पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कशासाठी? पोटासाठी!

इमेज
  कशासाठी? पोटासाठी!          जागतिक भूक दिनाच्या निमित्ताने जगभरात उपासमार, कुपोषण आणि अन्नसुरक्षेवर चर्चा होत असताना शहरांच्या रस्त्यांवर एक वेगळंच वास्तव रोज फिरताना दिसतं. ही माणसं कोणत्याही परिषदेत दिसत नाहीत, त्यांच्यावर मोठ्या चर्चाही होत नाहीत. पण शहराच्या अर्थव्यवस्थेचा आणि पुनर्वापराच्या साखळीचा एक शांत भाग म्हणून ती रोज जगत असतात. पहाटेच्या धूसर प्रकाशात, उन्हाच्या चटक्यात किंवा पावसाच्या सरींत, तीनचाकी सायकल ढकलत भंगार गोळा करणारी माणसं शहराच्या कानाकोपऱ्यात फिरताना दिसतात. त्यांच्या सायकलीवर लोखंडाचे तुकडे, प्लास्टिकच्या बाटल्या, जुने वर्तमानपत्र, तुटलेल्या वस्तू आणि त्यासोबत आयुष्याचं ओझंही बांधलेलं असतं.         नवी मुंबईत सायकल चालवणारे जवळपास सगळेच जण पोटासाठी सायकल चालवत असतात. फरक इतकाच असतो की, एक जण आपले पोट कमी व्हावं म्हणून सायकल चालवत असतो, तर दुसरा आपलं पोट भरता यावं म्हणून. एका बाजूला सकाळी ट्रॅकसूट घालून फिटनेससाठी सायकल चालवणारे चेहरे दिसतात, तर दुसऱ्या बाजूला उन्हातान्हात तीनचाकी सायकलवर भंगार वाहत जगण्याची ध...

गायत्री आणि सविता

इमेज
  गायत्री आणि सविता           उन्हाळा यंदा अक्षरशः अंगाची लाही लाही करणारा ठरतो आहे. सकाळीच सूर्य डोक्यावर आल्यासारखा भासतो. दुपारी रस्त्यावरून चालताना पायाखालची जमीन तापलेली जाणवते आणि एखादी सावली म्हणजे जणू वरदान वाटते. पण या कडक उन्हातही एक गोष्ट सतत जाणवत राहते, सूर्याशिवाय जीवन नाही. झाडांच्या पानांपासून माणसाच्या श्वासापर्यंत सर्व काही कुठेतरी सूर्याशी जोडलेले आहे. म्हणूनच वैदिकांनी सूर्याला केवळ आकाशातील तेजस्वी गोळा म्हणून पाहिले नाही. त्यांनी त्यामागे कार्यरत असलेल्या दिव्य चेतनेचा अनुभव घेतला.  त्या चेतनेचे नाव आहे, सविता . आपण रोज म्हणत असलेला प्रसिद्ध गायत्री मंत्र हा प्रत्यक्षात सविता देवतेला उद्देशून आहे. ॐ भूर्भुवः स्वःतत्सवितुर्वरेण्यंभर्गो देवस्य धीमहिधियो यो नः प्रचोदयात् ॥ या मंत्राचा अर्थ साधा पण अत्यंत गूढ आहे.   “त्या श्रेष्ठ, तेजस्वी सविता देवतेच्या दिव्य प्रकाशाचे आम्ही ध्यान करतो. तो प्रकाश आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.” महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ गायत्री ’ हे मूळ देवतेचे नाव नाही. गायत्री हा एक वैदिक छंद आहे. तीन चरण आणि प...