पोस्ट्स

सन हाय, नारली पुनवंचा...

इमेज
सन हाय, नारली पुनवंचा...       उरण तालुक्यातील करंजा परिसरातील दृश्य. शाळेतले विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या मदतीने कसलीतरी कलाकृती बनवण्यात गर्क आहेत. दोन तीन लहान बांबू, वर्तुळाकार लोखंडी सळ्या, काही जाडे भरडे कापड, सोनेरी कागदं, सोललेल्या नारळांचा भाग यांसारख्या वस्तूंची जमवाजमव चाललेली. पुरेशी सामग्री जमल्याची खात्री पटल्यानंतर उत्साहाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात होतेय. बांबूच्या पट्टयांना अंडाकृती आकार देऊन आता तो एका हातगाडीवर ठेवला जातोय. नंतर त्याला जाड कापडाने लपेटले जाईल. त्याभोवती चमकदार सोनेरी कागद चिकटवून एक भला मोठा सोन्याचा नारळ तयार होईल. ही सर्व उठाठेव चालू आहे ती येऊ घातलेल्या पौर्णिमेसाठी; ‘नारळी पौर्णिमे’साठी! समस्त कोळी बांधवांचा हा सर्वात महत्त्वाचा सण. या दिवशी येथील विद्यालयातून वाद्ये आणि लेझिमच्या तालावर पारंपारिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांच्या साथीने सोन्याच्या नारळाची मिरवणूक समुद्राच्या दिशेने निघेल. गेल्या कित्येक वर्षापासून करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या कलेच्या माध्यमातून  संस्कृतीशी नाते जोडणाऱ्या या अन...

संस्कृती नागपूजनाची

इमेज
संस्कृती नागपूजनाची!            आवास; रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरापासून अवघ्या पंधरा कि.मी. अंतरावरील नयनरम्य स्थळ. मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या रेवस, मांडवा या ठिकाणांपासून अगदी लागूनच. या स्थळाचा उल्लेख अगदी स्कंद पुराणातही आहे. अभिजित नावाचा शिवपूजक राजा येथेच स्थायिक झाला होता. या परिसरात श्री वक्रतुंड गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. कार्तिक शुद्ध चतुर्दशीला श्री नागेश्वराच्या म्हणजेच नागोबाच्या जत्रेत या वक्रतुंडाचाही छबिना उत्सव साजरा होतो. प्राचीन काळी इथे नागोबा आणि त्यांचे शिष्य बुधोबा व चांगोबा यांनी समाधी घेतल्याचे सांगीतले जाते. या साधूंची स्मृती ‘नागोबा मंदिराने’ जपली आहे. मंदिरात एक जोडी आणि एक स्वतंत्र अशा नागांच्या तीन सुंदर प्रतिमा आहेत. या मंदिराबरोबरच जवळच्या कनकेश्वर मंदिराचाही नागाशी संबंध आहे. कनकेश्वराकडे जाताना उंच डोंगरावर एक विश्रांतीचा टप्पा आहे. दगडी ओटे असलेल्या या टप्प्याला ‘नागोबाचा टप्पा’ म्हणतात. नागपंचमीला बाजूच्या घळीतून नागोबा निघतो, अशी आख्यायिका आहे. खरंतर अशा कथा आपल्या परिसराला नविन नाहीत. अनेक ...

