पोस्ट्स

पैंजण खुणा

इमेज
         बायने चिनूला हलकेच उठवले. बाहेर पडताना आतून कडी लावण्याच्या सूचना तिला दिल्या. जाताना शेजारच्या नंदाला तिने आवाज दिला. नंदादेखील आज सोबतीला येणार होती. नंदाच्या घरचा दरवाजा उघडला गेला. दारातच उभे राहून तिने येणार नसल्याचे खुणवले. पहाटेची वेळ असली तरी अंधार होता. बाहेर एकटीने जायची हिंमत नव्हती. पण फार थांबून चालणार नव्हते. उजाडायच्या आत बायला घरी परत यायचे होते. आज चिनूसाठी जाणे गरजेचे होते.            चिनू ही बायची मुलगी. ती यंदा आठवीच्या वर्गात गेली होती. चिनू चौथीला असतानाच वडीलांचे निधन झाले होते. खारपट्टयातल्या आपल्या लहान शेतात बायला आपला पती निष्प्राण अवस्थेत आढळला होता. कधी काळी जोमाने पिकणारा जमिनीचा तो लहानसा तुकडा हाच दोघींच्या विश्वाचा सध्याचा आधार होता. समुद्रातून येणारे खारे पाणी अडवणारी बांधबंदिस्ती उध्वस्त झाल्यानंतर हा उरलासुरला आधारही खाऱ्या पाण्यात नासून गेला. त्यामुळे दोघींचे पोट भरण्यासाठी बाय अधूनमधून मिळणाऱ्या मजुरीच्या कामांबरोबरच, खाडीकिनारी मासेमारी करायची. कधी ‘आसू’ म्हणून ओळखले जाणा...

जॅक स्पॅरो आणि ब्लॅक पर्ल

इमेज
          तो कपटी आहे, ढोंगी आहे, स्वार्थी आहे, पैशाचा लालची आहे, दारूडा देखिल आहे. त्याचा अवतारही रांगडा आणि अस्वच्छच! एखाद्या खलनायकाला जितकी विशेषणे लावता येतील तितकी त्याला चपखलपणे बसतात. तो लढवय्या असला तरी पळपुटादेखिल आहे. तरीही पडद्यावरील त्याचा वावर हवाहवासा वाटतो. 2003 साली टेड इलियट आणि टेरी रॉस्सीयो या दोघांच्या कल्पनेतून साकारलेला हा अवलिया म्हणजे ‘जॅक स्पॅरो ...  सॉरी! ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’! ‘पायरेटस् ऑफ दी कॅरेबियन’ या फँटसी प्रकारातील चित्रपटाचा हा आधारस्तंभ. ‘समुद्री चाचे आणि त्यांचा संघर्ष’ या जोडीला ‘अॅक्शन, थ्रीलर, रोमान्स, कॉमेडी’  अशा चविष्ट मसाल्याने भरलेले हे कथानक. दशकापूर्वी ‘पायरेटस ऑफ दी कॅरेबीयन: कर्स ऑफ ब्लॅक पर्ल’ने सुरू झालेल्या या मनोरंजक समुद्री प्रवासाने तब्बल पाच कथानकांची मेजवानी प्रेक्षकांना दिली.   काळाप्रमाणे मनोरंजनाचे तंत्र बदलले, परंतु जॅकच्या करामतींचे तंत्र अजूनही जगभरातील प्रेक्षकांना आपल्यापर्यंत खेचत आहे. चित्रपटाची कथा काहीही असो जॅकच्या भूमिकेतील जॉनी डेप  नेहमीच सर्वांना भावत आला ...

उत्सव गणरायाच्या विवाहाचा!

