पोस्ट्स

काव्यतुषार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मना गवना इरला (आगरी काव्य)

इमेज
मना गवंना इरला [आगरी 'पावसाला'] या मावलतीचे बाजूशी वारा जोशानं फिरला, धांदल उरली माझी मना गवंना इरला. कसा सांजचे वख्ताला आभ पान्यानी भरला, कावट आली तरी मना गवंना इरला. पयले पान्याचा जोर माझे अंगान जिरला, वलाधीन झालू तरी मना गवंना इरला. असा दरसालाचा पावना आला वस्तीला -हावाला, आल्या सतीर, कोठ्या डोईवरी आमी इसारलो इरला. -तुषार म्हात्रे

उधवानीची चिवणी (आगरी काव्य)

इमेज
उधवानीची चिवणी (दैनिक कर्नाळा, 9 जून 2018) उधवानीची चिवनी ( आगरी काव्य ) उभधाय यो पानी म्हनून, खाजना मी जेलो; कांडी बुरलेली शेता बघून, मनानशीच मेलो. नवा इनलेला पाग घेवून, बांधावरती चऱ्हलो; पाग तलीन न मी चालीन, असा आरवा तिरवा परलो. “पाग सलामत तं चिवनी पचास”, बोलून कसातरी उठलो; आखंदन गवं नाय म्हनून, खोशीकरं पलत सुटलो. उघरीवरती आसू मांडून, म्होटे आशंन मी बसलो; वावासंगती वाव्हून जेलो, नं दुसरे दारान फसलो. पाग फाटला आसू मोरली, खाज माझी निवली;  खाली डोबुकरी घरा हानून, फाटकी आसू शिवली; परत उधवानीला जावाचू नाय,  बोलून बाववालीकरं जेलो; शंभरची पाच चिवनी, मुकाट्यान घेऊन आलो -  तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

आमचे जीवाची माती

इमेज
🍁🍃 आमचे जीवाची माती 🍂🍁 उधानाचा पानी🌊 घरादारान घुसला नं धरनांचा पानी तोंड फिरवून रूसला😒 हिव खालीव दमभं आथा निंभाराचा चटका नं तखरं देशावरती बोलतं गारांचा फटका वारा 🌪सुटतंय तरी पुन घामाच्या धारा,😰 चइन नाय जीवाला सकाल-सांचे 🌄पारा दर्यान नाय गवं पयलेसारकी मासली,🐠 आगरी-कोल्यांची तं साली जिंदगानीच भासली.😔 रानान 🌳आथा ऱ्हाला नाय जीव नं जान,🍂 डोंगराची🗻 माती जेली ऱ्हाली नाय शान या असां कसां सगला उलटफेर झाला?🤔 पयलेसारका पुना मातोसरीचा फेरा आला!👹 डोंगर इकलंव त्याचा पैसा 💰आज मोप हाय, मातोसरीचा नाय यो माती सरलंचा🌋 कोप हाय. 🌾मालान नाय ठेवलीव यक गवताची पाती,🌱 तुमचा निसता भराव नं आमचे जीवाची माती. - तुषार म्हात्रे, पिरकोन(उरण)

यंदाची दिवाली

इमेज
🔥🌾⛈ यंदाची दिवाली⛈🌾🔥           🍃(आगरी काव्य)🍃 वरीसभर राबून  रिकामंच हात, रिकामे पोटान कालचा शिला भात, कापनीचे टायमाचा यो घाताचा म्हैना, आरझोर पान्यानी केली शेतीची दैना, हाताशी आलेली भातां पान्यानी भिजली, यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली. हत्तीचा पाऊस हत्तीसारा धावला, उरवंला कसातरी फाटका कापर लावला, सोनसारे कनसांना हिवाल्यान रो आला, बारबोऱ्या पावसाला अवकाली रोग झाला, कालंकुट ढग संगती चमकती बिजली, यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली. बिनवातीचा कंदिल न बिनतेलाचा दिवा, इझलेले चुलीवर बिनभाकरीचा तवा, सगल्यांचे दाराशी रांगोल्या न पनत्या, आमचे दाराशी पेंढच्या गिनत्या, फटाकरं मांगनारी पोरा फटकं खाऊन निजली, यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली. ⓒ तुषार म्हात्रे, पिरकोन उरण