पोस्ट्स

मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते

इमेज
मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते! ( कोकण मराठी साहीत्य परिषद आयोजित निबंध स्पर्धेत, शिक्षक गट प्रथम क्रमांक)        जगभरात सुमारे सहा हजार भाषा बोलल्या जातात. यातील  कित्येक भाषा प्रतिवर्षी मरण पावतात. वाचायला थोडे चमत्कारिक वाटेल पण हे खरे आहे; भाषांचाही मृत्यू होतो. विशिष्ट भाषा वापरणाऱ्यांचे प्रमाण शून्यावर येणे, व्यवहारातून  वापर नाहीसा होणे म्हणजेच भाषेचे मरण. त्याचबरोबर कित्येक भाषांमध्ये लक्षणीय बदल घडत असतात. सर्वाधिक भाषिक लोकसंख्येच्या यादीत मराठी भाषेचा एकोणिसावा क्रमांक लागतो. जगभरातील अकरा कोटीहून अधिक लोक मराठी भाषेचा वापर करतात. ही भाषा बोलणारे लोक (जागतिक स्तरावर)  ७२ देशांमध्ये पसरलेले आहेत.भारतातल्या ३५ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत मराठी भाषिक लोक महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. त्यामुळे ती केवळ एखाद्या प्रांताची भाषा न राहता, राष्ट्रीय भाषा ठरते. संविधानाने मान्य केलेल्या २२ राजभाषांपैकी मराठी ही एक राजभाषा आहे. शिलाहार, यादव काळातील कित्येक शिलालेख, ताम्रपटांवर संस्कृतसह मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे. शिवकाळात इंग्...

भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!

इमेज
भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!     भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात खरिपात म्हणजेच पावसाळी हंगामात प्रामुख्याने भातशेती होते. जिल्ह्यात लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होते, यंदाही होण्याची शक्यता आहे. या वर्षी जून महिन्याच्या पहील्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मध्यंतरी फोनच्या नेटवर्कप्रमाणे अचानक गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. या पावासामुळे लावणीच्या हंगामाला सुरूवात होईल; काही भागात भात लावणीला प्रारंभदेखील झाला आहे. योग्य वातावरणाचा फायदा घेत सर्वत्र भात लावणी होत असली, तरी काही गावांमध्ये मात्र लावणी सुरू होण्यासाठी विशिष्ट दिवसाची वाट पहावी लागते. संपूर्ण गावात ‘तो’ विशिष्ट दिवस आल्याशिवाय लावणी करायची नाही असे संकेत आहेत. आधुनिक काळात असे खरेच कुठे घडते का?      मुंबई-गोवा महामार्गालगत पेण तालुक्यातील जिते नावाचे एक सर्वसामान्य गाव. या गावात जुलै महीन्याच्या पहील्या आठवड्यात एक जत्रा संपन्न झाली. महाराष्ट्रातील विविध जत्रांचा हंगाम कधीचाच संपून गेला असताना, भर पावसात ही कसली जत्रा भरते याचेच...

रुचकर मिठाचा प्रवास

इमेज
रुचकर मिठाचा प्रवास (मुंबई सकाळ, रायगड टुडे 1 जुलै 2019) http://product.sakaalmedia.com/portal/SM.aspx?ID=137799     ‘जोहान अल्ब्रेट डी मन्डेलस्लो’ असे भले मोठे नाव असलेला एक जर्मन साहसी पर्यटक. सतराव्या शतकात तो भटकंतीच्या इराद्याने इराण, भारत या देशांत फिरला. आपल्या प्रवास वर्णनाच्या नोंदींमध्ये त्याने रायगडवासीयांच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण नोंद केली. भारतातील ‘ ओरानु-बाम्मारा ’ येथे मीठ तयार होत असल्याचे त्याने लिहिले. या परिसरात सोलर टेबल सॉल्टचे कारखाने असून मीठाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याचेही त्याने म्हटलेय. 1638 सालातली ही गोष्ट. मन्डेलस्लोच्या नोंदीतील ‘ओरानु-बाम्मारा’ म्हणजे खरंतर ‘उरण-मुंबई’. त्याने पाहीलेले सोलर टेबल सॉल्टचे कारखाने म्हणजे येथील मीठागरे. या नोंदींचा विचार केल्यास रायगडच्या किनारपट्टीवरील मीठव्यवसाय किमान चारशे वर्षांपासून असल्याचे म्हणता येईल. पण रायगडच्या मीठाची ही चविष्ट परंपरा केवळ इतकीच जुनी नाही, तर त्याच्या काहीशे वर्षे आधीचेही पुरावे आहेत. उरण तालुक्यातील सर्वात जुनी लिखित नोंद असलेल्या ‘पिरकोन-आवरे’ ताम्रपटातही मीठव्...

