पोस्ट्स

मोतियाने द्यावी भरून

इमेज
           मेगॅस्थेनिस हा ‘सेल्युकस निकेटर’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्यां’च्या दरबारातील एक राजदूत. याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत ‘इंडिका’ हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथात तो एकेठिकाणी म्हणतो की, “भारतात सोन्यापेक्षाही मोत्याला अधिक किंमत आहे.” अर्थात भारतीयांच्या दृष्टीने मोत्यांचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे. प्राचीन भारतीय वाङ्‌मयात मोत्यांचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदात देवांच्या अस्थिपासून मोती होतात, असे म्हटले आहे. पुढे वराहमिहीराच्या बृहत्संहिता या संस्कृत ग्रंथात ‘मुक्ताफल’ परीक्षा या प्रकरणात मोत्यांविषयी बरेच लिहिले आहे.        तसे पाहता रत्नशास्त्रानुसार मोती हे एक प्राणिज रत्न आहे. नावाप्रमाणेच ते भूगर्भात वगैरे न मिळता थेट शिंपल्याच्या शरीरातच सापडते. अन्न म्हणून शिंपले पकडताना बहुदा या चमकदार आणि आकर्षक रत्नाचा शोध मानवाला लागला असावा. पण त्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर मोती मिळवण्याच्या उद्देशानेच ही कालवे गोळा केली जाऊ लागली. जगभरात मोती तयार करणारी कालवे खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातही आढळतात. पण भारतात मात्र गोड्या पाण्यातील कालवा...

देवदिवाळी: देवांची आणि मनुष्याची...!

इमेज
देवदिवाळी: देवांची आणि मनुष्याची...!        आषाढी आणि कार्तिकी  ह्या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या. याच दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास (चतुर्मास) पाळला जातो. याच काळात कर्क संक्रांतीस सूर्याचे उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास सुरुवात होते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. थोडक्यात कर्क संक्रांतीपासून देवांची रात्र चालू होते. साधारणपणे कर्क संक्रांत येते आषाढ मासात. याच मासात रात्र असल्याने ‘देव झोपी जातात’, अशी समजूत आहे. म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. तर  कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोपेेेेतून जागे होतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ किंवा ‘देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात. तसे पाहता दक्षिणायन सहा महिन्यांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण कार्तिकी एकादशीपर्यंत चारच महिने होतात. म्हणजे, एका अर्थाने दिवस उजाडायच्या आतच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. या काळात श्रीविष्णू निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. भगवान विष...

गजलक्ष्मी आणि मंदिराचा शोध

इमेज
      काही गोष्टी नित्यनेमाने आपण पहात असतो, परंतु त्यांचे महत्त्व लक्षात न आल्याने दुर्लक्ष करतो. बऱ्याचशा ऐतिहासिक, पुरातन वस्तू आणि वास्तूंचेही असेच होते. उरण तालुक्यातील ‘पिरकोन’ या गावातही असेच काहीसे घडत आले आहे. ‘ वीरगळीं’ मुळे थोड्याफार प्रकाशात आलेल्या ऐतिहासिक ठेव्याकडे लोकांचे लक्ष गेले. शिवमंदिर परिसरात असलेल्या वीरगळींचा शोध घेत असताना मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका टेपावरील ( शेतजमिनीला लागून असलेला उंच सपाट भाग ) दोन कोरीव शिल्पांचाही विचार केला गेला. पण त्यांची रचना वेगळी असल्याकारणाने त्या वीरगळी आहेत किंवा नाहीत हे ठरवता आले नव्हते. या शिल्पांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू होता. एकसमान रचना असणारी ही दोन्ही शिल्पे ‘वीरगळ’ नसल्याचे निश्चित झाल्यानंतर नव्याने त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. मांडी दुमडून ध्यानस्थ असलेली आकृती आणि दोन्ही बाजूंनी दोन आकर्षक कोरीव हत्ती अशा स्वरूपातील हे शिल्प आहे .  या शिल्पापैंकी एका शिल्पातील आकृती ‘ चतुर्भूज ’ असल्याचे वाटत होते परंतु शिल्पाची झीज झाल्याने नेमका अंदाज बांधणे कठीण होते. या ...