सावित्री समजून घेताना

इमेज
सावित्री समजून घेताना     तब्बल चौदाशे मीटर उंचीवरून ती येते. येते कसली?कोसळतेच! महाबळेश्वर येथील ‘क्षेत्र महाबळेश्वर’ मंदिरातून ज्या पाच नद्यांचा उगम होत असल्याचे मानले जाते. ती यापैकीच एक. कृष्णा, वेण्णा, कोयना या तिच्या इतर मैत्रिणी वेगळ्या दिशेने वळत असताना, ती मात्र गायत्री या सवतीसंगे दुसरीकडेच तोंड वळवते. तिचा या सवतीसोबतचा संसारही फार काळ चालत नाही.  महाबळेश्वरच्या आर्थर सीट या ‘सनराईझ’ पॉईंटजवळ सुरू झालेला हा प्रवास बाणकोटच्या ‘सनसेट’ स्थळी येऊन थांबतो. आर्थरच्या दु:खद आठवणींशी जोडलेल्या या माऊलीचे नाव ‘सावित्री’. ‘आर्थर सीट’ मधील आर्थर हा अठराव्या शतकात पुणे दरबारातील रेसिडेंट पदावर असणाऱ्या सर चार्ल्स मॅलेट या अधिकाऱ्याचा मुलगा. मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी त्याने मुंबई ते बाणकोट या जलमार्गाची निवड केली. या प्रवासात आर्थर सोबत त्याची पत्नी सोफीया आणि एक महीन्याची मुलगी एलेन होती. या प्रवासादरम्यान आलेल्या वादळाने बोटीवरील १३ खलाशांसह सोफीया आणि चिमुकल्या एलेनचा करूण अंत झाला. बाणकोट येथील हिंमतगडाच्या खालच्या बाजूला मायलेकींना दफन करण्यात आल...

शरभाचे सांगणे

इमेज
शरभाचे सांगणे : शोध आवरे किल्ल्याचा           उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले, सूर्य मावळतीकडे झुकलेला. “जावं की न जावं?” अशी द्वीधा मनस्थिती झालेली. समोर डोंगर व्यापून पसरलेला विशाल वटवृक्ष, त्याच्या एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या हात पसरून आम्हाला येण्याचं आमंत्रण देत होते. तर दुसरीकडे आकाशकंदीलांप्रमाणे लटकणारी मधमाशांची पोळी भिती निर्माण करत होती. आम्ही उभे असलेल्या जागीसुद्धा अधून मधून मधमाशा घोंगावत जात होत्या.  विशाल वटवृक्ष “ मधमाशा सगळ्यांना चावत नाहीत, ज्याला चावतात त्यालाच चावतात! ” ,     काही दिवसांपूर्वीच ऐकलेले एका सहकारी मित्राचे  शब्द आठवले. मला यापूर्वी चार वेळा या मधमाशांचा(की वधमाशांचा?) प्रसाद मिळालेला. त्यामुळे ‘ज्याला चावतात त्यालाच चावतात’ हे वाक्य डेली सोपच्या कानठळ्या बसवणाऱ्या संवादांसारखे कानात घुमत होते. वटवृक्षाचे अंदाजित केंद्र पण सोबतीला असलेल्या काकाने होकार दिला, आणि दोघेही वडाच्या आतील भागाकडे निघालो. वाटेत मधाचे पोळे पडले होते, बहुधा मध गोळा करणाऱ्यांकडून ते टाकले गेले असावेत. मूळ...

कार्ला आणि व्यापारी मार्गावरील मातृदेवता

इमेज
       पावसाळ्याच्या दिवसांत लोणावळ्या नजिकच्या एकविरा आईच्या दर्शनाला जाणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होते. इथले वातावरण, भाविकांच्या भावना आणि तरूणाईचा जोश या सर्वांच्या परिपाकातून इथली गर्दी निरंतरच असते.            आई एकविरेचे सुप्रसिद्ध मंदिर वेहेरगांव जवळील कार्ले डोंगरात वसले आहे. स्तूपाच्या बाजूला एका लहानश्या गुहेत आईची तांदळा स्वरूपाची मूर्ती आहे. या देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत:, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे.                                                               मंदिरावरील एका शिलालेखात इ.स. १७८८ साली मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हर...

