पोस्ट्स

वीरगळ : वीरांचे दगड

इमेज
वीरगळ : वीरांचे दगड (नवे-गांव आंदोलन मासिकाच्या ‘दगडांच्या देशा’ विशेषांकात प्रसिद्ध लेख)       रानेवने, गिरीदुर्गांच्या अनघड वाटा असोत की खेडोपाड्यातल्या मळलेल्या वाटा असोत, या मार्गाने निरूद्देश भटकत राहणाऱ्या मुसाफीरांना नेहमीच खुणावणाऱ्या काही गोष्टी असतात. या वरकरणी मूक आणि निर्जीव भासणाऱ्या गोष्टी भटक्यांशी बोलतात देखील. राकट-कणखर आणि दगडांच्या मानल्या जाणाऱ्या महराष्ट्रदेशी खेड्यांच्या वेशीजवळ, मंदिरांजवळ असेच मूक पण इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंगांबद्दल भाष्य करणारे ‘दगड’ आढळतात. कित्येकदा अशा कोरीव दगडांवरील शिलापट आपण कुतूहल म्हणून पाहतो आणि नंतर विसरूनही जातो. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील हे महत्त्वपूर्ण दगडी पुरावे दुर्लक्षामुळे कालांतराने मातीत मिसळून जातात.   भारतात प्राचीन काळापासून स्मृती जपण्यासाठी स्मारके उभारण्याची प्रथा आहे. समाधी, वृंदावन, स्मृतीस्तंभ, देऊळ, शिवलिंग असे विविध प्रकार यात आहेत. असाच एक चित्रांकीत स्मृतीदगड म्हणजे ‘वीरगळ’. आता हे ‘वीरगळ’ म्हणजे काय? या दगडाला एवढे महत्त्व का द्यावे?  “एखाद्या शूरव...

मेस्सी जैसा कोई नही

इमेज
मेस्सी जैसा कोई नही समस्त फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिलेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खऱ्या अर्थाने रंगात येत असताना बलाढ्य मानल्या जाणाऱ्या संघांचा बेरंग व्हायची वेळ आली आहे. विजेतेपदाचे दावेदार आणि गत वर्षीचा विजेता संघ जर्मनी साखळीतच गारद झाला. तर गतउपविजेत्या अर्जेंटिनावरही स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की आलीय. अर्जेंटिनापाठोपाठ पोर्तुगाल आणि स्पेनचे संघही परतीच्या प्रवासाला लागलेत. मेस्सी आणि रोनाल्डो या स्पर्धेत यापुढे पहायला मिळणार नाहीत याची चाहत्यांना खंत तर आहेच, पण  मॅराडोनानंतर केवळ अर्जेंटीनाच नव्हे तर संपूर्ण जगाला वेड लावणारा मेस्सी पुढील विश्वचषकात खेळण्याची शक्यताही कमीच वाटते. त्या अर्थाने लिओनेल मेस्सीचा हा अखेरचा विश्वचषक. फुटबॉल या खेळावर अधिराज्य गाजवणाऱ्या या खेळाडूला जगज्जेत्या संघाचा कधीच भाग होता आले नाही ही सल त्याला कायम राहील. यंदाच्या विश्वचषकातील अखेरचा सामना गमावल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सर्व काही सांगून जात होते. एका सामान्य कुटूंबातील मुलगा ते एक उच्च दर्जाचा फुटबॉलपटू हा त्याचा प्रवास कसा होता? “जेव्हा तुम्ही या लहान...