सन हाय, नारली पुनवंचा...

इमेज
सन हाय, नारली पुनवंचा...       उरण तालुक्यातील करंजा परिसरातील दृश्य. शाळेतले विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या मदतीने कसलीतरी कलाकृती बनवण्यात गर्क आहेत. दोन तीन लहान बांबू, वर्तुळाकार लोखंडी सळ्या, काही जाडे भरडे कापड, सोनेरी कागदं, सोललेल्या नारळांचा भाग यांसारख्या वस्तूंची जमवाजमव चाललेली. पुरेशी सामग्री जमल्याची खात्री पटल्यानंतर उत्साहाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात होतेय. बांबूच्या पट्टयांना अंडाकृती आकार देऊन आता तो एका हातगाडीवर ठेवला जातोय. नंतर त्याला जाड कापडाने लपेटले जाईल. त्याभोवती चमकदार सोनेरी कागद चिकटवून एक भला मोठा सोन्याचा नारळ तयार होईल. ही सर्व उठाठेव चालू आहे ती येऊ घातलेल्या पौर्णिमेसाठी; ‘नारळी पौर्णिमे’साठी! समस्त कोळी बांधवांचा हा सर्वात महत्त्वाचा सण. या दिवशी येथील विद्यालयातून वाद्ये आणि लेझिमच्या तालावर पारंपारिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांच्या साथीने सोन्याच्या नारळाची मिरवणूक समुद्राच्या दिशेने निघेल. गेल्या कित्येक वर्षापासून करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या कलेच्या माध्यमातून  संस्कृतीशी नाते जोडणाऱ्या या अन...

संस्कृती नागपूजनाची

इमेज
संस्कृती नागपूजनाची!            आवास; रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरापासून अवघ्या पंधरा कि.मी. अंतरावरील नयनरम्य स्थळ. मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या रेवस, मांडवा या ठिकाणांपासून अगदी लागूनच. या स्थळाचा उल्लेख अगदी स्कंद पुराणातही आहे. अभिजित नावाचा शिवपूजक राजा येथेच स्थायिक झाला होता. या परिसरात श्री वक्रतुंड गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. कार्तिक शुद्ध चतुर्दशीला श्री नागेश्वराच्या म्हणजेच नागोबाच्या जत्रेत या वक्रतुंडाचाही छबिना उत्सव साजरा होतो. प्राचीन काळी इथे नागोबा आणि त्यांचे शिष्य बुधोबा व चांगोबा यांनी समाधी घेतल्याचे सांगीतले जाते. या साधूंची स्मृती ‘नागोबा मंदिराने’ जपली आहे. मंदिरात एक जोडी आणि एक स्वतंत्र अशा नागांच्या तीन सुंदर प्रतिमा आहेत. या मंदिराबरोबरच जवळच्या कनकेश्वर मंदिराचाही नागाशी संबंध आहे. कनकेश्वराकडे जाताना उंच डोंगरावर एक विश्रांतीचा टप्पा आहे. दगडी ओटे असलेल्या या टप्प्याला ‘नागोबाचा टप्पा’ म्हणतात. नागपंचमीला बाजूच्या घळीतून नागोबा निघतो, अशी आख्यायिका आहे. खरंतर अशा कथा आपल्या परिसराला नविन नाहीत. अनेक ...

