पोस्ट्स

उर्साचा बाजार

इमेज
उर्साचा बाजार! ( नवे-गाव आंदोलन मासिकाच्या ‘आनंदोत्सव’ विशेषांकात प्रकाशित लेख) आपल्या भारतीय संस्कृतीला ‘सण-कृती’ म्हणावे लागेल इतक्या मोठ्या संख्येने विविध प्रकारचे सण, उत्सव सातत्याने साजरे होत असतात. कधी आवड आहे म्हणून, तर कधी सवड आहे म्हणून आपला समाज रोजची चाकोरी सोडून या सणांमध्ये सहभागी होत असतो. आपल्या देशात मोठ्या शहरांपासून ते लहान खेड्यांपर्यंत  विविध उत्सवांची ‘जत्रा’ कायमच भरलेली असते. या बहुरंगी देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या बहुढंगी मुंबईपासून जवळचे ‘पिरकोन’ हे गाव देखिल उत्सवप्रेमीच. या गावातही आवडीचे, सवडीचे सण-उत्सव तितक्याच साजरे होत असतात. या सर्व सणांच्या जोडीला पिरकोनमध्ये एक अनोखा उत्सव साजरा होतो. हा उत्सव म्हणजे ‘उर्स’ किंवा ऊरूस. या उर्साला अनोखे म्हणण्याचे कारण म्हणजे आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या गावात सध्या एकही मुस्लिम वस्ती नाही, तरीही गावकरी मोठ्या आनंदाने हा उर्स साजरा करतात. केवळ पिरकोनच नव्हे तर त्याच्या पश्चिमेला असणारा आवरे आणि उत्तर पूर्वेकडील मोठीजुई या गावांमध्येही असाच उरूस साजरा केला जातो. हे उर्स म्हणजे तरी काय? ...

मासा...फुग्यासारखा फुगणारा

इमेज
मासा...फुग्यासारखा फुगणारा    एका तारांकीत रेस्टॉरंटमध्ये आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा होतोय. ट्रीट म्हणून टेबलवर एका माशाचा विशेष पदार्थ येतो.  मेनुकार्डवर नजर टाकल्यावर तिथे दोनशे डॉलर्स लिहलेले दिसते.(भारतीय चलनात किती होतील हो?) ही किंमत पाहून पदार्थाची चव आणखीनच वाढते. खवय्यांच्या तोंडाला पाणी आणणारे हे दृश्य. पण थोडं थांबा... या डिशवर ताव मारण्यापूर्वी हा पदार्थ खाऊन प्रतिवर्षी मरण पावणाऱ्यांच्या संख्येकडे  एकदा नजर टाका. हा पदार्थ ज्या माशापासून बनलाय त्या माशामध्ये अत्यंत जहाल विष आहे. तब्बल तीन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतरच एखाद्या शेफला या माशाचे पदार्थ तयार करण्याची परवानगी असते. आपल्या मित्राचा जन्मदिवस साजरा करण्याच्या आनंदात आपलाच ‘मरणदिवस’ साजरा होऊ शकतो, हे कळल्यानंतर आता तुमची प्रतिक्रिया काय? असले अन्न खाणे जीवावर बेतू शकणारे असले तरी कित्येक खवय्ये हा पदार्थ खाणे प्रतिष्ठेचे समजतात. जपानमधील अनेक रेस्टॉरंटमध्ये मिळणारा हा अत्यंत जोखमीचा परंतु तितकाच चवदार पदार्थ म्हणजे ‘फुगू’. फुग्यासारखा फुगणाऱ्या माशापासून हा पदार्थ तयार केला जातो...

