पोस्ट्स

दरिया किनारे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया

इमेज
  वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया समुद्रावरून अलिबागच्या थळ जेटीकडून होडी निघते आणि थोड्याच वेळात उंदेरीला वळसा घालून खांदेरीच्या जवळ येऊ लागतो. दूरून दिसणारा दीपगृहाचा मनोरा, भोवती पसरलेले खडक, आणि लाटांवर डोलणारं बेट. किल्ल्यावर पाय ठेवताच जाणवतं, ही जागा फक्त पाहण्याची नाही, तर अनुभवण्याची आहे. खाऱ्या वाऱ्यात भूतकाळ मिसळलेला आहे. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारे हे खांदेरी बेट.     किल्ल्याच्या एका टोकाला, खडकांच्या आडोशाला वेताळदेवाचं मंदिर उभं आहे.  साधं, लहानसं देवस्थान. आत शिरल्यावर गोंगाट मागे राहतो आणि एक शांत थर मनात बसतो. मंदिरात टांगलेल्या काही घंटा दिसतात. त्यातली एक घंटा मात्र लगेच लक्ष वेधून घेते. आकाराने मोठी, धातूवर काळाचे ठसे. हात लावला की तिचा थंड स्पर्श जाणवतो आणि मग नजरेला तिच्यावरची अक्षरं दिसतात -  EMPRESS OF INDIA 1891 क्षणभर थांबावं लागतं. ही घंटा इथे कशी आली असेल ही साधी देवळातील वस्तू नाही. ती एका मोठ्या  जहाजाची घंटा आहे. एम्प्रेस ऑफ इंडिया नावाचं जहाज. १८९१ साली इंग्लंडमध...

खाडी आणि अडकलेली होडी

इमेज
खाडी आणि अडकलेली होडी सकाळची वेळ होती. पेण तालुक्यातल्या दादर गावात पोहोचलो तेव्हा गाव अजून पूर्णपणे जागं झालेलं नव्हतं. एखाद्या घरातून धुराची रेघ वर जात होती. खाडीकिनारी काही मच्छीमार शांतपणे आपापली कामं करत होते. पाण्याला एक विशिष्ट खारट वास होता आणि ओलसर वाऱ्यामुळे अंगावर हलका चिकटपणा जाणवत होता. समोर आमच्यासाठी उभा होता रेती वाहून नेणारा मचवा. पहिल्यांदा पाहताना तो साधाच वाटला. काळपट लाकूड. ठिकठिकाणी उडालेला रंग. काही ठिकाणी लाकडाला पडलेल्या भेगा. आत रेतीचे अवशेष. पण त्या मचव्यामध्ये एक वेगळंच आकर्षण होतं. तो पर्यटनासाठी सजवलेला नव्हता. तो रोज समुद्राशी झुंज देणारा होता. मचव्यात चढतानाच पहिली कसरत झाली. किनाऱ्यावरचं चिखलमिश्रित उथळ पाणी पार करून आत जावं लागत होतं. कुणी चप्पल हातात घेतल्या, कुणी पॅन्ट गुंडाळल्या. पाण्यात पाय टाकताच खाली मऊ चिखल सरकत असल्याची जाणीव झाली. एक क्षण तोल जाईल असं वाटलं आणि बाकीचे मित्र हसायला लागले. सगळे मचव्यात बसलो तसे इंजिन सुरू झालं. सुरुवातीला काळा धूर निघाला आणि मग मचवा हळूहळू पुढे सरकू लागला. खाडी अरुंद होती. दोन्ही बाजूंनी गर्द झाडं पाण्याच्या दिश...

