पोस्ट्स

जीवसृष्टी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रात्र फिरस्ती

इमेज
 रात्र फिरस्ती रात्र म्हणजे फक्त अंधार नसतो. कधी कधी तो निसर्गाचा दुसरा चेहराही असतो. दिवसाच्या गडबडीत दिसत नाहीत अशा अनेक गोष्टी रात्री शांतपणे आपल्या समोर उलगडत जातात. १९ ऑक्टोबर २०२५ ची रात्र अशीच काहीशी वेगळी ठरली. फ्रेंड्स ऑफ नेचर अर्थात ‘फॉन’ संस्थेने आयोजित केलेल्या “रात्र फिरस्ती व वनभोजन” कार्यक्रमासाठी आम्ही चिरनेर येथील बापूजी देव देवराई परिसरात जमलो. सायंकाळचे सात वाजले होते. शहरात त्या वेळेला दिवे लागले असतील, रस्त्यांवर हॉर्न वाजत असतील. पण देवराईच्या वाटेवर मात्र वेगळंच जग हळूहळू जागं होत होतं. पहिल्यांदा अंधारात चालताना पावलं थोडी सावधच पडतात. मोबाईलचे दिवे बंद केल्यावर तर जंगल अधिक जिवंत वाटू लागलं. पानांची सळसळ, दूरवरून येणारे आवाज, कधीतरी झाडांच्या फांद्यांवरून होणारी हालचाल… प्रत्येक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेत होती. Night Trail हा शब्द ऐकायला आकर्षक वाटतो. पण प्रत्यक्षात त्या वाटेवर चालताना निसर्गाकडे बघण्याची आपली सवयच बदलत जाते. दिवसा दुर्लक्षित राहणारे छोटे छोटे जीव त्या रात्री मुख्य पात्र बनले होते. एखादा चमकणारा कोळी, पानामागे लपलेला बेडूक, ओलसर जमिनीत वाढले...

शोले आणि ‘सांभा’ दगड

इमेज
शोले आणि ‘सांभा’ दगड           ‘शोले’ चित्रपट रिलीज होऊन यंदा पन्नास वर्षे झाली. इतक्या वर्षानंतरही चित्रपट रसिकांमध्ये शोलेची जादू अजूनही कायम आहे. त्यातील दृश्ये, संवाद, गाणी अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. यातील केवळ मुख्य कलाकारच नव्हे, तर अगदी लहानात लहान भूमिका करणारेही तितकेच गाजलेत. तुम्हाला “कितने आदमी थे?” असे म्हणत हातातला पट्टा दगडांवर घासत चालणारा गब्बर आठवत असेलच. गब्बरच्या जोडीला  “अरे ओ सांभा!” असा आवाज दिल्यानंतर भल्या मोठ्या दगडावर नेम धरून बसलेला “जी सरदार!” म्हणनारा ‘सांभा’ही डोळ्यांसमोर येत असेल. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या आणि गब्बर कमाई करणाऱ्या या चित्रपटातल्या दगडांची कथाही तितकीच मनोरंजक आहे.       गेली पन्नास वर्षे ‘सांभा’ ज्या राखाडी रंगाच्या दगडांवर बसून गब्बरला उत्तरे देतोय, ज्या दगडांवर ‘जब तक है जान’ म्हणणाऱ्या बसंतीची पावले थिरकलीत, ते दगड तब्बल अडीचशे ते तिनशे कोटी वर्षांपासून तिथे उभे आहेत. बेंगलुरूजवळच्या रामनगरा जिल्ह्यातील हे दगड ‘रामनगर खडक’ याच नावाने ओळखले जातात. याच ...