बालक-पालक

इमेज
बालक-पालक (मुंबई सकाळ 18 डिसेंबर       ओहोटीच्या किनाऱ्यासारखीच उघड्या शरीराची एक व्यक्ती  दलदलीतून मार्ग काढत पुढे चाललीय. चालता चालता चिखलातून काहीतरी वेचत कमरेला बांधलेल्या लहानशा भांड्यात तो जमा करतो. ते भांडे पुरेसे भरल्याची खात्री झाल्यानंतर तो चिखलातून बाहेर येतो. रस्त्यात लागणाऱ्या एका कातळावर तो आपले भांडे उपडे करतो. भांड्यातील जमा केलेले सर्व काही कातळावर चांगले रगडून, पुन्हा आपल्या भांड्यात ओततो. एका दिवसाच्या जेवणाची भ्रांत मिटल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकते.   काय होते त्याच्या भांड्यात?          मुंबईला जवळ असणाऱ्या खारेपाट परिसरातील लोकांच्या आहाराचा एक भाग असणारा, त्याच्या भांड्यातील तो पदार्थ म्हणजे ’पालक’. (हो पालकच!) प्युअर व्हेजची पाटी झळकणाऱ्या हॉटेलमधील ‘पालक-पनीर’ किंवा तत्सम पालेभाजीयुक्त पदार्थातील पालक नव्हे, तर समुद्रकिनाऱ्यावरच्या प्राणीविश्वातील ‘बालका’सारखा एक लहानसा जीव- ‘पालक’. मरीन पल्मोनेट स्लग ( Marine Pulmonate slug ) या नावाने ओळखला जाणाऱ्या या प्...

शालेय शिक्षण

इमेज
शालेय शिक्षण... आज आणि उद्या         दोन हजार सतरा सालातल्या नोव्हेंबरची घटना. कमी दर्जाचे शिक्षण दिल्याबद्दल भारतीय वंशाच्या व्यक्तीने एका विद्यापीठावर कोर्टात दावा ठोकला. तोही कुठल्या साध्यासुध्या नव्हे तर चक्क ब्रिटनमधील सुप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठावर! या दाव्यातला खरे-खोटेपणा सिद्ध होण्यास आणखी काही वेळ जाईल, पण ऑक्सफर्डसारख्या नामांकीत विद्यापीठालाही या दाव्याची दखल घ्यावी लागलीय, हे विशेष. सध्याच्या काळात  चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे  किती महत्त्वाचे आहे हे या दाव्याने अधोरेखित झाले. अर्थात आपल्या माध्यमांनी व जनतेनेही या बातमीकडे शिक्षणक्षेत्राकडे करतो तसेच दुर्लक्ष केले. ब्रिटनप्रमाणे भविष्यात आपल्या राज्याच्या ‘शालेय शिक्षणा’बाबत असे घडू शकेल का?    याचे उत्तर शोधायचे असल्यास आपल्याला पहील्यांदा  महाराष्ट्रातील ‘शालेय शिक्षणाची सद्यस्थिती’ जाणून घ्यावी लागेल. खरं तर ब्रिटनच्या जवळपास दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेबद्दल एखादे निश्चित विधान करणे म्हणजे चक्रधर स्वामींच्या ए...

सागरातील अष्टपैलू खेळाडू

इमेज
 सागरातील अष्टपैलू खेळाडू  फिफा विश्वचषक 2010 मधील अंतिम सामन्यास थोडाच अवधी बाकी होता. ऑरेंज आर्मी नेदरलँड आणि टिकी-टाका साठी प्रसिद्ध स्पेन आमनेसामने येणार होते. या प्रसंगी दोन्ही संघातील खेळाडू, त्यांचे उत्साही मार्गदर्शक आणि संभाव्य डावपेच यांविषयी फुटबॉल चाहत्यांमध्ये चर्चा होणे स्वाभाविकच होते. परंतु या धामधुमीच्या वातावरणात संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते जर्मनीकडे. नाही, जर्मनीच्या संघाकडे नाही; जर्मनीच्या ‘पॉल’ बाबाकडे. युरो 2008 स्पर्धेत आपल्या अचूक भविष्यवाणीने सर्वांना आश्चर्यचकीत करणाऱ्या ‘पॉल’ने या अंतिम सामन्यातही ‘स्पेन’ विश्वविजेता ठरण्याचे दिलेले संकेत अचूक ठरले. मनुष्यप्राण्याद्वारे दोन पायांनी खेळल्या जाणाऱ्या या खेळाचे भविष्य सांगणारा हा ‘पॉल’बाबा स्वत: मात्र आठ पायांचा(की हातांचा?) होता. हा पॉल बाबा म्हणजे समुद्री अष्टपैलू खेळाडू असणारा पॉल नावाचा ‘ऑक्टोपस’         माकळी, माकूल या स्थानिक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मोलुस्का (Mollusca) या संघातील या प्राण्याच्या सामान्य प्रजातीचे नाव आहे ऑक्टोपस व्हल्गरीस (Octopus vulgaris). डोक...

खेकड्यांचे झाड

इमेज
खेकड्यांचे झाड        भात कापणीच्या हंगामातील प्रसंग.एक शेतकरी दीर्घ श्वास घेऊन आपल्या खारजमिनीतल्या लहानशा तळ्यात बुडी मारतो. तो दिसेनासा झाल्यानंतर थोड्या वेळाने एक निष्पर्ण काटेरी झाड हळूहळू तळ्याच्या वर येते. ते झाड त्याच बुडी मारलेल्या शेतकऱ्याच्या हातात आहे. या झाडाच्या फांद्यांवर पानांऐवजी काहीतरी जिवंत वस्तू असल्यासारखे दिसते. क्षणभर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही- कारण त्याच्या हातातील संपूर्ण झाड खेकड्यांनी भरलेले असते.     खेकड्यांचे झाड? असे कुठे असते का?      पुराणकथांतील चमत्कारांनाही मागे टाकणारे हे दृश्य; इथल्या शेतकऱ्याच्या परिचयाचे. पालघर, रायगड जिल्ह्यातील खाडीलगतच्या भातशेतीच्या जमिनींमध्ये पूरक उत्पन्न म्हणून शेततळी राखली जातात. पावसाळ्याच्या दिवसांत या लहान लहान तळ्यांमध्ये विविध प्रकारचे मासे अंडी घालतात. कापणीचा हंगाम येईपर्यंत शेतातले पाणी बऱ्यापैकी कमी होत जाते. अशा वेळी शेतातील मासळी हळू हळू या तळ्यांकडे सरकत जाते. त्यामुळे येथील शेतकरी कापणीच्या हंगामात तळ्यात साठलेली, वाढलेली मत्स्यसंपत्ती...

कॅच मी इफ यू कॅन!

इमेज
कॅच मी इफ यू कॅन!      जेमतेम विशीचा वाटणारा ‘फ्रँक अबॅग्नेल’ नावाचा एक उमदा तरूण, ज्याच्या मागावर युरोप-अमेरिकेतील पोलीस आहेत. फसवणुकीचे कित्येक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. पोलीसांनी त्याच्यासाठी रचलेल्या सापळ्यात प्रवेश करतो आणि सर्वांदेखत आपला कार्यभाग उरकून अलगदपणे निसटूनही जातो. आधी पुस्तकरुपात आणि पुढे चित्रपटाद्वारे गाजलेल्या सत्यकथेतील हा प्रसंग.         इकडे मुंबई-रायगडच्या खाडीलगत काही लोक मासेमारी करण्यासाठी गळ टाकून बसले आहेत. थोड्या वेळाने पाण्यात थोडी हालचाल जाणवते. गळ काढून पाहील्यानंतर त्याला लावलेले आमिष खाऊन मासा पसार झाल्याचे समजते. या परिसरात वेळ घालवण्यासाठी किंवा पोटापाण्यासाठी गळ टाकून मासेमारी करणाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच घडणाऱ्या मत्स्यकथेतील हा दुसरा प्रसंग.        या दोन्ही प्रसंगांतील कथानायक देखणे आहेत, चलाख आहेत. एका कथेचा नायक आहे पडद्यावर आकर्षक वावर असणारा लिओनार्डो डी कॅप्रियो, तर दुसऱ्याचा आहे पाण्यावर आकर्षक वावर असणारा ‘टार्गेट फिश’. दोघेही आपल्या कृतीतून म्हणतात, “Catch me if yo...

ना बचेगा बास...

