पोस्ट्स

भटकंती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कान्हेरी लेण्यांची हाक

इमेज
  आंतरराष्ट्रीय सहल दिवस आणि कान्हेरी लेण्यांची हाक        दरवर्षी १८ जून रोजी जगभर ‘आंतरराष्ट्रीय सहल दिवस (International Picnic Day)’ साजरा केला जातो. कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवण्याचा हा दिवस मानला जातो. आधुनिक जीवनाच्या धावपळीतून थोडा विरंगुळा मिळावा, माणसामाणसांतील संवाद वाढावा आणि निसर्गाशी नाते अधिक दृढ व्हावे हा या दिवसामागील मुख्य हेतू आहे. अशा दिवशी सहलीसाठी एखादे ठिकाण निवडायचे झाल्यास इतिहास, निसर्ग, अध्यात्म आणि भटकंती यांचा अद्भुत संगम अनुभवता येणाऱ्या कान्हेरी लेण्या हा एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.       मुंबईच्या गजबजाटापासून काही अंतरावर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दाट जंगलात वसलेल्या कान्हेरी लेण्या केवळ दगडात कोरलेल्या गुहा नाहीत. त्या हजारो वर्षांच्या ज्ञानपरंपरेचे, साधनेचे आणि मानवी कर्तृत्वाचे जिवंत स्मारक आहेत. बेसाल्ट खडकात कोरलेल्या तब्बल १०९ लेण्यांचा हा समूह भारतातील सर्वात मोठ्या बौद्ध लेणी समूहांपैकी एक मानला जातो. इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून ते दहाव्या शतकाप...

पुरंदरच्या तहाची साक्ष देणारा कर्नाळा

इमेज
  पुरंदरच्या तहाची साक्ष देणारा कर्नाळा ११ जून हा दिवस स्वराज्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे. इ.स. १६६५ मध्ये याच दिवशी झालेल्या पुरंदरच्या तहामुळे शिवरायांना २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले. त्या यादीत कर्नाळा किल्ल्याचाही समावेश होता.       इतिहासाच्या पुस्तकात ही माहिती दोन ओळीत वाचून पुढे जाता येते; पण कर्नाळ्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर त्या दोन ओळींचे वजन वेगळेच जाणवते. समोर उभा असलेला सुळका, त्याच्या भोवती पसरलेले जंगल आणि डोंगरकड्यांवरून फिरणारा वारा यांच्यामध्ये कुठेतरी स्वराज्याच्या त्या अस्थिर काळाच्या आठवणी अजूनही दडलेल्या आहेत, असे वाटते.       कर्नाळ्याची वाट धरली की सर्वप्रथम लक्ष वेधून घेतो तो त्याचा वैशिष्ट्यपूर्ण सुळका. मुंबई गोवा महामार्गावरून जाताना तो अनेकदा नजरेस पडतो. दूरून दिसणारा हा डोंगर जवळ गेल्यावर मात्र अधिकच रांगडा आणि भव्य वाटू लागतो. डोंगराच्या कुशीत शिरताच शहराचा गोंगाट मागे राहतो आणि निसर्ग आपल्याशी हळूहळू संवाद साधू लागतो. कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतरची पायवाट म्हणजे...

वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया

इमेज
  वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया समुद्रावरून अलिबागच्या थळ जेटीकडून होडी निघते आणि थोड्याच वेळात उंदेरीला वळसा घालून खांदेरीच्या जवळ येऊ लागतो. दूरून दिसणारा दीपगृहाचा मनोरा, भोवती पसरलेले खडक, आणि लाटांवर डोलणारं बेट. किल्ल्यावर पाय ठेवताच जाणवतं, ही जागा फक्त पाहण्याची नाही, तर अनुभवण्याची आहे. खाऱ्या वाऱ्यात भूतकाळ मिसळलेला आहे. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारे हे खांदेरी बेट.     किल्ल्याच्या एका टोकाला, खडकांच्या आडोशाला वेताळदेवाचं मंदिर उभं आहे.  साधं, लहानसं देवस्थान. आत शिरल्यावर गोंगाट मागे राहतो आणि एक शांत थर मनात बसतो. मंदिरात टांगलेल्या काही घंटा दिसतात. त्यातली एक घंटा मात्र लगेच लक्ष वेधून घेते. आकाराने मोठी, धातूवर काळाचे ठसे. हात लावला की तिचा थंड स्पर्श जाणवतो आणि मग नजरेला तिच्यावरची अक्षरं दिसतात -  EMPRESS OF INDIA 1891 क्षणभर थांबावं लागतं. ही घंटा इथे कशी आली असेल ही साधी देवळातील वस्तू नाही. ती एका मोठ्या  जहाजाची घंटा आहे. एम्प्रेस ऑफ इंडिया नावाचं जहाज. १८९१ साली इंग्लंडमध...