देवाचा गाव

इमेज
देवाचा गाव ( उरण-पेण रस्त्यातील एक दैवी मार्ग) उरणहून पेणकडे जाताना नेहमीचा रस्ता सोडून वशेणी गावाजवळून उजव्या हाताच्या वळणाकडे पाहीलं की ‘दादर’ असे लिहलेला एक  दिशादर्शक बाणाचा फलक दिसतो. या बाणाची आज्ञा पाळून वाट पकडली की एक पक्का डांबरी रस्ता आपले स्वागत करतो. रस्त्यावर टाकलेला कचरा चुकवत निघायचं. थोडंसच अंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला पसरलेली खारजमिन दिसते. नाकाला खारा वारा झोंबू लागतो. मोकळ्या रस्त्यावर वाहनाने थोडा वेग घेताच समोर उरण आणि पेण तालुक्याला जोडणारा खाडीपूल समोर येतो. खारफुटीच्या हिरवाईने वेढलेला, दूरवर पसरलेला जलाशय आपल्याला थोडा वेळ थांबण्यासाठी खुणावतो. सूर्योदय-सूर्यास्त अशा दोन्ही वेळेस इथले सौंदर्य अप्रतिम भासते. या परिसरातील दृश्यश्रीमंतीच्या प्रेमात पडल्याने इथे शाहरूख खानने आपल्या ‘रईस’ चित्रपटातील काही भागाचं चित्रीकरण केले होते. या सौंदर्यांला सावधपणे न्याहाळत एक मोठे वळण घेऊन आपण उतरू लागतो. या मार्गाने उतरल्याबरोबर आधीच्या सभोवतालातील बदल जाणवतो. रस्त्यावर सांडलेली वाळू ही जाणीव अधिक तीव्र करते. चक्क रस्त्याला लागून पार्क...

मना गवना इरला (आगरी काव्य)

इमेज
मना गवंना इरला [आगरी 'पावसाला'] या मावलतीचे बाजूशी वारा जोशानं फिरला, धांदल उरली माझी मना गवंना इरला. कसा सांजचे वख्ताला आभ पान्यानी भरला, कावट आली तरी मना गवंना इरला. पयले पान्याचा जोर माझे अंगान जिरला, वलाधीन झालू तरी मना गवंना इरला. असा दरसालाचा पावना आला वस्तीला -हावाला, आल्या सतीर, कोठ्या डोईवरी आमी इसारलो इरला. -तुषार म्हात्रे

उधवानीची चिवणी (आगरी काव्य)

इमेज
उधवानीची चिवणी (दैनिक कर्नाळा, 9 जून 2018) उधवानीची चिवनी ( आगरी काव्य ) उभधाय यो पानी म्हनून, खाजना मी जेलो; कांडी बुरलेली शेता बघून, मनानशीच मेलो. नवा इनलेला पाग घेवून, बांधावरती चऱ्हलो; पाग तलीन न मी चालीन, असा आरवा तिरवा परलो. “पाग सलामत तं चिवनी पचास”, बोलून कसातरी उठलो; आखंदन गवं नाय म्हनून, खोशीकरं पलत सुटलो. उघरीवरती आसू मांडून, म्होटे आशंन मी बसलो; वावासंगती वाव्हून जेलो, नं दुसरे दारान फसलो. पाग फाटला आसू मोरली, खाज माझी निवली;  खाली डोबुकरी घरा हानून, फाटकी आसू शिवली; परत उधवानीला जावाचू नाय,  बोलून बाववालीकरं जेलो; शंभरची पाच चिवनी, मुकाट्यान घेऊन आलो -  तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

