पोस्ट्स

पिंडीरुपातील स्मृतीचिन्हे

इमेज
पिंडीरुपातील स्मृतीचिन्हे     महान कार्य करणाऱ्या विभूतींची स्मारके सर्वत्रच उभारली जातात. आपल्या देशात अगदी प्राचीन काळापासून स्मारकांची परंपरा आहे. विशिष्ट प्रकारच्या स्मृतींना दृश्य रुप देण्याच्या प्रयत्नातून  ही पद्धत सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते. प्रदेशानुसार त्याचे स्वरूप जरी बदलत असले तरी आपल्या प्रियजनांची आठवण टिकवून ठेवणे ही भावना सर्वत्र सारखीच आहे. रायगड जिल्ह्यात स्तंभ, देवळी, छत्री, तुळशीवृंदावन, वीरगळ, सतीशिळा अशा स्वरूपातील स्मारके आढळतात. महाराष्ट्रात ज्या छत्री आढळतात, त्यातील बहुसंख्य मराठ्यांच्या काळातील आहेत. स्मारक, समाधींचे उन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्यासाठी उभारलेली मेघ-डंबरी हा छत्रीचाच प्रकार. जिल्ह्यातील रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील छत्री, पाचाडला राजमाता जिजाबाईंची छत्री आणि अलिबाग येथील कान्होजी आंग्रे यांची छत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाच्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणच्या घुमटीवजा देवळीही प्रसिद्ध आहेत. या स्मारकांसह आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार रायगड परिसरात पहायला मिळतो.     ...

प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव

इमेज
प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव !       पोलादपूर! रायगडचे दक्षिण टोक. राजधानी रायगड, शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा प्रतापगड आणि इतर लहानमोठ्या गडकोटांनी वेढलेला हा परिसर. इतर सर्वसामान्य गावांप्रमाणे इथल्या गावांनाही नवरात्रोत्सवाचे आकर्षण आहे. इथेही आश्विन महीन्याच्या प्रारंभी घराघरात घटस्थापना होते, गावोगावच्या मातेच्या मंदिरांमध्ये उत्साह, नवचैतन्य निर्माण होतो. ‘गरबा-रास-दांडीया’च्या आकर्षक चक्रात पोलादपूरही फेर घेतो. पण त्याचबरोबर या उत्सवादरम्यान ही फेर धरणारी पाऊले मोठ्या संख्येने महाबळेश्वर घाटाच्या दिशेने वळतात. या मार्गातील प्रतापगडावरील नवरात्रौत्सवासाठी महाड व पोलादपूर येथील भाविक वर्षानुवर्षे येत असतात. एकाअर्थी सातारा आणि रायगड जिल्ह्यांना सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारा हा उत्सव.   ज्या भवानी मातेच्या नावाने गडावर नवरात्रौत्सव साजरा होतो, त्या देवीच्या स्थापनेमागचा इतिहासही रंजक आहे. तुळजापूरची भवानी माता ही शिवाजी महाराजांची म्हणजेच भोसले घराण्याची कुलदेवता. त्याकाळी तुळजाभवानी मंदिर परिसरावर आदिलशाही सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ सा...

आरोग्यदायी उन्हेरे

इमेज
उन्हेरे, सुधागड         सध्या थंडीचा हंगाम चालू आहे. या थंड पण आल्हाददायक वातावरणात गरम पाण्याने स्नान करणे कोणाला आवडणार नाही? सकाळी उठल्यानंतर अथवा संध्याकाळी थकवा घालवण्यासाठी गरम पाण्याचा शेक सर्वांनाच हवाहवासा वाटतो.  हे गरम पाणी मिळवण्यासाठी जुन्या काळातील बंब, चुलीपासून ते अलीकडच्या काळातील गॅस, हिटर, गिझर या गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. या कामामध्ये सातत्याने उर्जाही खर्च होत असते. गरम पाणी मिळविण्यासाठी नेहमीची खटपट करावी लागत असताना, रोजच्या रोज आयतेच गरम पाणी मिळू लागले तर? ते ही स्वतंत्रपणे उर्जा खर्च न करता? हो, आपल्याला निसर्गत:च गरम पाणी मिळू शकते. फक्त हे गरम पाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याची वाट न पाहता आपल्यालाच या पाण्यापर्यंत पोहोचावे लागेल.       आपल्या देशात सगळीकडेच जमिनीची रचना वेगवेगळ‌ी आहे. जमिनीवरील आणि आतल्या भागातील  वैविध्यपूर्ण स्थितीमुळे एक चमत्कारिक गोष्ट पहावयास व अनुभवायास मिळते, ती म्हणजे जमिनीतील गरम पाण्याचे झरे. भारतात आढळणारे गरम पाण्याचे झरे पुरातन काळापासून मानवाला आकर्षित करीत आहेत. या पाण्य...

रायगडची शरभशिल्पे

इमेज
श्री क्षेत्र हरिहरेश्वर! दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणारे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण . हे तीर्थस्थान भारतातही महत्वाचे  मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्वाची स्थाने आहेत. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. मुख्य मंदिराच्या समोरच हे भैरवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूकडील पाषाणात कोरलेले  वाघासारखे दिसणारे दोन प्राणी आपले लक्ष वेधून घेतात. हे प्राणी तीक्ष्ण नख्या असलेले व विक्राळ तोंडाचे आहेत. यापैकी उजव्या बाजूच्या मोठ्या आकाराच्या प्राण्याने आपल्या चार पायांत चार, शेपटीत एक आणि तोंडात शेपटी धरून उचललेला एक असे एकूण सहा हत्ती दाबून धरले आहेत. याच मंदिराच्या समोरील भागात एका लाकडी स्तंभावर आणखी दोन व्याघ्ररुपातील काष्ठ शिल्प आहेत. ही सर्व शिल्पे दारावरील म्हणजेच द्वारशिल्पे आ...

रायगडचे ‘हेन्री-केन्री’

इमेज
रायगडच्या हेन्री-केन्रीची साद ऐका! “खांदेरी-उंदेरी या दोघीजणी जावा,      मधीन कुलाबा तो कैसा झेलतंय हवा...”       रायगड जिल्ह्यातील अलिबागसमोरील खोल समुद्रात असलेल्या खांदेरी- उंदेरी या दोन बेटांचे वर्णन करणारे हे गीत. दोन बेटांमधील नाते हे गीत स्पष्ट करते. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारी ही बेटे. समकालीन इंग्रजी कागदपत्रांमध्ये हेन्री केन्री (Hendry Kendry किंवा Henry Kenry) असे नामोल्लेख असलेली ही ठिकाणे अभ्यासकांना नेहमीच खुणावत असतात.  परंतु ही बेटे व त्यावरील किल्ले पाहणे मात्र सहज शक्य नसते.  उंदेरी बेटावर फारसे कोणी फिरकत नाहीत. तर खांदेरी बेट केंद्र सरकारच्या तटरक्षक दलाच्या अखत्यारीत असल्याने सामान्यजनांना ते सहज उपलब्ध नाही.  शिवकालीन जलदुर्गांपैकी एक असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी थळ या गावातून एखादी बोट ठरवून जाता येते. बोटीने निघाल्यास समुद्रात डावीकडे दीपगृह असलेली उंच टेकडी दिसते. हे खांदेरी बेट. त्याच्या उजवीकडे किरकोळ उंचीचे छोटे बेट म्हणजे उंदेरी. खांदे...

सुक्या म्हावऱ्याचा, सुखी प्रवास

इमेज
      काही गोष्टींच्या ओळखीसाठी त्यांचा गंधच पुरेसा असतो. समुद्री जगतातील असेच काही जीव आहेत, जे कुठेही असले तरी त्यांच्या वासावरून लगेच ओळखून येतात. केवळ वासानेच समोरच्याला आपली दखल घ्यायला लावणारा हा पदार्थ म्हणजे ‘सुका म्हावरा’. बोंबील, सुकट, वाखटी, बांगडे, मांदेली  अशा प्रकारची विविधता यात आहे. यातल्या बोंबील  बॉम्बे डक (Bombay Duck) या वेगळ्या नावाने ओळखला जातो.  फारूख धोंडी यांच्या नव्वद सालच्या ‘बॉम्बे डक’ पुस्तकात या नावाचा उल्लेख आलाय. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरूवातीच्या दिवसांतील ही कथा आहे. त्यावेळेस मुंबईतील मासळी रेल्वे मार्गाने भारताच्या इतर भागात पोहोचवण्यास सुरूवात झाली होती. सुकवलेले बोंबील पेट्यांमध्ये भरून त्यांचे पार्सल वितरणासाठी पाठवले जायचे. या पेट्यांवर रेल्वेची ओळख म्हणून बॉम्बे डाक (Bombay Dak) असे लिहले जायचे. पुढे या पेटीवरच्या नावानेच आतल्या माशाला ओळखले जाऊ लागले, ज्याचे कालांतराने बॉम्बे डक असे नुतनीकरण झाले. सुका बोंबील हा मांसाहाऱ्यांच्या स्वयंपाकघरातील प्रमुख मासा असला तरी हे खवय्...

खुन्याची आरी: एका गुहेचा पुनर्शोध

इमेज
           “कधी जायचं?”   या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. ‘शोध’ या आवडीच्या गोष्टीसाठी सवड काढावीच लागते. तसेही जायचे ठिकाण मुख्य रस्त्यापासून फार अंतरावर नाही. पण तिथे जाण्यासाठी शब्दश: वाट वाकडी करावी लागते. यावेळेस किल्ले संवर्धनाच्या कामात सातत्याने राबणारा, पायाला भिंगरी लागल्यागत भटकणारा विजय आणि ऐतिहासिक गोष्टी शोधक नजरेने, कॅमेऱ्याने टिपणारा अभिषेक या दोघांसोबत ही शोधमोहीम राबवायची ठरली.       कळंबुसरे गावाच्या पश्चिमेस आणि मोठीजुईच्या दक्षिणेस असणाऱ्या डोंगरावर ’ खुन्याची आरी ’ नावाची जागा आहे.  डांबरी रस्ते निर्माणाच्या आधी या डोंगराच्या कडेने रहदारीचा रस्ता होता. नावाप्रमाणेच या रस्त्याला लुटमार होऊन ‘खून’ व्हायचे म्हणून ‘खुन्याची आरी’ नाव पडल्याची एक कथा सांगीतली जाते; तर रस्त्याला विशिष्ट खुण असलेली जागा म्हणूनही हे नाव पडले असावे असाही एक ‘अंदाज’ आहे. याच जागेत ही गूढ ‘पांडवांची गुहा’ आहे. उरण तालुक्यातील कळंबुसरे हे शिलाहारकालीन गधेगळ, स्तंभ आणि जुने शिवमंदिर असणारे गाव याच शिवमंदिराजवळ बाईक ठेवून संध्याकाळच्या सुमार...

इस सिमेंट में जान है!

इमेज
    “ इस सिमेंट में जान है! ” असे म्हणत आपल्या सिमेंटची वैशिष्ट्ये सांगणारी जाहीरात आठवत असेल. या कंपनीचे सिमेंट वापरून केलेले बांधकाम किती मजबूत आहे, हे ग्राहकांच्या मनात ठसवण्यासाठी अशी टॅगलाईन वापरली गेली. उत्पादनाचे वर्णन करताना अतिशयोक्तीचा वापर करण्याची अशी पद्धत जवळपास सर्वच कंपन्या वापरतात. ‘ सिमेंट में जान’ वाले पण यातलेच.  पण प्रत्यक्षात ‘सिमेंट में जान’ असणारी एखादी गोष्ट असल्याबद्दल आपल्याला कोणी सांगीतली तर? ती देखील आपल्या घरात? होय, सिमेंटसदृश निर्जीव गोष्टींनी वेढलेली परंतु आतून सजीव असलेली ही गोष्ट आपल्या सभोवतालीच आढळते.                             घराची साफसफाई करताना तुम्हाला भोपळ्याच्या बी प्रमाणे चपटी, दोन्ही टोकाला निमुळता आकार असणारे लहान कोश आढळले आहेत का? विशेषत: भिंतीतील फडताळांमध्ये, बाथरूमच्या कोपऱ्यांमध्ये अशा आकाराचे पण सिमेंट-मातीचा खरखरीत स्पर्श असणारे कोश दिसतात. काळजीपूर्वक पाहील्यास कधीकधी या सिमेंटसारख्या कोशाच्या आतून बाहेर डोकावणारा जीव दिसतो. ‘सिमेंट में जान’...

शीतलादेवी

इमेज
शीतला देवी! शीतलादेवी!      महाराष्ट्रात, गावोगावीच्या वेशींपाशी शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील ग्रामदेवतांचे तांदळे पहायला मिळतात. म्हसोबा, विरोबा, वेताळदेव, बापदेव, गावदेवी यांसारख्या देवता सर्वत्रच आहेत. या देवतांपैकीच एक वैशिष्टयपूर्ण देवता म्हणजे ‘शितलादेवी’ अथवा ‘शीतळादेवी’. उरण शहरात देवीची काही मंदिरे आहेत. यामध्ये जरीमरी देवीचा समावेश असला तरी ‘उरणावती, शितळादेवी, गावदेवी’ अशी तीन नावे धारण केलेली एकच देवी देऊळवाडीत विराजमान आहे. हे या देवीचे एक पुरातन मंदिर आहे. याच तालुक्यातील दिघोडे येथील शीतलादेवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. दिघोडे-पनवेल रस्त्यानजिक असणारे हे लहानसे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरामध्ये शीतलादेवीसह इतर भग्न अवस्थेतील शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. या मूर्तींच्या आधारे हे स्थान पुरातन असल्याचे लक्षात येते. नविन पनवेल येथील शीतलादेवीचे मंदिरही सुप्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यातील शितलादेवीचे सुप्रसिद्ध स्थान कोणते? अलिबाग जवळील चौल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर शीतलादेवीचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून, त्याकाळापासून प्रसिद्ध आहे. श...