काहीवेळेस तो ‘पवनपुत्र’ म्हणूनही ओळखला जातो. पुढे हा प्रबल पराक्रमी आणि महा...

शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा

इमेज
शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा     मुंबईच्या उत्तरेला पश्चिम रेल्वे मार्गावरील एक गजबजलेले उपनगर म्हणजे नालासोपारा. भारताच्या जवळपास सर्व राज्यांतील (काही परराष्ट्रातील सुद्धा) माणसे इथे आढळू शकतील इतकी विविधता इथल्या लोकसंख्येत आहे. खरे तर नाळा आणि सोपारा अशी दोन स्वतंत्र गावे इथे आहेत. एका मान्यतेनुसार ही मूळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी. याचे प्राचीन नाव शूर्पारक. कोणे एके काळी हे शहर एक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर आणि कोकण प्रांताच्या राजधानीचं शहर म्हणून वैभवाने भरलेलं होते.  स्वत: गौतमबुद्धांनी या परिसराला भेट दिली असंही सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायाची बाजारपेठ म्हणून शूर्पारक बंदर जगप्रसिद्ध होते. इथून परदेशात मोठा व्यापार चालत असे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत शूर्पारक नगरी कोकण प्रांताची राजधानी होती. सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हे बुद्धगयेहून आणलेली महाबोधी वृक्षाची फांदी घेऊन याच बंदरातून श्रीलंकेला गेले होते. त्यानंतरच जगभर बौद्धधर्माचा प्रसार सुुरु झाला. या प्राचीन नग...