चंदेरी दुनियेतला सोनेरी कोल्हा

इमेज
                        मानवी स्वभावांचे वर्णन करताना एखाद्या प्राण्याशी तुलना करण्याची पद्धत सर्वत्रच आहे. या पद्धतीमुळे ‘शेरदिल’, ‘भित्रा ससा’, ‘बोलका पोपट’ अशा उपमा तयार झाल्यात. ( यातले काही उपमान हे उपमेयाचे अपमान करणारे असल्याने, ते टाळलेलेेच बरे! ) विविध कथा, किस्से, पुराणे यांतून या उपमा आपल्या इतक्या अंगवळणी पडली आहेत, की कोल्हा हा धूर्त आणि लांडगा हा लबाडच असला पाहीजे अशी आपली खात्री पटते.  यातल्या कोल्ह्याच्या कथांना तर अंतच नाही. पंचतंत्र, इसापनिती आणि लोककथांमध्येही तो आपल्याला भेटतो. अगदी महाभारतातही कोल्ह्याची एक कथा येते ज्यात तो आपले मित्र, वाघ, लांडगा , मुंगूस आणि उंदीर यांच्यात भांडण लावून स्वत:चे इप्सित साध्य करतो. हे कमी आहे की काय म्हणून काही ठिकाणी कोल्ह्यांना देवत्वाशी जोडले आहे. भारत, जपानसह काही देशांमध्ये कोल्हा हा दैवी प्राणी मानला गेलाय. इजिप्तमध्ये कोल्हा हा प्राणी अनुबिस(Anubis) या  एका प्राचीन देवतेशी संबंधित मानला गेला आहे.          अनुबिस या मृत्यूदेवतेचे चित्...

मेरा ‘पत्ता’ ही मेरी पहचान है

इमेज
अंदमान-निकोबार बेटांवर अनेक आदिवासी जमाती आढळतात. अत्याधुनिक समाजजिवनापासून दूर असलेल्या त्यांच्या जगात विविध समस्यांवर पारंपारिक ज्ञानाच्या आधारे मार्ग काढला जातो. या जमातींपैकी काही जमातींमध्ये सर्पदंश झाल्यावर एका वनस्पतीची कोवळी पाने, मुळे कुटून दंशाच्या जागी लावली जातात. त्यामुळे विषाचा प्रभाव कमी होतो असा त्यांचा दृढ समज आहे. ही वनस्पती तीच आहे जी त्यांच्या पूर्वजांनी विषारी बाणांच्या जखमांसाठी वापरली होती. रानातल्या लोकांद्वारे पूर्वापार वापरल्या  जाणाऱ्या या वनस्पतीचे नाव निवगूर. तर शास्त्रीय नाव ॲकँथस   इलिसिफोलियस (Acanthus ilicifolius). खारफुटीच्या जंगलांत आढळणाऱ्या व ‘होली’ (होळी नव्हे!) वनस्पतींप्रमाणे पानांची रचना असल्याने या वनस्पतीला इंग्रजीत ‘होली मॅन्ग्रोव्ह’ किंवा ‘सी होली’ असे म्हटले जाते. तिलाच काही ठिकाणी मारांडी, मारांडो अशा नावांनी ओळखले जाते. तर संस्कृत ग्रंथांत तिचा हरिकुस असा उल्लेख सापडतो. भारत, श्रीलंका, मलेशिया, फिलिपीन्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांत या सदापर्णी वनस्पतीचा प्रसार आहे.       ...

कांदळवनांतील वांदळा

इमेज
         दोन हजार अठरा सालच्या नोव्हेंबर महिन्यातील घटना. बंगालच्या उपसागरातून ‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडूतील नागपट्टणमच्या किनाऱ्याला धडकले. वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पाऊस यांमुळे किनारी भागाला मोठे नुकसान सोसावे लागले. या चक्रीवादळातून तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील मुथुपेठ आणि जावपास हा भाग आश्चर्यकारकरित्या बचावला. यामागील कारण शोधले असता अभ्यासकांना असे दिसून आले की, या गावांभोवती कांदळवनांचे आवरण होते. कांदळवनांनी किनारपट्टीचे रक्षण करण्याचा अनुभव तसा नवा नाही. याच कांदळवनांमुळे २००४ सालच्या त्सुनामी पासून आपल्या देशातील किनारी भागाला संरक्षण मिळाले होते.          चंद्राच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रात कांदळवने अर्थातच खारफुटीची जंगले आढळतात. विविध प्रकारच्या खारफुटी वनस्पतींनी समृद्ध असे हे जंगल ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था म्हणून ओळखली जाते. या वनांचे महत्त्व ओळखून आपल्या राज्याने कांदळवन संवर्धनासाठी वन विभागाअंतर्गत स्वतंत्र ‘कांदळवन कक्ष’(Mangrove Cell) स्थापन केला. देशामध्ये केवळ महाराष्ट्रात अ...