व्हिडीओ सेंटरची कथा

इमेज
  व्हिडीओ सेंटरची कथा अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा या सर्वसामान्य भारतीयाच्या मूलभूत गरजा. पहिल्या तीन गरजांपैकी एखादी अपूर्ण राहिली तरी चालेल पण ‘सिनेमा’ ही गरज पूर्ण व्हायलाच हवी हे नक्की. खोटं वाटत असेल तर खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये तल्लीन होऊन मोबाईलवर पायरेटेड सिनेमे पाहणाऱ्यांना विचारा. इतर प्रवासी दोन पायांवर सरळ उभे राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना भक्तीभावाने सिनेमे पाहणाऱ्यांना आठवा. पोटात भूक, कपडे विस्कटलेले आणि उभे राहण्यासाठीही जागा नसताना चित्रपटाचा आनंद घेतला जाणे ही बाब चित्रपटाला मूलभूत गरजांमध्येच नेऊन ठेवते. संपूर्ण जग पूर्वापार या सिनेमांच्या प्रेमात पडला असताना आपल्या मुंबईलगतचा परिसर सुद्धा त्याला कसा अपवाद असेल?     सध्याचा काळ पाहता टी.व्ही, लॅपटॉप, मोबाईल, टॉकीज; शक्य होईल त्या मार्गाने लोक आपली चित्रपट पाहण्याची हौस भागवतात. स्मार्टफोनपूर्वीच्या सिनेमॅटीक आठवणींमध्ये ‘व्हिडीओ सेंटर’ नावाच्या सुविधेचं नाव चोवीस कॅरेट सुवर्णाक्षरांनी लिहलं जाईल. नव्वदीच्या दशकातली ही कथा. ग्रामिण भागामध्ये चित्रपटगृह नसल्याने अनेक सामान्यांची...

मणभर काम, गुंजभर दाम

इमेज
मणभर काम, गुंजभर दाम! लहान बोटीत दाटीवाटीने नेहमीचे प्रवासी बसलेले.  कामानिमित्ताने समुद्रमार्गाने मुंबईला ये-जा करणारी ही गर्दी. या नेहमीच्या गर्दीपेक्षा एक वेगळा चेहरा बोटीत चढतो. त्याच्या हातात स्वत:च्या आकाराहून मोठ्ठं पोतं आहे. एकीकडे गर्दीच्या चालण्याने ओल्या झालेल्या डेकपासून पोतं वाचवण्याचा प्रयत्न तो करतोय, तर दुसरीकडे कडक इस्त्रीची गर्दी त्याच्या पोत्याच्या स्पर्शापासून वाचण्याचा प्रयत्न करतेय. भाऊच्या धक्क्याला बोट लागल्यानंतर हे पोतं मुंबईच्या ‘नळ बाजारात’ पोहोचवलं जाईल. तिथल्या एका डीलरसोबत घासाघीस करून हाती काही पैसे मिळतील. या मणभर पोत्याच्या तुलनेत मिळालेल्या गुंजभर रक्कमेत ‘जीवाची मुंबई’ करत ही व्यक्ती मुंबईपासून जवळ असणाऱ्या ग्रामीण बाज जीवंत असणाऱ्या आपल्या जगात आनंदाने पोहोचतो. काय होतं त्याच्या मोठ्या पोत्यात?    मुंबईच्या नळबाजारात विकल्या गेलेल्या या पोत्यात होता, ‘गुंजेचा पाला’. ग्रामीण भागात ‘ गुंजवली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीची ही इवलीशी पाने. पानाच्या ठेल्यावर मिळणाऱ्या विड्यामध्ये गोडवा येण्यासाठी चिंचेसारखी लहान पाने असतात ती गुंजेची...

रायगडची लोहयुगीन संस्कृती

इमेज
रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंदर. पेरिप्लस नुसार चौलच्या दक्षिणेस आणि पालेपट्टमीच्या (महाड परिसर) उत्तरेस हे बंदर स्थित आहे. मॅक क्रिंडल या तज्ञाच्या मते संस्कृतमध्ये उल्लेखलेला ‘मंद्रगिरी’ म्हणजे देखिल हेच बंदर. प्राचीन काळखंडात महत्त्वाचे असणारे हे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ‘मांदाड’ बंदर . या बंदरापासून निघालेला आणि कुडा-भाजे-बोरघाटमार्गे पैठणपर्यंत गेलेला एक सातवाहनकालीन रस्ता होता. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या. या गावाच्या पूर्वेकडील महोबा डोंगरावर कुडे लेणी आहेत. इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात दंडा राजपुरी येथे सातवहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. त्यांनी बौध्द भिक्षुकांच्या वास्तव्यासाठी ही लेणी खोदली असल्याचे सांगण्यात येते. या लेण्याचा शोध १८४८ साली लागला. पाच चैत्य व एकवीस विहारांचा समावेश असलेल्या एकूण सव्वीस लेणी या विशाल कातळात कोरलेल्या आहेत. यात ब्राम्ही लिपीतील प्राकृत व संस्कृत ...

