पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सह्याद्रीच्या जखमा : माळीणपासून इर्शाळवाडीपर्यंत...

इमेज
    ३० जुलै २०१४. पावसाची एक साधी सकाळ. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दिवस उगवण्याची चाहूल लागली होती. घराघरांत चुली पेटण्याआधीच डोंगराने एक भीषण उसासा टाकला आणि काही क्षणांत संपूर्ण गाव मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडले गेले. शेकडो जीव, स्वप्ने आणि आठवणी एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्या.        या दुर्घटनेला आता बारा वर्षे होत आली. पण प्रत्येक पावसाळ्यात सह्याद्री पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो. आपण माळीणकडून काही शिकलो का? दुर्दैवाने उत्तर समाधानकारक नाही.        माळीणपूर्वी महाड जवळील दासगाव आणि माळीणनंतर तळीये, इर्शाळवाडी आणि सह्याद्रीतील अनेक भागांत दरडी कोसळण्याच्या घटना घडतच राहिल्या. प्रत्येक वेळी आपण काही दिवस हळहळ व्यक्त करतो, मदतकार्य करतो आणि नंतर सर्व काही विसरून जातो. मात्र सह्याद्री विसरत नाही. तो आपल्या जखमा दरवर्षी पावसाच्या रूपाने पुन्हा उघड करतो. दरड कोसळणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही. ती निसर्ग आणि मानवी हस्तक्षेप यांच्यातील बिघडलेल्या संतुलनाची प्रतिक्रिया आहे. लाखो वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखी...

महाराष्ट्रातील शेतीचा प्रवास

इमेज
      महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ले, लेणी, राजे आणि युद्धांची जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा शेतीची व्हायला हवी. कारण महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर तो शेताच्या बांधावर उभे राहिल्यास अधिक चांगल्या रीतीने समजू शकतो. आज आपल्या ताटात येणाऱ्या प्रत्येक घासामागे हजारो वर्षांचा अनुभव, प्रयोग आणि संघर्ष दडलेला आहे.          मानवाने आयुष्याची सुरुवात शेतकरी म्हणून केलेली नव्हती. तो जंगलात भटकणारा, शिकार करणारा आणि कंदमुळे, फळे गोळा करून जगणारा होता. त्या काळात निसर्ग उदार होता. लोकसंख्या कमी असल्यामुळे जंगलातून मिळणारे अन्न पुरेसे होते. पण हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. उपलब्ध अन्न कमी पडू लागले. तेव्हा माणसाला एक मोठा प्रश्न पडला. अन्न शोधत फिरायचे की अन्न स्वतः निर्माण करायचे? या प्रश्नातूनच शेतीचा जन्म झाला असावा. जगात सुमारे दहा ते आठ हजार वर्षांपूर्वी नवाश्मयुगात शेतीची सुरुवात झाली, असे पुरातत्त्वीय पुरावे सांगतात.     शेतीचा शोध हा एका दिवसात लागलेला नव्हता. सर्वप्रथम माणसाने प्राणी पाळायला सुरुवात केली. मेंढ्या, शेळ्या, गायी...

उत्खनन : मातीच्या थरांत दडलेला इतिहास

इमेज
         माणसाची स्मरणशक्ती मर्यादित असते. पण मातीची स्मरणशक्ती विलक्षण असते. ती हजारो वर्षांच्या घटना, संस्कृती, व्यापार, राजकारण आणि माणसांच्या जीवनपद्धती आपल्या थरांमध्ये जपून ठेवते. या स्मृती वाचण्याचं काम उत्खनन करतं. त्यामुळे उत्खनन म्हणजे केवळ खणकाम नव्हे, तर भूतकाळाशी साधलेला वैज्ञानिक संवाद आहे.       आज पुरातत्त्वशास्त्रात उत्खनन ही अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया मानली जाते. परंतु सुरुवातीच्या काळात उत्खननाचा उद्देश अनेकदा केवळ मौल्यवान वस्तू मिळवणे इतकाच होता. बॅबिलोनचा राजा नबोनिडस याने इ.स.पूर्व सहाव्या शतकात मंदिराच्या पायाचे उत्खनन केल्याची नोंद इतिहासात आढळते. पुढे इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस आणि भारतातील उत्खननांनी पुरातत्त्वशास्त्राला नवी दिशा दिली. भारतात सर जॉन मार्शल यांनी हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या उत्खननातून सिंधू संस्कृती जगासमोर आणली आणि भारतीय इतिहासालाच नवं परिमाण मिळालं.        उत्खननाची सुरुवात कुदळ किंवा फावड्याने होत नाही. ती नियोजनाने होते. कोणते स्थळ निवडायचे, किती क्षेत्रात उत्खनन करायचे, प्रत्...