इमेज
ना बचेगा बास... एक जुनी लोककथा आहे. एका खूप दूरवरच्या देशात जिथे मासेच नव्हते, तिथला माणूस कंदमुळे, फळे आणि इतर प्राणी खाऊन आपली गुजराण करत असे. या अनोख्या जगात ‘बूडी आणि यालिमा’ नावाचे एक प्रेमी जोडपे होते. अर्थातच यालिमाच्या घरातून या प्रेमाला विरोध होता.मग, दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही दूर पळून जाण्यात यशस्वी झाले खरे, पण लवकरच त्यांना गावातील जुन्या विचारांच्या मंडळींनी गाठले. या मंडळींच्या दृष्टीने या विवाहाला एकच शिक्षा होती, मृत्यूदंड. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बूडी आणि यालिमा वाट फुटेल तिकडे पळत सुटले. पळता पळता जमिन संपली व समुद्र सुरू झाला. त्यांच्या पाठलागावर ते कर्मठ लोक होतेच. शेवटचा पर्याय म्हणून बूडीने किनाऱ्यावर पडलेल्या लाकडांचे भाले केले व ते पाठलाग करणाऱ्या लोकांवर फेकले. पण विरोधकांची संख्या खूपच जास्त होती. अखेर बूडीचे भाले संपले. विरूद्ध बाजूंनीही भाल्यांचा वर्षाव झाला. हताश बूडी आणि यालिमानं समुद्रात उडी घेऊन जीवनाचा शेवट केला.      पण लोकं म्हणतात, ते दोघे अजून जिवंत आहेत, एका माशाच्या रुपात. तो मासा लोकांची चाह...

तेरे मेरे ‘बीच’ पे

इमेज
तेरे मेरे ‘बीच’ पे! “तेरे मेरे बींच में ,कैसा है ये बंधन अंजाना...”  ऐंशीच्या दशकातील ‘एक दुजे के लिए’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील हे गीत. मनमोहक आवाज, कलाकारांचा पडद्यावरील सुरेख वावर, सोबतीला लाभलेले तेवढ्याच तोलामोलाचे संगीत आणि गूढ  शब्दरचना हे या गीताचे वैशिष्ट्य.  भाषिक आणि सांस्कृतिक भेद असूनही अज्ञात ‘बंधनाने’ बांधल्या गेलेल्या युगुलाची कहाणी या चित्रपटात गुंफली गेलीय. आपल्या सभोवतालचा निसर्गही या चित्रपटांसारखाच आहे- विलक्षण कहाण्यांनी भरलेला. त्यातील गीतांसारखाच मनमोहक आणि गूढ. या रंगीबेरंगी निसर्गपटात अशा काही अनाकलनीय गोष्टी घडत असतात की प्रत्येक वेळेस त्याचा नेमका अर्थ लावणे आपल्याला कठीण जाते. विशाल  वसुंधरेच्या पडद्यावर सर्वाधिक वावर असणारा समुद्र आणि त्याच्या पोटातील विश्व हे आपल्या जाणीवांपेक्षाही अधिकच अथांग आहे. हा अथांग सागर मानवाच्या शोधक वृत्तीस सातत्याने आव्हान देत राहतो आणि त्याला पुरूनही उरतो.       समुद्राच्या या निळ्या विश्वात सातत्याने बदल होत असतात. भरती-ओहोटी, तापमान बदल, मानवी हस्तक्षेप यांमुळे इथे नेहमीच...

स्टीव्ह आणि स्टिंग

इमेज
‘ स्टीव्ह आणि स्टिंग!’        भारतापासून दूर ऑस्ट्रेलियातल्या क्विन्सलँड समुद्रकिनारी ‘Ocean's Deaadliest’ या लघुपटाचे चित्रिकरण चालू होते. या लघुपटाशी संबंधित दोन व्यक्ती तिथल्या उथळ पाण्यात उतरल्या. त्यातील एक जस्टीन नावाचा कॅमेरामन चित्रिकरण करत होता. चित्रिकरण थांबल्यानंतर आपल्या मुलीसाठी शाळेच्या प्रोजेक्टचा एक भाग चित्रीत करण्यासाठी “एक शेवटचा शॉट!” म्हणत जस्टीनचा साथीदार पुन्हा एकदा पाण्यात उतरला. काही वेळातच पाण्यातील ती व्यक्ती एका समुद्री जीवाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली, त्या प्राण्याने काही सेकंदाच्या अवधीत शंभरहून अधिक वेळा आपल्या शेपटाचे तडाखे दिले. या हल्ल्यात जस्टीनचा साथीदार म्हणजेच ‘द क्रोकोडाईल हंटर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्टीव्ह आयर्विनचा दुर्दैवी अंत झाला. शिकारी नसलेल्या या क्रोकोडाईल हंटरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला समुद्री जीव होता ‘स्टिंग रे’.        ही घटना होईपर्यंत गावच्या मासळीबाजारात ‘पाखट’ या नावाने विक्रीस असलेला हा ‘रे’ मासा इतका धोकादायक असेल हे कित्येकांच्या गावीही नव्हते. या घ...