चिरनेरचा सवतकडा

इमेज
काही ट्रेक हे फक्त डोंगर चढण्यापुरते नसतात.ते स्वतःला थोडंसं नव्याने ओळखण्याचे प्रवास असतात. चिरनेरच्या अक्कादेवी जंगलातून सुरू झालेली ही वाट सुरुवातीला साधी वाटली खरी, पण पुढे पुढे निसर्गाने त्याचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. ओले दगड, घसरडी नाळ आणि दाट झाडीमधून काढावी लागणारी वाट. मध्येच एखाद्या दगडावर पाय घसरला, कुणी धडपडलं, तर कुणाच्या कपड्यांवर चिखल उडाला. पण ट्रेकमधल्या अशा छोट्या धडपडीच पुढे आठवणी बनतात. या वाटेची खास गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. शहरातल्या सरळ रस्त्यांची सवय असलेल्या पायांना इथं निसर्गाचा स्वभाव समजतो. कुठे आधारासाठी झाडाची फांदी पकडावी लागते, तर कुठे दगडावर बसून श्वास सावरावा लागतो. आणि मग अचानक धुक्याच्या पडद्याआडून समोर येतो तो सवतकडा. वर पोहोचल्यानंतरचा तो क्षण म्हणजे सगळी दमछाक विसरवणारा असतो. अंगावर थंड वारा, खाली हिरवी दरी आणि मित्रांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा आनंद. त्या कड्यावर बसून केलेलं वनभोजन म्हणजे फक्त जेवण नव्हतं. ती भूकही वेगळी होती आणि त्या जेवणाची चवही. पावसाच्या वातावरणात, निसर्गाच्या साक्षीने खाल्लेला साधा घाससुद्...

चंदेरी दुनियेतला सोनेरी कोल्हा

इमेज
                        मानवी स्वभावांचे वर्णन करताना एखाद्या प्राण्याशी तुलना करण्याची पद्धत सर्वत्रच आहे. या पद्धतीमुळे ‘शेरदिल’, ‘भित्रा ससा’, ‘बोलका पोपट’ अशा उपमा तयार झाल्यात. ( यातले काही उपमान हे उपमेयाचे अपमान करणारे असल्याने, ते टाळलेलेेच बरे! ) विविध कथा, किस्से, पुराणे यांतून या उपमा आपल्या इतक्या अंगवळणी पडली आहेत, की कोल्हा हा धूर्त आणि लांडगा हा लबाडच असला पाहीजे अशी आपली खात्री पटते.  यातल्या कोल्ह्याच्या कथांना तर अंतच नाही. पंचतंत्र, इसापनिती आणि लोककथांमध्येही तो आपल्याला भेटतो. अगदी महाभारतातही कोल्ह्याची एक कथा येते ज्यात तो आपले मित्र, वाघ, लांडगा , मुंगूस आणि उंदीर यांच्यात भांडण लावून स्वत:चे इप्सित साध्य करतो. हे कमी आहे की काय म्हणून काही ठिकाणी कोल्ह्यांना देवत्वाशी जोडले आहे. भारत, जपानसह काही देशांमध्ये कोल्हा हा दैवी प्राणी मानला गेलाय. इजिप्तमध्ये कोल्हा हा प्राणी अनुबिस(Anubis) या  एका प्राचीन देवतेशी संबंधित मानला गेला आहे.          अनुबिस या मृत्यूदेवतेचे चित्...

इस सिमेंट में जान है!

इमेज
    “ इस सिमेंट में जान है! ” असे म्हणत आपल्या सिमेंटची वैशिष्ट्ये सांगणारी जाहीरात आठवत असेल. या कंपनीचे सिमेंट वापरून केलेले बांधकाम किती मजबूत आहे, हे ग्राहकांच्या मनात ठसवण्यासाठी अशी टॅगलाईन वापरली गेली. उत्पादनाचे वर्णन करताना अतिशयोक्तीचा वापर करण्याची अशी पद्धत जवळपास सर्वच कंपन्या वापरतात. ‘ सिमेंट में जान’ वाले पण यातलेच.  पण प्रत्यक्षात ‘सिमेंट में जान’ असणारी एखादी गोष्ट असल्याबद्दल आपल्याला कोणी सांगीतली तर? ती देखील आपल्या घरात? होय, सिमेंटसदृश निर्जीव गोष्टींनी वेढलेली परंतु आतून सजीव असलेली ही गोष्ट आपल्या सभोवतालीच आढळते.                             घराची साफसफाई करताना तुम्हाला भोपळ्याच्या बी प्रमाणे चपटी, दोन्ही टोकाला निमुळता आकार असणारे लहान कोश आढळले आहेत का? विशेषत: भिंतीतील फडताळांमध्ये, बाथरूमच्या कोपऱ्यांमध्ये अशा आकाराचे पण सिमेंट-मातीचा खरखरीत स्पर्श असणारे कोश दिसतात. काळजीपूर्वक पाहील्यास कधीकधी या सिमेंटसारख्या कोशाच्या आतून बाहेर डोकावणारा जीव दिसतो. ‘सिमेंट में जान’...