ऐ ‘ईल’ है मुश्किल

इमेज
ऐ ‘ईल’ है मुश्किल... “ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ ज़रा हट के, ज़रा बच के ये है बॉम्बे मेरी जान!”      ओ.पी. नय्यरजींच्या जादुई संगीताने सजलेले हे गीत. सहा दशकांहूनही अधिक काळ उलटून देखिल या गीताचा गोडवा कमी झाला नाही किंवा मजरूह सुल्तानपुरींनी वर्णन केलेली मुंबईची स्थिती बदलली नाही. मोठमोठ्या इमारती, भरधाव वाहने आणि कंपन्यांच्या गजबजाटातील  मुंबईकरांचे जीवन अजूनही ‘मुश्किल’च आहे. Indian Shortfin Eel ) या नावाने प्रसिद्ध असणारा हा सापासारखा भासणारा मासा.  या प्राण्याचे शास्त्रीय नाव अँग्विला बायकलर पॅसीफीया ( Anguilla bicolor pacifica ). मुंबईच्या वास्तवदर्शी गाण्यातील “ इक चीज़ के है कई नाम यहाँ ” ही ओळ शब्दश: खरी करणारा हा प्राणी  मुन्हेर, मुनेर, मुनेट, मुलेट, रातेलका या वेगवेगळ्या स्थानिक नावांने ओळखला जातो. समुद्राने वेढलेल्या या बेटांवर माणसालाच राहणे कठीण असताना इतर जीवांचा विचार कोण करेल? त्यातच ज्या प्राण्याचा प्रत्यक्षात आपल्याला काहीच उपयोग नाही, त्याच्या संरक्षणाची अपेक्षा बाळगणे म्हणजे विरार लोकलमध्ये विंडोसीट मिळण्याची अपेक्ष...

‘वेस्टर्न’ मार्गातील देशी संस्कृती!

इमेज
           विरारच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये  “ पुढील स्टेशन...अगला स्टेशन... नेक्स्ट स्टेशन...” असा तिहेरी पुकारा झाल्यानंतर एक नवखा प्रवासी “प्लॅटफॉर्म कौनसे बाजू में आयेगा?” म्हणून विचारणा करतो. “इस साईड में आयेगा लेकीन उस साईड में खडे रहना” एकदा डाव्या बाजूकडे हात दाखवून उजव्या बाजूकडे पहात अनुभवी प्रवासी उत्तर देतो. आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर आणत नवखा प्रवासी ज्या बाजूला उतरायचे असते त्याच्या विरूद्ध दारात उभा राहतो. अखेर ‘अगला स्टेशन’ येते, गाडीचा वेग कमी होऊन थांबण्याआधीच आणि आतील उतारू उतरण्यापूर्वीच काही चढारू ( उतरणारे : उतारू : : चढणारे : चढारू ) धसमुसळेपणाने चढत राहतात. जागा अडवण्यासाठी धडपड करतात. त्यांची चढाई संपून आता गाडी सुटण्याच्या मार्गावर असते. हा नवा अनुभव शिकलेले नवखे प्रवासी आणि या अनुभवात शेकलेले जुने प्रवासी शांतपणे ‘पायदान आणि फलाटामधील अंतर’ मोजत उतरतात. ज्या बाजूला उतरायचे असते त्याच्या विरूद्ध दिशेला उभे राहण्याचा धडा शिकवणारे हे स्टेशन म्हणजे ‘नालासोपारा’. असे वैशिष्ट्य असणारे बहुधा जगातील एकमेव स्टेशन. रेल्व...

