पोस्ट्स

ऐतिहासिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कान्हेरी लेण्यांची हाक

इमेज
  आंतरराष्ट्रीय सहल दिवस आणि कान्हेरी लेण्यांची हाक        दरवर्षी १८ जून रोजी जगभर ‘आंतरराष्ट्रीय सहल दिवस (International Picnic Day)’ साजरा केला जातो. कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवण्याचा हा दिवस मानला जातो. आधुनिक जीवनाच्या धावपळीतून थोडा विरंगुळा मिळावा, माणसामाणसांतील संवाद वाढावा आणि निसर्गाशी नाते अधिक दृढ व्हावे हा या दिवसामागील मुख्य हेतू आहे. अशा दिवशी सहलीसाठी एखादे ठिकाण निवडायचे झाल्यास इतिहास, निसर्ग, अध्यात्म आणि भटकंती यांचा अद्भुत संगम अनुभवता येणाऱ्या कान्हेरी लेण्या हा एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.       मुंबईच्या गजबजाटापासून काही अंतरावर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दाट जंगलात वसलेल्या कान्हेरी लेण्या केवळ दगडात कोरलेल्या गुहा नाहीत. त्या हजारो वर्षांच्या ज्ञानपरंपरेचे, साधनेचे आणि मानवी कर्तृत्वाचे जिवंत स्मारक आहेत. बेसाल्ट खडकात कोरलेल्या तब्बल १०९ लेण्यांचा हा समूह भारतातील सर्वात मोठ्या बौद्ध लेणी समूहांपैकी एक मानला जातो. इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून ते दहाव्या शतकाप...

पुरंदरच्या तहाची साक्ष देणारा कर्नाळा

इमेज
  पुरंदरच्या तहाची साक्ष देणारा कर्नाळा ११ जून हा दिवस स्वराज्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे. इ.स. १६६५ मध्ये याच दिवशी झालेल्या पुरंदरच्या तहामुळे शिवरायांना २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले. त्या यादीत कर्नाळा किल्ल्याचाही समावेश होता.       इतिहासाच्या पुस्तकात ही माहिती दोन ओळीत वाचून पुढे जाता येते; पण कर्नाळ्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर त्या दोन ओळींचे वजन वेगळेच जाणवते. समोर उभा असलेला सुळका, त्याच्या भोवती पसरलेले जंगल आणि डोंगरकड्यांवरून फिरणारा वारा यांच्यामध्ये कुठेतरी स्वराज्याच्या त्या अस्थिर काळाच्या आठवणी अजूनही दडलेल्या आहेत, असे वाटते.       कर्नाळ्याची वाट धरली की सर्वप्रथम लक्ष वेधून घेतो तो त्याचा वैशिष्ट्यपूर्ण सुळका. मुंबई गोवा महामार्गावरून जाताना तो अनेकदा नजरेस पडतो. दूरून दिसणारा हा डोंगर जवळ गेल्यावर मात्र अधिकच रांगडा आणि भव्य वाटू लागतो. डोंगराच्या कुशीत शिरताच शहराचा गोंगाट मागे राहतो आणि निसर्ग आपल्याशी हळूहळू संवाद साधू लागतो. कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतरची पायवाट म्हणजे...

कोकणचा राजा झिम्मा खेळतो

इमेज
झिम्मा खेळणारा कोकणचा राजा       आपला देश म्हणजे विविध रंगांच्या, विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांनी तयार झालेली एकप्रकारची गोधडीच. प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृतीचे व आचार, विचारांचे तुकडे यात सामावलेले आहेत. भैगोलिक विविधतेमुळे हे तुकडे स्वतंत्र वाटत असले, तरी संस्कृतीच्या समान धाग्याने ते एकत्र जोडलेले आहेत. या सांस्कृतिक जोडणीमुळे हा देश अधिकच रंगीबेरंगी, मायेची उब देणारा ठरला आहे. या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात समोर येत असतात. ‘लोकगीत’ नावाचा प्रकारही असाच, संस्कृतीचे दर्शन घडवणारा. या लोकगीतांतही  प्रदेशानुसार प्रकार दिसून येतात. लोकजीवनाशी जोडलेली संस्कारगीते, ऋतुगीते, श्रमगीते, नृत्यगीते तसेच विविध सण-उत्सवप्रसंगी गायिली जाणारी गाणी सर्वत्रच आढळतात. देशातील लोकगीतांची परंपरा  प्राचीन काळापासूनच आहे. ती परंपरा वैविध्यपूर्ण आहेच, पण त्याचबरोबर समृद्धही आहे.        पूर्वी ‘कुलाबा’ असे नामकरण असलेला रायगड जिल्हा खरंतर कोकण प्रांताचाच एक भाग. वसई, ठाणे प्रांतापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते अगदी गोव्याप...

वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया

इमेज
  वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया समुद्रावरून अलिबागच्या थळ जेटीकडून होडी निघते आणि थोड्याच वेळात उंदेरीला वळसा घालून खांदेरीच्या जवळ येऊ लागतो. दूरून दिसणारा दीपगृहाचा मनोरा, भोवती पसरलेले खडक, आणि लाटांवर डोलणारं बेट. किल्ल्यावर पाय ठेवताच जाणवतं, ही जागा फक्त पाहण्याची नाही, तर अनुभवण्याची आहे. खाऱ्या वाऱ्यात भूतकाळ मिसळलेला आहे. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारे हे खांदेरी बेट.     किल्ल्याच्या एका टोकाला, खडकांच्या आडोशाला वेताळदेवाचं मंदिर उभं आहे.  साधं, लहानसं देवस्थान. आत शिरल्यावर गोंगाट मागे राहतो आणि एक शांत थर मनात बसतो. मंदिरात टांगलेल्या काही घंटा दिसतात. त्यातली एक घंटा मात्र लगेच लक्ष वेधून घेते. आकाराने मोठी, धातूवर काळाचे ठसे. हात लावला की तिचा थंड स्पर्श जाणवतो आणि मग नजरेला तिच्यावरची अक्षरं दिसतात -  EMPRESS OF INDIA 1891 क्षणभर थांबावं लागतं. ही घंटा इथे कशी आली असेल ही साधी देवळातील वस्तू नाही. ती एका मोठ्या  जहाजाची घंटा आहे. एम्प्रेस ऑफ इंडिया नावाचं जहाज. १८९१ साली इंग्लंडमध...

गंगावतरण आणि गंगाधर शिव

इमेज
गंगावतरण आणि गंगाधर शिव        आपली संस्कृती किती गूढ, किती भावपूर्ण आहे, हे गंगेच्या स्मरणातून सहज उमजतं. गंगा ही केवळ एक नदी नाही, तर ती स्मृती आहे, ती श्रद्धा आहे, आणि ती जीवनाच्या अखंड प्रवाहाची साक्ष आहे. म्हणूनच गंगासप्तमीसारखी तिथी आपल्या आयुष्यात येते आणि आपल्याला त्या पवित्र प्रवाहाशी पुन्हा एकदा जोडून जाते.    पौराणिक कथांमध्ये सांगितलेला गंगावतरणाचा प्रसंग केवळ ऐकण्यापुरता नाही, तर तो आपल्या कलेत, शिल्पात आणि संस्कृतीत जिवंत आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या समुद्राच्या कुशीत वसलेल्या घारापुरीच्या लेण्यांमध्ये हा प्रसंग अक्षरशः दगडात गोठवलेला दिसतो. येथे उभी असलेली गंगाधर शिवमूर्ती म्हणजे एक शिल्प नसून एक संपूर्ण कथा आहे, एक भावविश्व आहे.  या शिल्पात सुमारे पाच मीटर उंच असलेले शिव आणि त्यांच्या शेजारी उभी असलेली पार्वती, या दोघांच्या मध्यभागी गंगेचा अवतरणाचा क्षण पकडलेला आहे. गंगेचा प्रचंड वेग पृथ्वी सहन करू शकणार नाही, म्हणून तिला आपल्या जटांमध्ये धारण करणारा शिव; ही कल्पना जितकी विराट, तितकीच नाजूकपणे शिल्पकाराने व्यक्त केली आहे. शिवाच्या जटां...

बेलापूरचा किल्ला: मराठ्यांच्या सागरी पाऊलखुणा

इमेज
समुद्र म्हणजे विशालतेचं प्रतीक. लाटांच्या ओघात वाहणारी शांतता आणि आत दडलेली ताकद दोन्ही एकाचवेळी जाणवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या समुद्राची ताकद ओळखली आणि किनाऱ्याच्या प्रत्येक वळणावर आपले अस्तित्व उमटवले. मराठा साम्राज्य केवळ डोंगरदऱ्यांमध्ये नव्हे, तर लाटांवरही उभं राहावं, हे त्यांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या साक्षीदारांपैकी एक आहे... बेलापूरचा किल्ला. शिवाजी महाराजांनी थेट बेलापूर किल्ला जिंकला नसला तरी, त्यांनी उभारलेल्या आरमाराच्या आणि स्वराज्याच्या विस्ताराच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, हे महत्त्वाचे आहे. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला, पनवेल खाडीच्या किनारी वसलेलं बेलापूर हे गाव एकेकाळी सागरी व्यापाराचं केंद्र होतं. या खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आक्रमणांना रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी इ.स. १५६० च्या सुमारास हा किल्ला उभारला. तो काळ समुद्रावर वर्चस्व गाजवणाऱ्यांचा होता. अरब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज या सगळ्यांनी सागराच्या किनाऱ्याकडे लोभाने पाहिलं. परंतु नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने या समुद्राला स्वराज्याच्या सीमेचा भाग बनवलं. शिवर...

सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा

इमेज
सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा ठाण्याच्या गर्दीतून थोडं बाजूला वळलं की शहराचं रूप शांत होतं. सिग्नल आणि ट्रॅफिक मागे टाकत सिद्धेश्वर तलावाजवळ पोहोचलं की, वातावरणात एक वेगळी निवांतता जाणवते. त्या तलावालगत असलेलं सिद्धेश्वर राम मंदिर दिसतं आणि मंदिराच्या एका काचेच्या पेटीत एक दुर्मिळ शिल्प उभं आहे, चतुर्मुख ब्रह्मदेवाचं. १९९५ मध्ये हे शिल्प सिद्धेश्वर तलावाजवळ सापडलं. साधारण आठव्या शतकातील ही मूर्ती शिलाहारकालीन कलाशैलीचा उत्तम नमुना मानली जाते. शिल्पाची उंची साधारण साडेचार फूट असून ते काळ्या दगडात कोरलेले आहे. समोर तीन आणि मागे एक अशी ही चतुर्मुख मूर्ती आज भग्न अवस्थेत असली, तरी तिच्या प्रत्येक रेषेत त्या काळातील कलाकौशल्य जाणवतं. मूर्तीचं चेहरं शांत आणि गंभीर आहे. तीन मुखांतील प्रत्येक भाव वेगळा. एक ज्ञानमग्न, एक स्मितहास्यपूर्ण आणि एक स्थिर. पाठीमागे कोरलेलं चौथं मुख थोडं झिजलेलं आहे, पण त्या झिजेतूनही काळाचा ठसा उमटलेला जाणवतो. शिरावर कोरलेला जटा-मुकुट, कपाळावर रेषा, आणि अंगावरील अलंकार या सर्व गोष्टींमध्ये शिलाहारकालीन दगडी शिल्पकलेची मृदु लय स्पष्ट दिसते. पायाजवळ कोरलेले हंस...

वीरगळांचे कोडे

इमेज
  वीरगळांचे कोडे .            २९ जानेवारी, भारतीय कोडे दिन! शब्दांच्या खेळातून विचारांना दिशा देणारा, आणि प्रश्न विचारण्याची कला साजरी करणारा हा दिवस. शाळांमध्ये मुलं कोडी सोडवतात, हसतात, विचार करतात, आणि नकळत एक मोठं शिक्षण घेतात. ‘प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजेच जगण्याची कला शिकणं.’ आपल्या संस्कृतीत कोड्यांचा उगम खूप जुना आहे. संत ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी, अगदी लोककवितांमधील स्त्रियांनीही कोड्यांच्या माध्यमातून गूढ विचार मांडले. कोड्याचं सौंदर्य हे असतं की ते उलगडलं की आनंद मिळतो, आणि न उलगडलं तरी विचार मिळतो.      पण आज मी एका वेगळ्या कोड्याबद्दल बोलू इच्छितो, दगडात कोरलेल्या कोड्याबद्दल. नवी मुंबईलगतच्या परिसरात तळोजा, उरण, पिरकोन, दिघोडे, पुनाडे आणि आवरे या गावांमध्ये काही शांत, उभट शिळा दिसतात. गावाच्या वेशीजवळ, एखाद्या मंदिराच्या कोपऱ्यात किंवा झाडांच्या सावलीत त्या उभ्या असतात. कोणाचं लक्ष नसलेली ही शिळा म्हणजेच वीरगळ. दगडावर कोरलेले योद्ध्यांचे आकृतीबंध, धनुष्य, तलवारी, घोडे आणि आकाशात कोरलेला सूर्य–चंद्र यांच...

पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला

इमेज
पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला  डोंगर माणसाच्या आयुष्यात केवळ भौगोलिक रचना नसतात; ते त्याच्या संस्कृतीचे, श्रद्धेचे आणि संघर्षाचे साक्षीदार असतात. प्रत्येक डोंगराच्या कड्यावर, प्रत्येक दरीत एखादी कथा दडलेली असते, कधी रणाची, कधी अध्यात्माची, तर कधी निसर्गाशी एकरूप झालेल्या मानवी अस्तित्वाची. अशा असंख्य डोंगरांपैकी रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी पर्वत एक वेगळीच ओळख ठेवतो. ११ डिसेंबरला साजरा होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या निमित्ताने या पर्वताचा मागोवा घेतला, तर तो केवळ भूगोल नव्हे तर इतिहास, पर्यावरण आणि जैवविविधतेची एकत्रित कहाणी उलगडतो. उरणजवळ समुद्राच्या सान्निध्यात उभा असलेला हा द्रोणागिरी पर्वत समुद्रकाठच्या वाऱ्याशी संवाद साधत उभा आहे. सकाळच्या सूर्यकिरणांत न्हालेला हा किल्ला पाहताना एखाद्या जुन्या योद्ध्याची छबी डोळ्यांसमोर उभी राहते. एकेकाळी यादव, पोर्तुगीज, आदिलशाही आणि अखेर मानाजी आंग्रे यांच्या हातून गेलेल्या या किल्ल्याने असंख्य संघर्ष पाहिले आहेत. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे तीन चर्च उभारली होती; त्यांच्या अवशेषांत आजही त्या काळाचे प्रतिध्वनी ऐकू येतात. पण द्र...