मेरा ‘पत्ता’ ही मेरी पहचान है

इमेज
अंदमान-निकोबार बेटांवर अनेक आदिवासी जमाती आढळतात. अत्याधुनिक समाजजिवनापासून दूर असलेल्या त्यांच्या जगात विविध समस्यांवर पारंपारिक ज्ञानाच्या आधारे मार्ग काढला जातो. या जमातींपैकी काही जमातींमध्ये सर्पदंश झाल्यावर एका वनस्पतीची कोवळी पाने, मुळे कुटून दंशाच्या जागी लावली जातात. त्यामुळे विषाचा प्रभाव कमी होतो असा त्यांचा दृढ समज आहे. ही वनस्पती तीच आहे जी त्यांच्या पूर्वजांनी विषारी बाणांच्या जखमांसाठी वापरली होती. रानातल्या लोकांद्वारे पूर्वापार वापरल्या  जाणाऱ्या या वनस्पतीचे नाव निवगूर. तर शास्त्रीय नाव ॲकँथस   इलिसिफोलियस (Acanthus ilicifolius). खारफुटीच्या जंगलांत आढळणाऱ्या व ‘होली’ (होळी नव्हे!) वनस्पतींप्रमाणे पानांची रचना असल्याने या वनस्पतीला इंग्रजीत ‘होली मॅन्ग्रोव्ह’ किंवा ‘सी होली’ असे म्हटले जाते. तिलाच काही ठिकाणी मारांडी, मारांडो अशा नावांनी ओळखले जाते. तर संस्कृत ग्रंथांत तिचा हरिकुस असा उल्लेख सापडतो. भारत, श्रीलंका, मलेशिया, फिलिपीन्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांत या सदापर्णी वनस्पतीचा प्रसार आहे.       ...

कांदळवनांतील वांदळा

इमेज
         दोन हजार अठरा सालच्या नोव्हेंबर महिन्यातील घटना. बंगालच्या उपसागरातून ‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडूतील नागपट्टणमच्या किनाऱ्याला धडकले. वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पाऊस यांमुळे किनारी भागाला मोठे नुकसान सोसावे लागले. या चक्रीवादळातून तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील मुथुपेठ आणि जावपास हा भाग आश्चर्यकारकरित्या बचावला. यामागील कारण शोधले असता अभ्यासकांना असे दिसून आले की, या गावांभोवती कांदळवनांचे आवरण होते. कांदळवनांनी किनारपट्टीचे रक्षण करण्याचा अनुभव तसा नवा नाही. याच कांदळवनांमुळे २००४ सालच्या त्सुनामी पासून आपल्या देशातील किनारी भागाला संरक्षण मिळाले होते.          चंद्राच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रात कांदळवने अर्थातच खारफुटीची जंगले आढळतात. विविध प्रकारच्या खारफुटी वनस्पतींनी समृद्ध असे हे जंगल ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था म्हणून ओळखली जाते. या वनांचे महत्त्व ओळखून आपल्या राज्याने कांदळवन संवर्धनासाठी वन विभागाअंतर्गत स्वतंत्र ‘कांदळवन कक्ष’(Mangrove Cell) स्थापन केला. देशामध्ये केवळ महाराष्ट्रात अ...

हार-कारा

इमेज
        मुंबई व आसपासच्या भागांतील खाडीकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. इथे सापडणाऱ्या मत्स्यप्रजातींबरोबरच मासेमारीच्या पद्धतींमध्येदेखील खूप विविधता आहे. मासेमारीच्या विविध पद्धतींपैकी ‘हाताने चाचपून मासे पकडणे‘ ही पद्धत बऱ्याचदा उथळ पाण्यात  वापरली जाते. मात्र अशा तऱ्हेने मासे पकडताना या पाण्यात आक्रमक पंजे असलेल्या खेकडा प्रजातीतील जीव आढळला तर ही पद्धत काहीशी अवघड ठरते. अशा वेळेस नेहमीचा मासेमार याच पाण्यातील एका वनस्पतीकडे हात पसरतो. या जाळीदार वनस्पतीच्या  गुंडाळीने त्या आक्रमक सागरी जीवाला झाकून तो आपले लक्ष्य साध्य करतो." मासेमारीमध्ये जीत मिळवण्यास सहाय्य करणारी ही जलीय वनस्पती ‘हार’ या वैशिष्ट्यपूर्ण नावाने ओळखली जाते. म्हणजे मासेमारांना एकप्रकारे “हार के बाद ही जीत” मिळते. यातील गंमतीचा भाग सोडला तरी आणखी काही मार्गांनी ही वनस्पती मच्छीमारांना उपयुक्त ठरते. हारांच्या आसपास थोडे मोठे मासे आढळण्याची शक्यता असते, यामुळेच बरेचसे मासेमार माशांच्या शोधात या वनस्पतीच्या जंजाळात आपले नशिब आजमावत असतात.        एकमेकांत गु...