चिरनेर : झाकलेला आणि राखलेला इतिहास

इमेज
चिरनेर : झाकलेला आणि राखलेला इतिहास         गाभाऱ्याच्या पायऱ्यांचा थंडगार स्पर्श, दगडी दिव्याचा मंद प्रकाश आणि वर्तुळाकार घुमटाखाली पितळी सापाने वेढलेले कोरीव शिवलींग. गळ्यात नक्षीदार पट्टे असलेल्या कलात्मक नंदीला नमस्कार करून गेल्यावर दिसणारे हे दृश्य. हे दृश्य आहे ‘ महागणपती ’ तिर्थक्षेत्र म्हणून नावारुपाला येत असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर गावातील शीव मंदिराचे. मंदिराच्या शेजारील तलाव     सुंदर अशा तलावाशेजारील या परिसरात पेशवेकालीन महागणपती मंदिर, मारूती मंदिर, पुरातन शीव मंदिर, भैरवनाथाचे मंदिर आणि जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्मारक असे बरेच काही आहे. त्याचबरोबर गावाबाहेरच्या डोंगरावरील अलिकडच्या काळात निर्माण झालेले ‘इंद्रायणी’ देवस्थानही प्रसिद्ध आहे. संकष्ट चतुर्थी आणि सुट्टयांच्या दिवशी या गावाचे रुपांतर पर्यटनस्थळात  होते. चिरनेर म्हणजे महागणपती... चिरनेर म्हणजे जंगल सत्याग्रह... चिरनेर म्हणजे इंद्रायणी देवस्थान...      पण चिरनेर म्हणजे केवळ इतकेच नाही, आणखी काहीतरी या परिसरात आहे, जे या परिसराच्या इ...

आमचे जीवाची माती

इमेज
🍁🍃 आमचे जीवाची माती 🍂🍁 उधानाचा पानी🌊 घरादारान घुसला नं धरनांचा पानी तोंड फिरवून रूसला😒 हिव खालीव दमभं आथा निंभाराचा चटका नं तखरं देशावरती बोलतं गारांचा फटका वारा 🌪सुटतंय तरी पुन घामाच्या धारा,😰 चइन नाय जीवाला सकाल-सांचे 🌄पारा दर्यान नाय गवं पयलेसारकी मासली,🐠 आगरी-कोल्यांची तं साली जिंदगानीच भासली.😔 रानान 🌳आथा ऱ्हाला नाय जीव नं जान,🍂 डोंगराची🗻 माती जेली ऱ्हाली नाय शान या असां कसां सगला उलटफेर झाला?🤔 पयलेसारका पुना मातोसरीचा फेरा आला!👹 डोंगर इकलंव त्याचा पैसा 💰आज मोप हाय, मातोसरीचा नाय यो माती सरलंचा🌋 कोप हाय. 🌾मालान नाय ठेवलीव यक गवताची पाती,🌱 तुमचा निसता भराव नं आमचे जीवाची माती. - तुषार म्हात्रे, पिरकोन(उरण)

विमला कोण होती?

इमेज
विमला कोण होती? (What’s in the name - नावात काय आहे?)               करकचून उन लागत होतं. अशा कडक उन्हातच उरणला एका लग्नसमारंभात हजेरी लावून घरी येण्यासाठी निघालो. शहरातल्या अंतर्गत रस्त्यांची कामे चालू असल्याने ‘ट्राफिक जाम’ मध्ये फसलो.  गुप्तधनाचा शोध चालल्यासारखे रस्ते खोदलेले, म्हणून नेहमीच्या मार्गाने जाण्याऐवजी उरणमधील विमला तलावाच्या बाजूने बाईक काढली. तळ्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ‘गोळा-सरबत’च्या गाडीने लक्ष वेधले. थंडगार लिंबू सरबत घेतली. चव नेेहमीपेक्षा वेगळी होती; बहुधा नजरचुकीने आज ग्लास धुतले गेले असतील! एकेक घोट घेत ( सरबताचा ) समोर तलावाकडे नजर टाकली. थंडगार पाण्यात पाणपक्षी डुबक्या मारत होते. मलाही तीच इच्छा झाली. सध्या डुंबण्यालायक वाटणारा हा तलाव कधीकाळी पिण्यालायक होता . या शहराला पिण्याच्या पाण्याचे तीन महत्त्वपूर्ण तलाव होते. त्यापैकी एक उरण-मोरा(मौर्य?) रस्त्यावर, दुसरा उरण-करंजा रस्त्यावर आणि हा तिसरा शहराच्या मध्यवर्ती - ‘विमला तलाव’ . सभोवतालच्या राखलेल्या हिरवाईने नटलेला, शांत परिसरा...

