पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तळा मारणे: एक आनंदोत्सव

इमेज
(पिरकोन मधील मासेमारीच्या अनोख्या परंपरेविषयक लेख) लहानपणी आम्ही आणि गावातील म्हैशी दोघांचेही हक्काचे स्विमिंग पूल म्हणजे पिरकोनच्या पूर्वेकडील विस्तीर्ण तलाव, गावच्या भाषेत ‘तला’.  पोहण्याच्या सुविधेबरोबरच कपडे धुवण्यासाठीचा धोबी घाटही तोच, विसर्जन तलावही तोच आणि मरणोत्तर विधींसाठीचा घाटही तोच. लग्नसमारंभासाठी लागणारे मंगल जलसुद्धा याच तळ्याचे. गावातील सर्व प्रथा-परंपरांचे केंद्रस्थान म्हणजे हा तलाव.  कालांतराने या नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये माझे पोहणे कमी झाले, मात्र म्हैशींनी अजूनही ही ‘सांस्कृतिक परंपरा’ जपली आहे.  अशा या बहुढंगी तलावाला भेट देण्याचे माझे प्रमाण कमी झाले असले तरी काही महत्त्वपूर्ण प्रसंगी मी आजही आवर्जून हजेरी लावतो. हे प्रसंग म्हणजे गोपाळकाला आणि गणेश विसर्जन. या सणसमारंभांव्यतिरिक्त आणखी एक वेगळा दिवस, ज्यावेळेस  गावातील कर्तबगार मंडळी (त्यात मी सुद्धा आहे बरं का!)  वर्षातून एक दोन वेळा हजेरी लावतात आणि ज्या दिवसाची मी नेहमीच वाट पहात असतो. हा दिवस म्हणजे ‘तळा मारण्याचा’ दिवस. खरं म्हणजे हा साधासुधा दिवस नसून एक उत्सवच;...

यंदाची दिवाली

इमेज
🔥🌾⛈ यंदाची दिवाली⛈🌾🔥           🍃(आगरी काव्य)🍃 वरीसभर राबून  रिकामंच हात, रिकामे पोटान कालचा शिला भात, कापनीचे टायमाचा यो घाताचा म्हैना, आरझोर पान्यानी केली शेतीची दैना, हाताशी आलेली भातां पान्यानी भिजली, यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली. हत्तीचा पाऊस हत्तीसारा धावला, उरवंला कसातरी फाटका कापर लावला, सोनसारे कनसांना हिवाल्यान रो आला, बारबोऱ्या पावसाला अवकाली रोग झाला, कालंकुट ढग संगती चमकती बिजली, यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली. बिनवातीचा कंदिल न बिनतेलाचा दिवा, इझलेले चुलीवर बिनभाकरीचा तवा, सगल्यांचे दाराशी रांगोल्या न पनत्या, आमचे दाराशी पेंढच्या गिनत्या, फटाकरं मांगनारी पोरा फटकं खाऊन निजली, यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली. ⓒ तुषार म्हात्रे, पिरकोन उरण

गांधी‘वादा’ची नांदी!

इमेज
सुमारे चार वर्षापूर्वीचा प्रसंग.डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत फरिदाबाद येथील एक कॉन्फरन्स आटोपून दिल्लीकडे निघालो. दिल्लीत फिरण्यासाठी पुढील योजना आखत होतो. माझ्यासोबत आणखी चार सहकारी होते. सकाळी दहाच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ पोहोचलो. सोमवार असल्याने किल्ल्याचे प्रवेशद्वार बंद. बाहेरूनच धुक्यामुळे पांढरा झालेला लाल किल्ला पाहिला आणि एक टुरिस्ट बस पकडून जिवाची दिल्ली करण्यास निघालो. एक दोन स्थळे पाहिल्यानंतर गाईडने पुढील स्थऴाचे नाव घोषित केले. राजघाट! नाव ऐकून डोळे चमकले.उत्साहाने हिरवळीतून मार्गक्रमण करत समाधीस्थळाजवळ पोहोचलो. महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.तेथील वातावरण पाहून भारावून गेलो.  सोबत असलेल्या राहुलला आवर्जून माझा फोटो काढायला लावला. माझ्या मनातील  एक  अपूर्ण इच्छा पूर्ण झाली. ‘तिरस्कार ते आदरभावना’ असा दोन विरूद्ध टोकांचा प्रवास सहज होत नाही. माझ्याबाबतीत तो घडलाय. याला कारणीभूत अाहे महात्मा गांधींची ‘कृतियुक्त विचारशैली’.      शाळेत असल्यापासून भिंतीवर हसऱ्या छबीची गांधी प्रतिमा पाहत आलोय. जोडीला रंग उडालेल्या भिं...