हार-कारा

इमेज
        मुंबई व आसपासच्या भागांतील खाडीकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. इथे सापडणाऱ्या मत्स्यप्रजातींबरोबरच मासेमारीच्या पद्धतींमध्येदेखील खूप विविधता आहे. मासेमारीच्या विविध पद्धतींपैकी ‘हाताने चाचपून मासे पकडणे‘ ही पद्धत बऱ्याचदा उथळ पाण्यात  वापरली जाते. मात्र अशा तऱ्हेने मासे पकडताना या पाण्यात आक्रमक पंजे असलेल्या खेकडा प्रजातीतील जीव आढळला तर ही पद्धत काहीशी अवघड ठरते. अशा वेळेस नेहमीचा मासेमार याच पाण्यातील एका वनस्पतीकडे हात पसरतो. या जाळीदार वनस्पतीच्या  गुंडाळीने त्या आक्रमक सागरी जीवाला झाकून तो आपले लक्ष्य साध्य करतो." मासेमारीमध्ये जीत मिळवण्यास सहाय्य करणारी ही जलीय वनस्पती ‘हार’ या वैशिष्ट्यपूर्ण नावाने ओळखली जाते. म्हणजे मासेमारांना एकप्रकारे “हार के बाद ही जीत” मिळते. यातील गंमतीचा भाग सोडला तरी आणखी काही मार्गांनी ही वनस्पती मच्छीमारांना उपयुक्त ठरते. हारांच्या आसपास थोडे मोठे मासे आढळण्याची शक्यता असते, यामुळेच बरेचसे मासेमार माशांच्या शोधात या वनस्पतीच्या जंजाळात आपले नशिब आजमावत असतात.        एकमेकांत गु...

खारपट्टयातील रामबाण

इमेज
  एका पारंपारिक  सिंधी कुटूंबातील  दृश्य. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पाण्याला उकळी फुटताच, हे पातेले साध्या सुती कापड्यांच्या आवरणाने झाकले जाते. या आवरणाच्या कापडावर एक आकर्षक पिवळ्या रंगाचा पीठासारखा पदार्थ काळजीपूर्वक ओतून पुन्हा दुसऱ्या कापडाने ते झाकले जाते. पाण्याच्या वाफेवर हे मिश्रण शिजून, छान म्हैसूर पाकासारखा दिसणारा पदार्थ तयार होतो. पुढे उघड्यावर वाळवून त्यातील पाण्याचा अंश निघून जातो आणि एक विशेष चवीचा गोड पदार्थ तयार होतो. विस्मरणात चाललेल्या या सिंधी पदार्थाचे नाव ‘भूरी’. त्यालाच बूर, भूर, भुरानी मिट्टी, खरियत(Khirret) असेही म्हणतात. इराक आणि सिंध प्रांतातील हा पदार्थ जगातील सर्व वस्तूंची नक्कल तयार करू शकणाऱ्या ‘आपल्या’ उल्हासनगरात अगदी अस्सल दर्जाचा मिळतो. आपल्या पचनप्रक्रीयेला सहाय्य करणारा हा पदार्थ चक्क ‘परागकणां’पासून बनलाय हे ऐकून थोडे आश्चर्यही वाटेल. हे परागकण एका कणसापासून गोळा केलेले असतात.         पाण्यात उगवणाऱ्या व गवतासारख्या दिसणाऱ्या या वनस्पतीचे नाव ‘पाणकणीस.’ खारपट्टयात रस्त्याकडेच्या नाल्य...

कोळसुंदा: खरा नायक

इमेज
  एकमेकांवर नितांत प्रेम करणारे दोन प्रेमी आणि त्यांचे प्रेम यशस्वी होऊ नये म्हणून वारंवार अडथळे निर्माण करणारा एक खलनायक. या दोघांची एकमेकांसोबत जगण्याची इच्छा हा खलनायक पूर्ण होऊ देत नाही.  मनुष्य रुपातील अधुरी कहाणी पूर्ण करण्यासाठी हे दोन प्रेमी ‘जाई आणि जुई’ या फुलांच्या रुपाने जन्म घेतात, पण तिथेही हा खलनायक काटेरी वनस्पतीच्या रुपाने जन्म घेतो. अखेर या फुलांमधून आवाज येतो... “जाई-जुई एकत्र करा, कोलित्रा मेला उपटून टाका!” किनारी भागांत प्रसिद्ध असणारी ही लोककथा. या कथेतील खलनायक ‘कोलित्रा’ म्हणजेच ‘कोळसुंदा’ नावाची वनस्पती. इतर नाजूक, आकर्षक आणि सुगंधी फुलझाडांच्या दुनियेत केसाळ आणि तीक्ष्ण लांब काटे असलेला कोळसुंदा खलनायक असणे स्वाभाविकच आहे. पण, लोककथांमधील हा खलनायक प्रत्यक्षातही तसाच आहे का?           खारजमिनींवरील दलदलीच्या भागात आढळणारी ही वनस्पती कोकीळाक्ष, गोकुळकांता, गोक्षुर, विखरा, तालिमखाना या नावांनीदेखील ओळखली जाते.  ॲ कँथेसी   कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव हायग्रोफिला ऑरिक्युलाटा  ( Hygrop...