इमेज
     शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय; कैलासावरील हे लहान आणि सुखी कुटुंब! सर्वसामान्यपणे मुले मोठी झाल्यावर त्यांचा विवाह करणे ही मात्यापित्यांची इच्छा असते. भगवान शंकर आणि पार्वतीलाही तशीच इच्छा वाटणे स्वाभाविकच आहे. शिवपुराणातील एका कथेनुसार एकदा गणेश आणि कार्तिकेय हे दोघेही, ‘कोणाचा विवाह आधी होणार?’ असे म्हणून वाद घालू लागले. आपल्या मुलांचा वाद संपावा म्हणून शंकर-पार्वतीने त्यांना संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा जो कोणी प्रथम पूर्ण करेल त्याचा विवाह आधी होईल, असे सांगितले. कार्तिकेय लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेला. चतुर गणपती बाप्पाने मात्र आपल्या आई-वडीलांना एका आसनावर बसवून मनोभावे पूजा केली, प्रदक्षिणा घातली आणि आपल्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शंकर-पार्वतीला हे रुचले नाही. परंतु गणरायाने  वेद आणि शास्त्रांचे दाखले देऊन ‘जो कोणी आपल्या मातापित्यांना प्रदक्षिणा घालेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळेल’ असा युक्तिवाद केला. गणेशाच्या या बोलण्यावर शंकर-पार्वती निरुत्तर झाले. हा सारा प्रसंग ब्रम्हदेवांच्या कानावर गेला. ते गणेशाच्या बुद्धिचातुर्याने अत्यंत प्रभ...

बॉम्बे डाक ते बॉम्बे डक

इमेज
“तू धरती पे चाहे जहा भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा...”       कुमार सानू-अलका याज्ञिक या द्वयींच्या सुवर्णकाळातील हे सुप्रसिद्ध गीत. डोक्याला पट्टी बांधलेल्या रांगड्या सनी देओलला नाचवण्याचा करिष्मा करणारा हा ‘जीत’पट. आपले डोळे बंद असतानाही आपल्या नायिकेला ओळखण्याचा दावा या गीतातला नायक करतो. या नायकाच्या म्हणण्याप्रमाणे  डोळे बंद केल्यानंतरही एखाद्याचे अस्तित्व खरंच जाणवू शकते का? याचे उत्तर आपण जाणतोच. आपल्या सभोवताली अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यांची ओळख डोळे बंद असतानाही होऊ शकते. काही गोष्टींच्या ओळखीसाठी त्यांचा गंधच पुरेसा असतो. समुद्री जगतातील असाच एक जीव आहे, जो धरतीवर कुठेही असला तरी त्याच्या ‘खुशबू’(!) वरून लगेच ओळखू येतो. तो जिवंत, बर्फात टिकवलेला किंवा वाळलेला; कसाही असो, लक्ष वेधतोच. या तिन्ही अवस्थांत केवळ वासानेच समोरच्याला आपली दखल घ्यायला लावणारा हा समुद्री जीव म्हणजे ‘बोंबील’. पक्षी नसूनही बॉम्बे डक (Bombay Duck) या वेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या माशाची नामकरण कथाही थोडी हटकेच आहे. फारूख धोंडी यांच्या 1990 सालच्या ‘बॉम्बे ...

मामाघरचा चिकू!

इमेज
                 गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर मामाचे गाव. लहानपणी झुकझुक गाडी केवळ चित्रातच पाहिलेली, त्यामुळे मामाकडे जाण्यासाठी एकतर राज्य महामंडळाची ‘लालपरी’ नाहीतर आपली ‘चाल’ बरी! शनिवारी शाळा सुटली की लगेच कपडे बदलून आमचा मोर्चा ‘कळंबुसरे’ या मामाच्या गावाकडे वळायचा. माझ्यासारखीच इतर भाचेमंडळीही या मोर्चात सामिल व्हायची.          जुन्या पद्धतीची नळीची कौले असलेल्या घरात हा गोतावळा जमा व्हायचा. रस्त्यापासून थोड्या उंचावर मोठ्या टेकाडावरील हे घर. या घरात इतक्या मोठ्या प्रमाणावरील खटपटी लोकसंख्या नियंत्रणात राहणे तसे कठीण काम. परंतु प्रत्येकाच्या वयोमानानुसार  योग्य तो खेळ उपलब्ध व्हायचा. आपला देश तसा क्रिकेटवेडा, त्यामुळे देशहितासाठी मीसुद्धा याच खेळाची निवड करायचो. मामाच्या घरचे अंगण, ज्याला आम्ही खळं म्हणतो ते तसे मोठे असले तरी एकूण क्रिकेटच्या मैदानाच्या तुलनेने लहानच. त्यामुळे या  कठीण परिस्थितीत मी आणि मामाने राष्ट्रीय खेळभावनेशी तडजोड करुन ‘अंडरआर्म’ या  क्रिकेट प्रकाराची निवड केली....