बेलापूरचा किल्ला: मराठ्यांच्या सागरी पाऊलखुणा

इमेज
समुद्र म्हणजे विशालतेचं प्रतीक. लाटांच्या ओघात वाहणारी शांतता आणि आत दडलेली ताकद दोन्ही एकाचवेळी जाणवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या समुद्राची ताकद ओळखली आणि किनाऱ्याच्या प्रत्येक वळणावर आपले अस्तित्व उमटवले. मराठा साम्राज्य केवळ डोंगरदऱ्यांमध्ये नव्हे, तर लाटांवरही उभं राहावं, हे त्यांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या साक्षीदारांपैकी एक आहे... बेलापूरचा किल्ला. शिवाजी महाराजांनी थेट बेलापूर किल्ला जिंकला नसला तरी, त्यांनी उभारलेल्या आरमाराच्या आणि स्वराज्याच्या विस्ताराच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, हे महत्त्वाचे आहे. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला, पनवेल खाडीच्या किनारी वसलेलं बेलापूर हे गाव एकेकाळी सागरी व्यापाराचं केंद्र होतं. या खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आक्रमणांना रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी इ.स. १५६० च्या सुमारास हा किल्ला उभारला. तो काळ समुद्रावर वर्चस्व गाजवणाऱ्यांचा होता. अरब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज या सगळ्यांनी सागराच्या किनाऱ्याकडे लोभाने पाहिलं. परंतु नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने या समुद्राला स्वराज्याच्या सीमेचा भाग बनवलं. शिवर...

सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा

इमेज
सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा ठाण्याच्या गर्दीतून थोडं बाजूला वळलं की शहराचं रूप शांत होतं. सिग्नल आणि ट्रॅफिक मागे टाकत सिद्धेश्वर तलावाजवळ पोहोचलं की, वातावरणात एक वेगळी निवांतता जाणवते. त्या तलावालगत असलेलं सिद्धेश्वर राम मंदिर दिसतं आणि मंदिराच्या एका काचेच्या पेटीत एक दुर्मिळ शिल्प उभं आहे, चतुर्मुख ब्रह्मदेवाचं. १९९५ मध्ये हे शिल्प सिद्धेश्वर तलावाजवळ सापडलं. साधारण आठव्या शतकातील ही मूर्ती शिलाहारकालीन कलाशैलीचा उत्तम नमुना मानली जाते. शिल्पाची उंची साधारण साडेचार फूट असून ते काळ्या दगडात कोरलेले आहे. समोर तीन आणि मागे एक अशी ही चतुर्मुख मूर्ती आज भग्न अवस्थेत असली, तरी तिच्या प्रत्येक रेषेत त्या काळातील कलाकौशल्य जाणवतं. मूर्तीचं चेहरं शांत आणि गंभीर आहे. तीन मुखांतील प्रत्येक भाव वेगळा. एक ज्ञानमग्न, एक स्मितहास्यपूर्ण आणि एक स्थिर. पाठीमागे कोरलेलं चौथं मुख थोडं झिजलेलं आहे, पण त्या झिजेतूनही काळाचा ठसा उमटलेला जाणवतो. शिरावर कोरलेला जटा-मुकुट, कपाळावर रेषा, आणि अंगावरील अलंकार या सर्व गोष्टींमध्ये शिलाहारकालीन दगडी शिल्पकलेची मृदु लय स्पष्ट दिसते. पायाजवळ कोरलेले हंस...

