पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काळभैरव : उग्र रूपामागची शिल्पकथा

इमेज
     पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा एक वेगळाच पौराणिक विवाह सोहळा सोशल मीडियावर रंगला. सदाशिव पेठेतील नवजवान मित्र मंडळाने श्री काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाहाचा जिवंत देखावा साकारला. पारंपरिक पोशाखातील अवंतिका आणि तिचा स्टेजवरील वावर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. संगीत आणि नृत्याने सजलेल्या या देखाव्यातील नृत्यप्रस्तुतीचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले जात आहेत.     काळभैरव अथवा कालभैरव असे नाव म्हटले की डोळ्यांसमोर साधारणपणे त्रिशूळ, डमरू, गळ्यातील मुंडमाळ आणि पायाशी असलेला कुत्रा अशी उग्र प्रतिमा उभी राहते. पण या उग्र चेहऱ्यामागे भारतीय शिल्पपरंपरेची एक विलक्षण कथा दडलेली आहे. भैरव म्हणजे केवळ भय निर्माण करणारा देव नव्हे; महाराष्ट्रातील अनेक परंपरांमध्ये तो क्षेत्रपाल, ग्रामरक्षक आणि सीमांचा पहारेकरी म्हणूनही दिसतो. शैव आगमपरंपरेत ६४ भैरवांचे आठ वर्ग सांगितले जातात आणि त्यांच्या प्रमुखांना अष्टभैरव म्हटले जाते.          भैरवाच्या उत्पत्तीची कथा सांगताना पुराणेही आपापल्या शैलीने रंग भरतात. काशीखंडातील प्रसिद्ध कथेनुसार ब्रह्...

निऑनच्या लखलखीत दुनियेत

इमेज
निऑनच्या लखलखीत दुनियेत      नवी मुंबईत रात्री फिरताना एक गंमत लक्षात येते. दिवसा अगदी साधं दिसणारं दुकान रात्री अचानक ‘स्टार’ बनतं. वाशीच्या एखाद्या सेक्टर मधली पाटी असो, सीवूड्समधलं एखादं दुकान असो किंवा बेलापूरच्या रस्त्यावरची एखादी चमचमणारी जाहिरात असो… अंधार पडला की शहराचा स्वभावच बदलतो. दिवसा माणसं दुकान शोधतात आणि रात्री दुकानं माणसांचं लक्ष शोधत फिरतात! लाल, निळा, हिरवा, गुलाबी अशा रंगांत चमकणारी अक्षरं आपल्याला खुणावत असतात. आपण त्याला सहज म्हणतो, ‘निऑन लाईट’. पण या एका शब्दामागे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि एका फ्रेंच संशोधकाची भन्नाट जिज्ञासा दडलेली आहे. त्या संशोधकाचं नाव जॉर्जेस क्लाऊड. २४ सप्टेंबर १८७० रोजी जन्मलेल्या क्लाऊड यांच्या जन्मदिनानिमित्त या चमचमाटाकडे जरा विज्ञानाच्या चष्म्यातून पाहायला काय हरकत आहे?         सुरुवातीला एक गोंधळ दूर करूया. निऑनचा शोध क्लाऊड यांनी लावलेला नाही. १८९८ मध्ये विल्यम रॅम्झे आणि मॉरिस ट्रॅव्हर्स यांनी या मूलद्रव्याचा शोध लावला. म्हणजे निऑन आधीच पृथ्वीवर होतं; क्लाऊड यांनी त्याला ‘नोकरी’ दिली! हवेचं द...

वीरगळावरचा गणपती

इमेज
        काही दगड फक्त दगड नसतात. त्यांच्यावर काळाने आपली अक्षरे कोरलेली असतात. एखाद्या मंदिराच्या पायासाठी माती उकरताना अचानक अशीच एखादी शिळा सापडते आणि शेकडो वर्षांपूर्वीचा एखादा अनोळखी माणूस आजच्या पिढीशी संवाद साधू लागतो. दोन वर्षांपूर्वी तळोजा मजकूर येथे सिद्धेश्वर शिवमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदकाम सुरू असताना सापडलेली वीरगळ अशीच इतिहासाशी संवाद साधणारी शिळा आहे. सुमारे दीड फूट लांब आणि फुटभर रुंद असलेल्या या खंडित शिळेवर तलवारीचा खणखणाट, देवभक्ती आणि एका शूरवीराच्या स्मृतीचा संगम दिसतो. या स्थळाची पाहणी केल्यानंतर मंदिर परिसरात जुन्या मंदिराच्या बांधकामातील अनेक दगड आणि शिल्पेही आढळली. काही दगड चार फुटांपेक्षाही अधिक लांबीचे होते. त्यामुळे तळोजा मजकूरचा हा परिसर केवळ धार्मिक स्थळ नसून त्याच्या पोटात जुन्या इतिहासाचे अनेक थर घेऊन बसलेला असण्याची शक्यता आहे.     वीरगळ म्हणजे एखाद्या शूरवीराच्या मृत्यूची आणि त्याच्या शौर्याची स्मृती जपणारी शिळा. महाराष्ट्रात इसवी सनाच्या साधारण दहाव्या अकराव्या शतकापासून वीरगळांची परंपरा मोठ्या प्रमाणावर दिसून येते. व...

पिठोरी: मातृत्व, स्त्रीशक्ती आणि योगिनी

इमेज
  पिठोरी: मातृत्व, स्त्रीशक्ती आणि योगिनी       श्रावणाची हिरवीगार अमावस्या... अंगणात रांगोळी, समईचा मंद प्रकाश, तांदळाची छोटीशी रास, त्यावर मांडलेल्या सुपाऱ्या आणि पूजेसाठी आणलेली तेरड्याची फुले. घरातील आई आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे पूजा करत असते. बाहेर पावसाच्या सरी कोसळत असतात आणि घराच्या उंबरठ्याआड मातृत्वाची एक वेगळीच प्रार्थना सुरू असते. हीच पिठोरी अमावस्या. लेकरांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना दीर्घायुष्य लाभावे, घरात सुखसमृद्धी नांदावी आणि वंशवेल अखंड फुलत राहावी, या भावनेतून अनेक माता या दिवशी उपवास करून पिठोरीची पूजा करतात. काही ठिकाणी जिवतीचीही पूजा केली जाते. पिठोरीशी जोडलेल्या धार्मिक कथांमध्ये आपल्या लेकरांसाठी व्याकूळ झालेल्या मातेची श्रद्धा आणि भक्ती दिसते. या कथा इतिहास म्हणून नव्हे, तर पिढ्यान् पिढ्या जपल्या गेलेल्या लोकश्रद्धा म्हणून पाहिल्या तर त्यांच्या मागची भावनिक शक्ती अधिक चांगली समजते.       पिठोरीच्या पूजेत चौसष्ट योगिनींना विशेष स्थान आहे. तांदळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून किंवा कणकेच्या छोट्या प्रति...