देवाचे मासे: वाळणकोंड

इमेज
रांजणकुंडामुळे जीवदान!       नदीपात्रातील रांजणकुंडांमुळे तयार झालेला डोह. जवळपास तीस मीटर लांब आणि दहा मीटर रुंदीचा हा डोह. डोहाच्या कडा इतक्या ताशीव की त्यात अडकलेल्या व्यक्तीला दोराशिवाय चढणे अशक्य व्हावे. डोहाची खोलीही तशीच अथांग. उन्हाळ्याच्या दिवसांतही न आटणारा हा जलकुंड. रोज अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहावरील  झुलत्या पुलावरून  हा डोह पाहण्यासाठी येतात. यातील काहीजणांच्या हातात तांदळाच्या लाह्या म्हणजेच मुरमुरे  असतात. डोहाच्या कडेला सुरक्षित जागा शोधून हे पर्यटक निळ्याशार डोहामध्ये मुरमुरे टाकतात. निळ्या रंगावर हे पांढरे कण तरंगत असतानाच अचानक पाण्याखाली थोडी हालचाल जाणवते. जलाचा पृष्ठभाग काळ्या-पांढऱ्या रंगांनी चमकू लागतो. क्षणार्धात शेकडो मासे या पृष्ठभागावर तरंगताना दिसतात. माशांसाठी टाकलेल्या खाऊमध्ये जसजशी वाढ होते, तसतशी त्यांची गर्दीही वाढत जाते. मोकळ्या आणि नैसर्गिक ठिकाणी एकाच जागेत इतक्या मोठ्या प्रमाणावर मासे आढळणे ही गोष्ट तशी दुर्मिळच म्हणावे लागेल. माशांनी भरलेला हा आश्चर्यकारक डोह पहायचा असेल तर तुम्हाला रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ पर...

चंदेरी दुनियेतला सोनेरी कोल्हा

इमेज
                        मानवी स्वभावांचे वर्णन करताना एखाद्या प्राण्याशी तुलना करण्याची पद्धत सर्वत्रच आहे. या पद्धतीमुळे ‘शेरदिल’, ‘भित्रा ससा’, ‘बोलका पोपट’ अशा उपमा तयार झाल्यात. ( यातले काही उपमान हे उपमेयाचे अपमान करणारे असल्याने, ते टाळलेलेेच बरे! ) विविध कथा, किस्से, पुराणे यांतून या उपमा आपल्या इतक्या अंगवळणी पडली आहेत, की कोल्हा हा धूर्त आणि लांडगा हा लबाडच असला पाहीजे अशी आपली खात्री पटते.  यातल्या कोल्ह्याच्या कथांना तर अंतच नाही. पंचतंत्र, इसापनिती आणि लोककथांमध्येही तो आपल्याला भेटतो. अगदी महाभारतातही कोल्ह्याची एक कथा येते ज्यात तो आपले मित्र, वाघ, लांडगा , मुंगूस आणि उंदीर यांच्यात भांडण लावून स्वत:चे इप्सित साध्य करतो. हे कमी आहे की काय म्हणून काही ठिकाणी कोल्ह्यांना देवत्वाशी जोडले आहे. भारत, जपानसह काही देशांमध्ये कोल्हा हा दैवी प्राणी मानला गेलाय. इजिप्तमध्ये कोल्हा हा प्राणी अनुबिस(Anubis) या  एका प्राचीन देवतेशी संबंधित मानला गेला आहे.          अनुबिस या मृत्यूदेवतेचे चित्...