पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘दासबोधाची’ जन्मभूमी

इमेज
        दासबोध! समर्थ रामदासांचा आणि रामदासी संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ. ओवीसंख्या तब्बल ७,७५१.  एकूण वीस दशक आणि प्रत्येक दशकात दहा समास. सध्या प्रचलित असलेल्या दोनशे समासी दासबोधापूर्वी एकवीस समासांचा एक दासबोध समर्थांनी रचला होता, ज्याचा उल्लेख‘जुना दासबोध’ असा केला जातो. या ग्रंथाची महाराष्ट्रात श्रद्धापूर्वक पारायणे केली जातात. सुप्रसिद्ध साहित्यिक ‘वपु’ आपल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, “ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम ह्यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं, तरी चाललं असतं. दासबोधासारखा महान ग्रंथ, करमणूक करणारा ग्रंथ नव्हे. माणसांच्या वृत्तीतील एकही छटा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअरबाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात.” १९०५ साली धुळे येथील रामदासी साहित्याचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव ह्यांनी कल्याणस्वामीने स्वहस्ते लिहिलेली दासबोधाची प्रत प्रसिद्ध केली आणि तिला स्वतःची एक विस्तृत प्रस्तावना जोडून ह्या ग्रंथाच्या अभ्यासाची एक दिशा दाखविली. दासबोध हा केव्हा आणि कोठे रचिला गेला, ह्या प्रश्नांची उत्तरे निर्णायकप...