सूर्यग्रहण आणि दानसंस्कृती

इमेज
    २०१९ या वर्षाची अखेर जवळ आली आहे. यावर्षीचं अखेरचं सूर्यग्रहण येत्या २६ डिसेंबरच्या मार्गशीर्ष अमावस्येला होईल. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ६ जानेवारीला तर दुसरे २ जुलैला होते. २६ डिसेंबर रोजीचे हे सूर्यग्रहण भारतासोबतच सौदी अरब, कतार, इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया, सुमात्रा, फिलीपाईन्स, सिंगापूर आणि गुआम इथेही दिसणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येऊन चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते, तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्यासारखे दिसते. सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले, तर ‘खग्रास सूर्यग्रहण’ आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेलेे, तर ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ होते. भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे. खरेतर ग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना. परंतु विज्ञानासह ज्योतिष आणि धार्मिक दृष्टीनेही ग्रहणकाल महत्त्वाचा समजला जातो. सामान्यपणे धार्मिक दृष्ट्या सूर्यग्रहण हे अशुभ मानले जाते. ग्रहणाला अशुभ मानन्यातून, त्यापासून आपल्याला अपाय होऊ...

हातपाटीच्या हातावरील पोट!

इमेज
हातपाटीच्या हातावरील पोट!         दीर्घ श्वास घेऊन शिडशिडीत अंगाचा, कांती रापलेला एक मनुष्य थोड्या उथळ समुद्राचा तळ गाठतो. त्याच्या हातात दोरखंडांनी बांधलेली एक प्लास्टिक फायबरची मजबूत घमेलेवजा पाटी आहे. आपल्या ताकदीच्या बळावर तो समुद्रतळाची वाळू खरवडून घमेले भरतो. पृष्ठभागावर तरंगणाऱ्या मचव्यापासून एक काठी तळापर्यंत सोडलेली आहे. घमेले भरल्याबरोबर तो मनुष्य विशिष्ट प्रकारे काठी वाजवून आपल्या वरच्या साथीदारांना इशारा करतो. इशारा मिळताच मचव्यावरील माणसे वाळूने भरलेले घमेले वर खेचून घेतात. या वाळूसरशी पाण्याखालील व्यक्तीदेखील वर येते; पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेण्यासाठी.... बांधकामासाठी लागणारी रेती हातपाटीच्या साह्याने उपसा करणाऱ्यांची ही कथा. यालाच डुबी पद्धतीने रेती काढणे असेही म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात उरण, पेण, अलिबाग पासून ते अगदी माणगाव, महाड पर्यंतच्या समुद्रकिनारी या पद्धतीने वाळू काढली जाते. केवळ समुद्रच नव्हे तर अगदी खाडी व नदीपात्रातूनही वाळू उपसा होत असतो.         बऱ्यापैकी साठवणक्षमता असलेला मचवा (होडी), पाटी, दोरखंड, बांबू, ...