दुपानी लता: अमर्याद सागराला मर्यादा

इमेज
                 दूरवर पसरलेल्या अथांग सागराच्या लाटा  किनाऱ्यावर निरंतर येऊन आदळत असतात. आपल्या फेसाळत्या लाटांनी तो भूमीवर सातत्याने आक्रमण करतच राहतो. ओहोटीच्या वेळेस पीछेहाट झाली तरी भरतीच्या वेळेस हे आक्रमण अधिकच विशाल होत जाते. लाटांच्या प्रत्येक हल्ल्यात किनाऱ्याची झीज होत राहते. कधीकधी समुद्राचे पाणी वेस ओलांडून लोकवस्त्यांमध्ये घुसते. मानवाच्या दृष्टीने या निरंकुश पाण्याला अंकुश लावणे गरजेचे असते. त्याला रोखण्यात मानवी प्रयत्न तोकडे पडत असताना, बऱ्याच वेळेस निसर्गच सहाय्य करतो. सागरकिनारी वसलेल्या सजीवसृष्टीतील काही वनस्पती या अमर्याद सागराला आपल्यापरीने मर्यादा घालण्याचे काम करतात; ‘ मर्यादा वेल ’ ही त्यातलीच एक.         ‘मॉर्निंग ग्लोरी’ अशी ओळख असणाऱ्या आणि हजारो जाती असणाऱ्या वनस्पती प्रकारातील ही वेेेल. समुद्रकिनारी उगवते म्हणून ती ‘बीच मॉर्निंग ग्लोरी’. आयपोमोई पीस-कॅप्रे ( Ipomoea pes-caprae )  हे तिचे शास्त्रीय नाव. यातील ‘आयपोमोई’ हा ग्रीक शब्द वेलीचे  ‘वळवळणाऱ्या ...

गोड फळे, तिखट मुळे

इमेज
     ‘अॅडम आणि इव्ह’ या जोडीची कथा आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल. ‘इव्ह’ला बागेतील सुप्रसिद्ध फळ खाण्याची इच्छा होते. अॅडम मात्र हे फळ खायचे की नाही, या द्वीधा मन:स्थितीत असतो. पुढे हे फळ त्यांच्याकडून खाल्ले जाऊन मनुष्यप्राण्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान वगैरे मिळते असे काहीसे हे कथानक. बऱ्यापैकी ज्ञान असलेला आधुनिक मनुष्य पृथ्वीवर येऊन आता जवळपास दोन-तीन लाख वर्षांचा कालावधी लोटला आहे.अॅडम-इव्हने खाल्लेल्या फळांसारखी कित्येक फळे आपल्या पूर्वजांकडून पचवून झाली आहेत. पण तरीही कधीकधी आपल्या आजूबाजूला आपल्याला ज्ञात नसलेल्या अशा काही वनस्पती दिसतात, तेव्हा मात्र आपले ज्ञान अजूनही अॅडम स्तरावरचे आहे याची मनोमन खात्री पटते.    महाराष्ट्राच्या किनारी भागात फेरफटका मारताना खारफुटींच्या जंगलात सुंदर अशा पांढऱ्या जांभळ्या रंगांच्या लहान लहान फळांनी लगडलेला एक झुडूपसदृश वृक्ष दिसतो. त्याच्या फळांचा आकर्षकपणा आपल्यातील ‘इव्हपणा’ जागा करीत असला तरी ते फळ बाजारात पहायला मिळत नसल्याने खावे की न खावे असा ‘अादिम’ प्रश्न काहीजणांना पडतो. खारेपाटातील स्थानिकांना पूर्वापार  परिचि...