पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मिशीवाले मारूती

इमेज
मिशीवाले मारूती ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥'        पुराणकाळांत वर्णन केलेले हे सात चिरंजीव. हनुमंत अर्थात मारूतीराया यांपैकीच एक. यातील उर्वरीत चिरंजीवांचे ठाऊक नाही, पण हनुमंत मात्र मूर्तीरुपाने तरी चिरंजीवच झाल्यासारखा आहे. कारण भारतातील कित्येक गावांत मंदिरांमध्ये, गावाच्या वेशीवर अथवा एखाद्या पिंपळाखाली शेंदुर फासलेला, रंगरंगोटी केलेला मारुती आढळतो. दास्यभक्ती करणाऱ्यांसाठी आचार्य, मल्लांसाठी उपास्य देव, तंत्रमार्गातील दैवत आणि भूत-प्रेत-पिशाच्च बाधेपासून सोडविणारा  अशा अनेक रूपात मारुती प्रसिद्ध आहे. सुमारे साडे तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी हनुमंत उपासनेला चांगलाच उजाळा दिला, त्याचप्रमाणे उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदास यांनीही मारुती भक्तीचा भरपूर प्रचार केला. पुराणांच्या मते मारुतीच्या पित्याचे नाव केशरी व आईचे अंजनी आहे. अकराव्या रुद्राने मारुतीच्या रूपात अंजनीच्या पोटी अवतार घेतल्याचे मानले जाते. काहीवेळेस तो ‘पवनपुत्र’ म्हणूनही ओळखला जातो. पुढे हा प्रबल पराक्रमी आणि महा...

धवलारीण

इमेज
शेती व्यवसायाशी संबंधित सर्वच समाजांमध्ये सण, समारंभ साजरा करण्याचा दिवस, एकूण कालावधी शेतीकामांतून मिळणारी उसंत, उत्पादन यांवर अवलंबून असतो. भातशेती करणाऱ्या समाजाला कापणी, मळणीनंतर बऱ्यापैकी आराम मिळतो. बहुदा या कारणांमुळेच तुलसीविवाहानंतर विवाहोत्सुक उमेदवारांची लग्नकार्ये उरकली जातात. वधू, वर आणि घरच्यांची संमती या तीन घटकांचे एकमत झाले की पुढची तयारी सुरू होते. विवाहाचा अंदाजे दिवस ठरवताना आणखी एक महत्वाची बाब पाहीली जाते, ती म्हणजे या तारखेला विवाह सोहळा पार पाडण्यासाठी आवश्यक गोष्टींची उपलब्धता. यात लग्नाचा हॉल, मांडव, वाजंत्री, पुरोहीत, आचारी हे सर्व उपलब्ध होतील याची खात्री केली जाते. खारेपाटातल्या आगरी, कोळी समाजात मात्र, या सर्वांसह आणखा एका बाबीची खातरजमा केली ती म्हणजे, ‘धवलारीण उपलब्ध आहे का? धवलारीण पारंपरिक पद्धतीने लग्नातील वेगवेगळ्या विधी पार पाडत असते, त्यामुळे तिच्याशिवाय लग्नसोहळा पार पडणे अशक्यच. एखाद्या पुरोहिताप्रमाणेच काम बजावणारी ‘धवलारीण‘ म्हणजे तरी नेमकं काय? याचं एका वाक्यात उत्तर म्हणजे “धवले गाते ती धवलारीण!” अशा वेळी पुन्हा प्रश्न येईल की, ‘धवले म्हणजे क...