खाडी आणि अडकलेली होडी

इमेज
खाडी आणि अडकलेली होडी सकाळची वेळ होती. पेण तालुक्यातल्या दादर गावात पोहोचलो तेव्हा गाव अजून पूर्णपणे जागं झालेलं नव्हतं. एखाद्या घरातून धुराची रेघ वर जात होती. खाडीकिनारी काही मच्छीमार शांतपणे आपापली कामं करत होते. पाण्याला एक विशिष्ट खारट वास होता आणि ओलसर वाऱ्यामुळे अंगावर हलका चिकटपणा जाणवत होता. समोर आमच्यासाठी उभा होता रेती वाहून नेणारा मचवा. पहिल्यांदा पाहताना तो साधाच वाटला. काळपट लाकूड. ठिकठिकाणी उडालेला रंग. काही ठिकाणी लाकडाला पडलेल्या भेगा. आत रेतीचे अवशेष. पण त्या मचव्यामध्ये एक वेगळंच आकर्षण होतं. तो पर्यटनासाठी सजवलेला नव्हता. तो रोज समुद्राशी झुंज देणारा होता. मचव्यात चढतानाच पहिली कसरत झाली. किनाऱ्यावरचं चिखलमिश्रित उथळ पाणी पार करून आत जावं लागत होतं. कुणी चप्पल हातात घेतल्या, कुणी पॅन्ट गुंडाळल्या. पाण्यात पाय टाकताच खाली मऊ चिखल सरकत असल्याची जाणीव झाली. एक क्षण तोल जाईल असं वाटलं आणि बाकीचे मित्र हसायला लागले. सगळे मचव्यात बसलो तसे इंजिन सुरू झालं. सुरुवातीला काळा धूर निघाला आणि मग मचवा हळूहळू पुढे सरकू लागला. खाडी अरुंद होती. दोन्ही बाजूंनी गर्द झाडं पाण्याच्या दिश...

पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला

इमेज
पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला  डोंगर माणसाच्या आयुष्यात केवळ भौगोलिक रचना नसतात; ते त्याच्या संस्कृतीचे, श्रद्धेचे आणि संघर्षाचे साक्षीदार असतात. प्रत्येक डोंगराच्या कड्यावर, प्रत्येक दरीत एखादी कथा दडलेली असते, कधी रणाची, कधी अध्यात्माची, तर कधी निसर्गाशी एकरूप झालेल्या मानवी अस्तित्वाची. अशा असंख्य डोंगरांपैकी रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी पर्वत एक वेगळीच ओळख ठेवतो. ११ डिसेंबरला साजरा होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या निमित्ताने या पर्वताचा मागोवा घेतला, तर तो केवळ भूगोल नव्हे तर इतिहास, पर्यावरण आणि जैवविविधतेची एकत्रित कहाणी उलगडतो. उरणजवळ समुद्राच्या सान्निध्यात उभा असलेला हा द्रोणागिरी पर्वत समुद्रकाठच्या वाऱ्याशी संवाद साधत उभा आहे. सकाळच्या सूर्यकिरणांत न्हालेला हा किल्ला पाहताना एखाद्या जुन्या योद्ध्याची छबी डोळ्यांसमोर उभी राहते. एकेकाळी यादव, पोर्तुगीज, आदिलशाही आणि अखेर मानाजी आंग्रे यांच्या हातून गेलेल्या या किल्ल्याने असंख्य संघर्ष पाहिले आहेत. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे तीन चर्च उभारली होती; त्यांच्या अवशेषांत आजही त्या काळाचे प्रतिध्वनी ऐकू येतात. पण द्र...

रात्र फिरस्ती

इमेज
 रात्र फिरस्ती रात्र म्हणजे फक्त अंधार नसतो. कधी कधी तो निसर्गाचा दुसरा चेहराही असतो. दिवसाच्या गडबडीत दिसत नाहीत अशा अनेक गोष्टी रात्री शांतपणे आपल्या समोर उलगडत जातात. १९ ऑक्टोबर २०२५ ची रात्र अशीच काहीशी वेगळी ठरली. फ्रेंड्स ऑफ नेचर अर्थात ‘फॉन’ संस्थेने आयोजित केलेल्या “रात्र फिरस्ती व वनभोजन” कार्यक्रमासाठी आम्ही चिरनेर येथील बापूजी देव देवराई परिसरात जमलो. सायंकाळचे सात वाजले होते. शहरात त्या वेळेला दिवे लागले असतील, रस्त्यांवर हॉर्न वाजत असतील. पण देवराईच्या वाटेवर मात्र वेगळंच जग हळूहळू जागं होत होतं. पहिल्यांदा अंधारात चालताना पावलं थोडी सावधच पडतात. मोबाईलचे दिवे बंद केल्यावर तर जंगल अधिक जिवंत वाटू लागलं. पानांची सळसळ, दूरवरून येणारे आवाज, कधीतरी झाडांच्या फांद्यांवरून होणारी हालचाल… प्रत्येक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेत होती. Night Trail हा शब्द ऐकायला आकर्षक वाटतो. पण प्रत्यक्षात त्या वाटेवर चालताना निसर्गाकडे बघण्याची आपली सवयच बदलत जाते. दिवसा दुर्लक्षित राहणारे छोटे छोटे जीव त्या रात्री मुख्य पात्र बनले होते. एखादा चमकणारा कोळी, पानामागे लपलेला बेडूक, ओलसर जमिनीत वाढले...