‘पुरी’कथेतील राजकुमारा...

इमेज
⚔ ‘पुरी’कथेतील राजकुमारा... (शोध हरवलेल्या राज्याचा, शोध इतिहासाच्या पाऊलखुणांचा)      दहिसरला एक सदिच्छा भेट घेऊन ‘बोरीवली वेस्ट’ला जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो. ज्या ठिकाणी जायचं ती वास्तू फारशी प्रसिद्ध नाही, स्थानिक लोकही त्याबाबत अनभिज्ञ. त्यामुळे फक्त “देविदास रोड, बोरीवली वेस्टला याल का?” असा प्रश्न  विचारला. हिंदीत होकारार्थी प्रतिसाद आला. आता ज्या वास्तूच्या शोधात मी निघालोय ते रिक्षावाल्याला हिंदीत सांगणं कठीण जाईल हे जाणून शांतपणे रस्ते शोधून देणाऱ्या गुगलताईंची मदत घ्यायचे ठरवले. हिरव्या झाडींमध्ये लपलेल्या बोरीवली पश्चिमेच्या दिशेने रिक्षा निघाली. यावेळेसच्या शोधमोहीमेत संसारातील एकमेव मार्गदर्शक आमच्या सौभाग्यवतीही सोबत होत्या. रिक्षाने मंडपेश्वर लेणींना वळसा घालताच आमच्या मोबाईलचे नेटवर्कही कैलासवासी झाले. आता इच्छित स्थळाचा शोध घेणे आणखिनच कठीण झाले. गुगल मॅपवर मागे एकदा ‘देविदास रोड’वरील एल.आय.सी. कॉलनीचे नाव वाचल्यासारखे आठवले. चालकाला एल.आय.सी. कॉलनीजवळ नेण्यास सांगीतले. त्यानेही ‘इधर पुछता हूँ-उधर पुछता हूँ’ करत  कॉलनीच्या फाटकापर्यंत क...

केसांची ‘बाल’कथा

इमेज
      परवा रस्त्याने जाताना एक बोर्ड पाहिला-‘ सीजर पार्लर ’. नाव थोडं गंमतीदार वाटल्याने पुढे अशा नावांच्या फलकांकडे आपोआप लक्ष जाऊ लागले. जेन्टस् पार्लर, हेअर ड्रेसर, मेन्स सलून पासून ते केशकर्तनालय अशा विविध नावांखाली, चकचकीत काचांआड केस कापले जात होते. झाडाखाली मोडक्या लाकडी खुर्चीत तुटपुंज्या साहित्यासह मांडलेल्या लहानशा दुकानापासून ते तारांकीत इमारतीच्या सुखयोयीयुक्त स्पा पर्यंतचे वैविध्य या केशकर्तनाच्या व्यवसायात आहे. पुरूषांच्या दुनियेतला हा नविन झगमगाट पाहून मला जुन्या दिवसांची आठवण झाली.     मी लहान असतानाच्या, केस कापण्याविषयक काही आठवणी आहेत. लहानपणी मी घरातही सर्वात लहान होतो. त्यामुळे घरातील ‘मोठे’ मानल्या जाणाऱ्या सर्वच व्यक्तींची आज्ञा पाळणे माझे परम कर्तव्य होते. केस कापण्यासारख्या वैयक्तिक बाबीतही वडीलधारी मंडळी सांगतील तोच आदेश पाळणे बंधनकारक होते. या आदेशान्वये एका व्यक्तीची निवड घरच्यांनी केली.  घरोघर जाऊन केस कापणारा एक कर्तनकार आमच्या केसांची निर्घृणपणे हत्या करायचा. शेजारच्याच गावातून येणाऱ्या या केशकर्तनकाराचे  दुकान ए...