रयत: शतकानंतरची पहाट

इमेज
रयत: शतकानंतरची पहाट        दिवस होता विजयादशमीचा. एकोणिसशे एकोणिस सालातल्या ऑक्टोबरच्या चार तारखेचा प्रसंग. भाऊराव पायगौंडा पाटील नावाच्या कर्मवीराने कराड तालुक्यातील काले गावात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही घोषणा सर्वसामान्य रयतेला उत्कर्षाची संधी मिळवून देणारी ठरली. ही घोषणा होती रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची. स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात बहुजनांसाठी, ग्रामीण भागातील जनतेला सुशिक्षित करण्याचे काम या संस्थेने केले. स्वत:च्या मालकीची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव 'रयत शिक्षण संस्था' असणे स्वाभाविकच होते. अथांग विस्तारणारा व दीर्घायुष्य लाभलेला वटवृक्ष या संस्थेचे बोधचिन्ह आहे. आजघडीला जवळपास साडेचार लाख विद्यार्थी या वटवृक्षाच्या छायेत अध्ययन करत आहेत. सातशेहून अधिक शाखा आणि सुमारे सोळा हजार कर्मचारी वर्ग यामुळे ही संस्था आशिया खंडात विस्ताराने सर्वात मोठी शिक्षणसंस...

‘अज्ञात’ मराठी वीर दौडले सात

इमेज
‘अज्ञात’ मराठी वीर दौडले सात!      १९१८ सालातल्या नोव्हेंबर महिन्यातला अकरावा दिवस. सकाळी १० वाजून ५९ मिनिटे झाली असताना एक अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. त्याच्या मृत्यूनंतर  मिनिटाभरातच सर्व युरोपभर युद्ध बंदी लागू झाली. सव्वा चार वर्षे अविरत चाललेले हे विनाशकारी युद्ध संपले. युरोपमधील चर्चमधून घंटानाद करून ही बातमी जनतेला कळवली गेली. गेली दोन वर्षे बंद असलेल्या लंडनच्या प्रसिद्ध बिग बेन या घड्याळाने सकाळी ११.०० वाजता पुन्हा एकदा टोल दिले. सर्व युरोपभर शांतता पसरली; अर्थातच काही काळापुरती. हा घटनाक्रम आहे पहिल्या महायुद्धाचा. या महायुद्धात एकूण २४ लहान मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला. अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडातील कुठला न कुठला देश ह्या युद्धात सामील होता. युद्ध संपे पर्यंत ह्यात दोन्ही बाजूचे मिळून साधारणपणे दीड कोटीहून अधिक लोक मरण पावले तर त्याहून अधिक लोक जखमी झाले. शंभर वर्षापूर्वीचा काळ पाहता ही आकडेवारी भीषण आहे. पहिल्या महायुद्धाचा खर्च तब्बल ३३८ अब्ज डॉलर्स झाला. तोही १९१८ मध्ये. २०१९ मध्ये हा खर्च काढायचा झाल्यास किती हो...

दिन दिन दिवाळी!

इमेज
दिवाळीवर प्रभाव कृषी संस्कृतीचा! ( मुंबई सकाळ, रायगड टुडे 26 ऑक्टोबर 2019 )        आपल्या संस्कृतीला ‘सण-कृती’ म्हणावे लागेल इतक्या मोठ्या संख्येने विविध प्रकारचे सण, उत्सव शहरी आणि ग्रामीण भागात सातत्याने साजरे होत असतात. कधी आवड आहे म्हणून, तर कधी सवड आहे म्हणून आपला समाज रोजची चाकोरी सोडून या सणांमध्ये सहभागी होत असतो. दिवाळी देखील या सणांपैकीच एक. सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणावर रायगडच्या ग्रामीण भागात मात्र इथल्या कृषिसंस्कृतीचा मोठा प्रभाव जाणवतो. मुलांच्या  हातात फुलबाजी आली की ती गोलगोल फिरवत ‘दिन दिन दिवाळी’ हे गाणे आपसूकच तोंडावर येते. “दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी...”  परंपरेने चालत आलेले हे गाणे ग्रामीण कृषीसंस्कृतीतील आहे. रायगड जिल्ह्यात पूर्वी गावाकडे घराघरातले गोवारी म्हणजेच गुराखी आपापली गुरे-ढोरे घेऊन रानात जायचे. तिथे त्या गुरांना वाघ, बिबटे यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे...