पोस्ट्स

इस सिमेंट में जान है!

इमेज
    “ इस सिमेंट में जान है! ” असे म्हणत आपल्या सिमेंटची वैशिष्ट्ये सांगणारी जाहीरात आठवत असेल. या कंपनीचे सिमेंट वापरून केलेले बांधकाम किती मजबूत आहे, हे ग्राहकांच्या मनात ठसवण्यासाठी अशी टॅगलाईन वापरली गेली. उत्पादनाचे वर्णन करताना अतिशयोक्तीचा वापर करण्याची अशी पद्धत जवळपास सर्वच कंपन्या वापरतात. ‘ सिमेंट में जान’ वाले पण यातलेच.  पण प्रत्यक्षात ‘सिमेंट में जान’ असणारी एखादी गोष्ट असल्याबद्दल आपल्याला कोणी सांगीतली तर? ती देखील आपल्या घरात? होय, सिमेंटसदृश निर्जीव गोष्टींनी वेढलेली परंतु आतून सजीव असलेली ही गोष्ट आपल्या सभोवतालीच आढळते.                             घराची साफसफाई करताना तुम्हाला भोपळ्याच्या बी प्रमाणे चपटी, दोन्ही टोकाला निमुळता आकार असणारे लहान कोश आढळले आहेत का? विशेषत: भिंतीतील फडताळांमध्ये, बाथरूमच्या कोपऱ्यांमध्ये अशा आकाराचे पण सिमेंट-मातीचा खरखरीत स्पर्श असणारे कोश दिसतात. काळजीपूर्वक पाहील्यास कधीकधी या सिमेंटसारख्या कोशाच्या आतून बाहेर डोकावणारा जीव दिसतो. ‘सिमेंट में जान’...

शीतलादेवी

इमेज
शीतला देवी! शीतलादेवी!      महाराष्ट्रात, गावोगावीच्या वेशींपाशी शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील ग्रामदेवतांचे तांदळे पहायला मिळतात. म्हसोबा, विरोबा, वेताळदेव, बापदेव, गावदेवी यांसारख्या देवता सर्वत्रच आहेत. या देवतांपैकीच एक वैशिष्टयपूर्ण देवता म्हणजे ‘शितलादेवी’ अथवा ‘शीतळादेवी’. उरण शहरात देवीची काही मंदिरे आहेत. यामध्ये जरीमरी देवीचा समावेश असला तरी ‘उरणावती, शितळादेवी, गावदेवी’ अशी तीन नावे धारण केलेली एकच देवी देऊळवाडीत विराजमान आहे. हे या देवीचे एक पुरातन मंदिर आहे. याच तालुक्यातील दिघोडे येथील शीतलादेवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. दिघोडे-पनवेल रस्त्यानजिक असणारे हे लहानसे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरामध्ये शीतलादेवीसह इतर भग्न अवस्थेतील शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. या मूर्तींच्या आधारे हे स्थान पुरातन असल्याचे लक्षात येते. नविन पनवेल येथील शीतलादेवीचे मंदिरही सुप्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यातील शितलादेवीचे सुप्रसिद्ध स्थान कोणते? अलिबाग जवळील चौल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर शीतलादेवीचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून, त्याकाळापासून प्रसिद्ध आहे. श...

गठलीचा ‘जंपिंग जॅक’

इमेज
    अलिकडच्या काळात शहरांमध्ये आनंदमेळा किंवा तत्सम नावाने भरणारे महोत्सव सतत होतच असतात. या महोत्सवांमध्ये लहान मुलांसाठी खास ‘जंपिंग जॅक’ची योजना केलेली असते. यात या मुलांना ठराविक शुल्क भरून ठराविक काळापुरत्या हव्या तशा उड्या मारता येतात. हातात कमी वेळ आणि अधिक पैसा असण्याच्या या  काळात विकतच्या उड्या असणे स्वाभाविकच आहे. अर्थात विकतच्या उड्यांचे हे चित्र सर्वत्र सारखे नाही. नवी मुंबई परिसराला शहरी झगमगाट येण्यापूर्वी इथल्या खारोपाटात चांगलाच जिवंतपणा होता. इथल्या भातशेतीमुळे शेतीपुरक व्यवसाय चांगलेच तेजीत असायचे. अशाच व्यवसायांपैकी एका अनोख्या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या लेकरांना फुकटात ‘जंपिंग जॅक’चा अनुभव मिळायचा.पेंढ्याच्या राशींच्या मोठ्या डोंगरावर वखार मालकाची नजर चुकवून उड्या मारणे हा गावातील लहान मुलांचा आवडीचा छंद. शेती आणि पशुपालन या दोन आदिम परंपरांशी संबंधित या व्यवसायाचे नाव ‘गठडी व्यवसाय’. बऱ्याच ठिकाणी त्याला ‘गठली’, ‘पावळी’ असेही म्हणतात.            रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात भातशेतीबरोबरच माळरानातील शेतामध्ये नैसर्गिक गवत...

केजीएफची सुवर्णकथा

इमेज
            स्टार यशला सुपरस्टार अशी ओळख मिळवून देणारा सिनेमा म्हणजे केजीएफ. प्रशांत नीलचे दिग्दर्शन, जबरदस्त एडीटींग आणि कोलारच्या सोन्याच्या खाणींची पार्श्वभूमी या सर्वांनी या चित्रपटाला सोनेरी यश मिळवून दिले. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या या कलाकृतीच्या दोन्ही भागांनी चांगलाच गल्ला जमवला. या मूळ कन्नड भाषेतील चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी ज्या ‘ कोलार गोल्ड फिल्डस् ’च्या अवतीभोवती हे कथानक घडते त्या खाणी मात्र खरंच अस्तित्वात आहेत. बेंगलुरू पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर केजीएफ वसले आहे.  फार पूर्वीपासूनच कोलारच्या खाणींमधून सोने मिळवले जात होते, अगदी सिंधू-संस्कृतीपासून.  ब्रिटिश काळात केजीएफ पुन्हा एकदा चर्चेत आले, जेव्हा इथे नव्याने सोन्याची खाण सापडली. या खाणींमधून त्याकाळी देशातील नव्वद टक्क्यांहून अधिक सोन्याचे उत्पादन होत होते. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस सोन्याचे खाणकाम करण्याच्या बाबतीत भारत जगात सहाव्या क्रमांकावर होता. सोन्याचे सध्याचे मूल्य पाहता ही आकडेवारी लक्षणीय आहे.  केजीएफ मध्ये इतक्या मो...

उकळणारे दगड

इमेज
‘उकळणारे दगड’            गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगाला ज्याची तिव्रतेने गरज भासली असा घटक म्हणजे ‘ऑक्सीजन’. हवेतील उपलब्ध ऑक्सीजन पुरेशा स्वरूपात मिळवू न शकणाऱ्या कोविडबाधित रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनच्या माध्यमातून  उपचार केले जात आहेत. हवेतून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळविण्याच्या काही पद्धतींपैकी ’निवडक अधिशोषण (Selective Adsorption)’ ही एक चांगली पद्धत आहे. सुप्रसिद्ध ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ यंत्रांमध्ये हे तंत्र वापरले जाते.  यात हवेसारख्या वायूंचे मिश्रण एका विशिष्ट खनिजापासून बनवलेल्या पृष्ठाच्या पात्रामधून सोडले जाते. हा खास पृष्ठभाग नायट्रोजन शोषतो. त्यामुळे या पात्रामधून जो वायू बाहेर पडतो त्यामध्ये आधीच्या तुलनेत जास्त ऑक्सिजन असते. हा पृष्ठभाग ज्या खनिजापासून बनवला जातो ती खनिजे तुम्हाला अक्षरश: रस्त्यावर सापडतील. पनवेल परीसरात राहणाऱ्यांना ही खनिजे पहायची असल्यास राष्ट्रीय महामार्ग-४बी लगत ‘डोंबाला कॉलेज’ प्रवेशद्वाराजवळील एका मोकळ्या भूखंडावर पहायला मिळतील. इथे भरावासाठी अंथरलेल्या दगडांमध्ये  काचेसारखे चमकणारे स्फटीकदगड स...

खोटा तांदूळ

इमेज
  ‘ खोटा तांदूळ’                 काठघर हे बिहारमधील एक लहानसे खेडे. नावाप्रमाणेच नदीच्या काठावर वसलेले. गावाच्या कडेने फुलहर नदी वाहते. राजमहाल टेकड्यांमध्ये वसलेले हे गाव वाहणारे लहान ओढे आणि तळी यांनी सजले आहे. उंच-सखल खाचरांतून येथे भातशेती केली जाते. इतर सर्वसामान्य गावांप्रमाणेच संथपणे इथले व्यवहार चालतात.  या शांत गावात उत्साह निर्माण होण्यासाठी एखादा लग्नसोहळाही पुरेसा ठरतो. आपल्याकडील लग्नसोहळ्यांमध्ये जशा गंमतीजंमती घडतात, तशाच या उत्साही लग्नसोहळ्यांतही घडवून आणल्या जातात. इथे लग्नानंतर गावात दाखल झालेल्या नववधूची सासरच्यांकडून एक गंमतीदार परीक्षा घेतली जाते. ही सोपी पण फसवी परीक्षा असते तिच्या पाककौशल्याची. या नववधूला तांदूळ देऊन त्याचा भात बनवायला सांगीतला जातो. या गंमतीविषयी अनभिज्ञ असलेल्या नव्या नवरीचा भात कितीतरी वेळ झाला तरी शिजत नाही. या प्रसंगाचा आनंद लुटल्यानंतर नववधूला तांदूळ न शिजण्याचे खरे कारण सांगीतले जाते. सासरच्यांनी नववधूला दिलेला न शिजणारा तांदूळ खरा नव्हताच मुळी. हा खोटा तांदूळ गावातील मुलांनी काठघरच्या ओढे ...

काष्ठशिल्प: जय-विजयचे

इमेज
                  नेहमीच्या पाहण्यातल्या गोष्टी जेव्हा आपण नव्या संदर्भाने पाहतो तेव्हा त्यातील वेगळेपणा लगेच नजरेत भरतो. गतकालीन इतिहासाचा शोध घेत असताना हे वारंवार घडते. शिलाहार काळाचा संदर्भ असलेल्या पिरकोनच्या शिवमंदिर परीसरात इतिहासातील अज्ञात पाने याच दृष्टीकोनामुळे सातत्याने प्रकाशात येत आहेत. आतापर्यंत मंदिरालगतचे विरगळ, सतीशिळा, गजलक्ष्मी, पुरातन शिवलिंग, नंदी यांबाबतचे लेखन सर्वांसमोर आले आहे. आता येथील एक लहानशी कलाकृती मंदिराभोवतीचे कुतूहल वाढवणारी ठरू शकते. ही कलाकृती एक ‘ काष्ठशिल्प ’ (लाकडी शिल्प) आहे. सद्यस्थितीत हे शिल्प मंदिरातील एका खिडकीत विराजमान आहेत. या काष्ठशिल्पांचे पुराणकाळातील संदर्भ ताडून पाहिल्यानंतर त्यांचा संबंध थेट हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपु, रावण, कुंभकर्णापर्यंत जाऊन पोहोचतो. पुराणांत वर्णीलेल्या इतक्या महत्त्वपूर्ण व सुपरिचित व्यक्तीमत्त्वांशी संबंधित असलेले हे काष्ठशिल्प आहे तरी काय? ‘ शंकर-विष्णू देवस्थान ’ म्हणून नामोल्लेख असलेल्या या मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोर भगवान विष्णूची संगमरवरातील एक आधुनिक मूर्त...