खारपट्टयातील रामबाण

इमेज
  एका पारंपारिक  सिंधी कुटूंबातील  दृश्य. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पाण्याला उकळी फुटताच, हे पातेले साध्या सुती कापड्यांच्या आवरणाने झाकले जाते. या आवरणाच्या कापडावर एक आकर्षक पिवळ्या रंगाचा पीठासारखा पदार्थ काळजीपूर्वक ओतून पुन्हा दुसऱ्या कापडाने ते झाकले जाते. पाण्याच्या वाफेवर हे मिश्रण शिजून, छान म्हैसूर पाकासारखा दिसणारा पदार्थ तयार होतो. पुढे उघड्यावर वाळवून त्यातील पाण्याचा अंश निघून जातो आणि एक विशेष चवीचा गोड पदार्थ तयार होतो. विस्मरणात चाललेल्या या सिंधी पदार्थाचे नाव ‘भूरी’. त्यालाच बूर, भूर, भुरानी मिट्टी, खरियत(Khirret) असेही म्हणतात. इराक आणि सिंध प्रांतातील हा पदार्थ जगातील सर्व वस्तूंची नक्कल तयार करू शकणाऱ्या ‘आपल्या’ उल्हासनगरात अगदी अस्सल दर्जाचा मिळतो. आपल्या पचनप्रक्रीयेला सहाय्य करणारा हा पदार्थ चक्क ‘परागकणां’पासून बनलाय हे ऐकून थोडे आश्चर्यही वाटेल. हे परागकण एका कणसापासून गोळा केलेले असतात.         पाण्यात उगवणाऱ्या व गवतासारख्या दिसणाऱ्या या वनस्पतीचे नाव ‘पाणकणीस.’ खारपट्टयात रस्त्याकडेच्या नाल्य...

कोळसुंदा: खरा नायक

इमेज
  एकमेकांवर नितांत प्रेम करणारे दोन प्रेमी आणि त्यांचे प्रेम यशस्वी होऊ नये म्हणून वारंवार अडथळे निर्माण करणारा एक खलनायक. या दोघांची एकमेकांसोबत जगण्याची इच्छा हा खलनायक पूर्ण होऊ देत नाही.  मनुष्य रुपातील अधुरी कहाणी पूर्ण करण्यासाठी हे दोन प्रेमी ‘जाई आणि जुई’ या फुलांच्या रुपाने जन्म घेतात, पण तिथेही हा खलनायक काटेरी वनस्पतीच्या रुपाने जन्म घेतो. अखेर या फुलांमधून आवाज येतो... “जाई-जुई एकत्र करा, कोलित्रा मेला उपटून टाका!” किनारी भागांत प्रसिद्ध असणारी ही लोककथा. या कथेतील खलनायक ‘कोलित्रा’ म्हणजेच ‘कोळसुंदा’ नावाची वनस्पती. इतर नाजूक, आकर्षक आणि सुगंधी फुलझाडांच्या दुनियेत केसाळ आणि तीक्ष्ण लांब काटे असलेला कोळसुंदा खलनायक असणे स्वाभाविकच आहे. पण, लोककथांमधील हा खलनायक प्रत्यक्षातही तसाच आहे का?           खारजमिनींवरील दलदलीच्या भागात आढळणारी ही वनस्पती कोकीळाक्ष, गोकुळकांता, गोक्षुर, विखरा, तालिमखाना या नावांनीदेखील ओळखली जाते.  ॲ कँथेसी   कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव हायग्रोफिला ऑरिक्युलाटा  ( Hygrop...