सावित्री समजून घेताना

इमेज
सावित्री समजून घेताना     तब्बल चौदाशे मीटर उंचीवरून ती येते. येते कसली?कोसळतेच! महाबळेश्वर येथील ‘क्षेत्र महाबळेश्वर’ मंदिरातून ज्या पाच नद्यांचा उगम होत असल्याचे मानले जाते. ती यापैकीच एक. कृष्णा, वेण्णा, कोयना या तिच्या इतर मैत्रिणी वेगळ्या दिशेने वळत असताना, ती मात्र गायत्री या सवतीसंगे दुसरीकडेच तोंड वळवते. तिचा या सवतीसोबतचा संसारही फार काळ चालत नाही.  महाबळेश्वरच्या आर्थर सीट या ‘सनराईझ’ पॉईंटजवळ सुरू झालेला हा प्रवास बाणकोटच्या ‘सनसेट’ स्थळी येऊन थांबतो. आर्थरच्या दु:खद आठवणींशी जोडलेल्या या माऊलीचे नाव ‘सावित्री’. ‘आर्थर सीट’ मधील आर्थर हा अठराव्या शतकात पुणे दरबारातील रेसिडेंट पदावर असणाऱ्या सर चार्ल्स मॅलेट या अधिकाऱ्याचा मुलगा. मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी त्याने मुंबई ते बाणकोट या जलमार्गाची निवड केली. या प्रवासात आर्थर सोबत त्याची पत्नी सोफीया आणि एक महीन्याची मुलगी एलेन होती. या प्रवासादरम्यान आलेल्या वादळाने बोटीवरील १३ खलाशांसह सोफीया आणि चिमुकल्या एलेनचा करूण अंत झाला. बाणकोट येथील हिंमतगडाच्या खालच्या बाजूला मायलेकींना दफन करण्यात आल...

शरभाचे सांगणे

इमेज
शरभाचे सांगणे : शोध आवरे किल्ल्याचा           उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले, सूर्य मावळतीकडे झुकलेला. “जावं की न जावं?” अशी द्वीधा मनस्थिती झालेली. समोर डोंगर व्यापून पसरलेला विशाल वटवृक्ष, त्याच्या एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या हात पसरून आम्हाला येण्याचं आमंत्रण देत होते. तर दुसरीकडे आकाशकंदीलांप्रमाणे लटकणारी मधमाशांची पोळी भिती निर्माण करत होती. आम्ही उभे असलेल्या जागीसुद्धा अधून मधून मधमाशा घोंगावत जात होत्या.  विशाल वटवृक्ष “ मधमाशा सगळ्यांना चावत नाहीत, ज्याला चावतात त्यालाच चावतात! ” ,     काही दिवसांपूर्वीच ऐकलेले एका सहकारी मित्राचे  शब्द आठवले. मला यापूर्वी चार वेळा या मधमाशांचा(की वधमाशांचा?) प्रसाद मिळालेला. त्यामुळे ‘ज्याला चावतात त्यालाच चावतात’ हे वाक्य डेली सोपच्या कानठळ्या बसवणाऱ्या संवादांसारखे कानात घुमत होते. वटवृक्षाचे अंदाजित केंद्र पण सोबतीला असलेल्या काकाने होकार दिला, आणि दोघेही वडाच्या आतील भागाकडे निघालो. वाटेत मधाचे पोळे पडले होते, बहुधा मध गोळा करणाऱ्यांकडून ते टाकले गेले असावेत. मूळ...

कार्ला आणि व्यापारी मार्गावरील मातृदेवता

इमेज
       पावसाळ्याच्या दिवसांत लोणावळ्या नजिकच्या एकविरा आईच्या दर्शनाला जाणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होते. इथले वातावरण, भाविकांच्या भावना आणि तरूणाईचा जोश या सर्वांच्या परिपाकातून इथली गर्दी निरंतरच असते.            आई एकविरेचे सुप्रसिद्ध मंदिर वेहेरगांव जवळील कार्ले डोंगरात वसले आहे. स्तूपाच्या बाजूला एका लहानश्या गुहेत आईची तांदळा स्वरूपाची मूर्ती आहे. या देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत:, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे.                                                               मंदिरावरील एका शिलालेखात इ.स. १७८८ साली मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हर...