मेरा ‘पत्ता’ ही मेरी पहचान है

इमेज
अंदमान-निकोबार बेटांवर अनेक आदिवासी जमाती आढळतात. अत्याधुनिक समाजजिवनापासून दूर असलेल्या त्यांच्या जगात विविध समस्यांवर पारंपारिक ज्ञानाच्या आधारे मार्ग काढला जातो. या जमातींपैकी काही जमातींमध्ये सर्पदंश झाल्यावर एका वनस्पतीची कोवळी पाने, मुळे कुटून दंशाच्या जागी लावली जातात. त्यामुळे विषाचा प्रभाव कमी होतो असा त्यांचा दृढ समज आहे. ही वनस्पती तीच आहे जी त्यांच्या पूर्वजांनी विषारी बाणांच्या जखमांसाठी वापरली होती. रानातल्या लोकांद्वारे पूर्वापार वापरल्या  जाणाऱ्या या वनस्पतीचे नाव निवगूर. तर शास्त्रीय नाव ॲकँथस   इलिसिफोलियस (Acanthus ilicifolius). खारफुटीच्या जंगलांत आढळणाऱ्या व ‘होली’ (होळी नव्हे!) वनस्पतींप्रमाणे पानांची रचना असल्याने या वनस्पतीला इंग्रजीत ‘होली मॅन्ग्रोव्ह’ किंवा ‘सी होली’ असे म्हटले जाते. तिलाच काही ठिकाणी मारांडी, मारांडो अशा नावांनी ओळखले जाते. तर संस्कृत ग्रंथांत तिचा हरिकुस असा उल्लेख सापडतो. भारत, श्रीलंका, मलेशिया, फिलिपीन्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांत या सदापर्णी वनस्पतीचा प्रसार आहे.       ...

कांदळवनांतील वांदळा

इमेज
         दोन हजार अठरा सालच्या नोव्हेंबर महिन्यातील घटना. बंगालच्या उपसागरातून ‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडूतील नागपट्टणमच्या किनाऱ्याला धडकले. वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पाऊस यांमुळे किनारी भागाला मोठे नुकसान सोसावे लागले. या चक्रीवादळातून तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील मुथुपेठ आणि जावपास हा भाग आश्चर्यकारकरित्या बचावला. यामागील कारण शोधले असता अभ्यासकांना असे दिसून आले की, या गावांभोवती कांदळवनांचे आवरण होते. कांदळवनांनी किनारपट्टीचे रक्षण करण्याचा अनुभव तसा नवा नाही. याच कांदळवनांमुळे २००४ सालच्या त्सुनामी पासून आपल्या देशातील किनारी भागाला संरक्षण मिळाले होते.          चंद्राच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रात कांदळवने अर्थातच खारफुटीची जंगले आढळतात. विविध प्रकारच्या खारफुटी वनस्पतींनी समृद्ध असे हे जंगल ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था म्हणून ओळखली जाते. या वनांचे महत्त्व ओळखून आपल्या राज्याने कांदळवन संवर्धनासाठी वन विभागाअंतर्गत स्वतंत्र ‘कांदळवन कक्ष’(Mangrove Cell) स्थापन केला. देशामध्ये केवळ महाराष्ट्रात अ...

हार-कारा

इमेज
        मुंबई व आसपासच्या भागांतील खाडीकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. इथे सापडणाऱ्या मत्स्यप्रजातींबरोबरच मासेमारीच्या पद्धतींमध्येदेखील खूप विविधता आहे. मासेमारीच्या विविध पद्धतींपैकी ‘हाताने चाचपून मासे पकडणे‘ ही पद्धत बऱ्याचदा उथळ पाण्यात  वापरली जाते. मात्र अशा तऱ्हेने मासे पकडताना या पाण्यात आक्रमक पंजे असलेल्या खेकडा प्रजातीतील जीव आढळला तर ही पद्धत काहीशी अवघड ठरते. अशा वेळेस नेहमीचा मासेमार याच पाण्यातील एका वनस्पतीकडे हात पसरतो. या जाळीदार वनस्पतीच्या  गुंडाळीने त्या आक्रमक सागरी जीवाला झाकून तो आपले लक्ष्य साध्य करतो." मासेमारीमध्ये जीत मिळवण्यास सहाय्य करणारी ही जलीय वनस्पती ‘हार’ या वैशिष्ट्यपूर्ण नावाने ओळखली जाते. म्हणजे मासेमारांना एकप्रकारे “हार के बाद ही जीत” मिळते. यातील गंमतीचा भाग सोडला तरी आणखी काही मार्गांनी ही वनस्पती मच्छीमारांना उपयुक्त ठरते. हारांच्या आसपास थोडे मोठे मासे आढळण्याची शक्यता असते, यामुळेच बरेचसे मासेमार माशांच्या शोधात या वनस्पतीच्या जंजाळात आपले नशिब आजमावत असतात.        एकमेकांत गु...