यंदाची दिवाली



🔥🌾⛈ यंदाची दिवाली⛈🌾🔥
          🍃(आगरी काव्य)🍃

वरीसभर राबून  रिकामंच हात,
रिकामे पोटान कालचा शिला भात,
कापनीचे टायमाचा यो घाताचा म्हैना,
आरझोर पान्यानी केली शेतीची दैना,
हाताशी आलेली भातां पान्यानी भिजली,
यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली.

हत्तीचा पाऊस हत्तीसारा धावला,
उरवंला कसातरी फाटका कापर लावला,
सोनसारे कनसांना हिवाल्यान रो आला,
बारबोऱ्या पावसाला अवकाली रोग झाला,
कालंकुट ढग संगती चमकती बिजली,
यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली.

बिनवातीचा कंदिल न बिनतेलाचा दिवा,
इझलेले चुलीवर बिनभाकरीचा तवा,
सगल्यांचे दाराशी रांगोल्या न पनत्या,
आमचे दाराशी पेंढच्या गिनत्या,
फटाकरं मांगनारी पोरा फटकं खाऊन निजली,
यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली.

ⓒ तुषार म्हात्रे, पिरकोन उरण

Comments

Unknown said…
आगरी शेतकऱ्यांची खूप सुंदर व्यथा मांडलीस मित्रा.
तरीही आगरी शेतकरी इतर शेतकर्यांसारखे आपले दुःख न दाखवता हसत हसत आपले जीवन जगतो.

Popular posts from this blog

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शिलाखंडांचे ताम्रपट