प्रवास जलगंगेचा

इमेज
प्रवास जलगंगेचा          सर जेम्स लेईंग्! इंग्लंडमधील डरहॅम परगण्याचे शेरीफपद भूषवलेला माणूस. रिव्हर वेअर कमीशनर्स आणि सुएझ कॅनाल कंपनी या लोकप्रिय संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. डेप्टफोर्ड हाऊस, संडरलँड येथील सर जेम्स लेईंग् अँड सन्स (लिमिटेड) या जहाज बांधणी करणाऱ्या कंपनीचे ते संस्थापक. ब्रिटीश सरकारद्वारे नाईटहूड पारितोषकाने सन्मानित असणाऱ्या या अवलियाचे सन 1901 मध्ये निधन झाले.      दुसरे व्यक्तीमत्त्व वालचंद हिराचंद दोशी! आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार तसेच वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक. भारताच्या किनाऱ्यावरून चालणारी ब्रिटिश जहाजकंपन्यांच्या अखत्यारीतील जहाजवाहतूक भारतीयांच्या हाती येण्याच्या दृष्टीने वालचंदांनी सरकारशी सतत वाटाघाटी केल्या.  अखेर दादाभाई नौरोजी यांच्या प्रेरणेतून आणि नरोत्तम मोरारजी यांच्या सहकार्याने वालचंदांनी ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ ही भारतीय जहाजकंपनी स्थापन केली. आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाचे ते दोन वर्षे उपाध्यक्ष, 'ओरिएंटल' या भारतीय विमा कंपनीचे संचालक...

नोटांतून पोटात

इमेज
नोटांतून पोटात!             “खाने से पहले सदा हात धोना कभी भी ना भुलेंगे हो, ये आदत हमारी करे दूर बिमारी....” दूरदर्शनवरील जाहीरातींच्या एका सुप्रसिद्ध जिंगल्स मधील या ओळी. स्वच्छ हात धुवणारी सुंदर चेहऱ्याची  लहान मुले, त्यांच्या तितक्याच चकाचक कपड्यांतील आया सातत्याने टी.व्ही.च्या लहान पडद्यावर झळकताना दिसतात. अमुक ब्रँडचा साबण किंवा तमुक ब्रँडचे साहीत्य वापरल्यानंतर किटाणूंपासून कशी मुक्ती मिळते याचे साग्रसंगीत विश्लेषण या जाहीराती करतात. रोगजंतूंची भिती आणि आरोग्याची काळजी या प्रमुख भांडवलावर आधारीत एक भली मोठी बाजारपेठ हळूहळू आपले स्वच्छ धुतलेले हातपाय पसरून बसली आहे. साबण, हँडवॉश, सॅनिटायजर यांसारख्या पदार्थांनी जवळपास सर्वच घरांमध्ये चांगलेच बस्तान बसवले आहे. या जाहीरांतीमागील नफेखोरीच्या भागाकडे थोडे दुर्लक्ष केले तर, त्यामधून दिला जाणारा ‘आदत हमारी, करे दूर बिमारी’चा संदेश सामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरू शकेल. या जाहीरातींनी सर्वसामान्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या काही चांगल्या सवयी निर्माण करण्यास हातभार लावला आहे. रोगजंतूंसारख्या ...

उर्साचा बाजार

इमेज
उर्साचा बाजार! ( नवे-गाव आंदोलन मासिकाच्या ‘आनंदोत्सव’ विशेषांकात प्रकाशित लेख) आपल्या भारतीय संस्कृतीला ‘सण-कृती’ म्हणावे लागेल इतक्या मोठ्या संख्येने विविध प्रकारचे सण, उत्सव सातत्याने साजरे होत असतात. कधी आवड आहे म्हणून, तर कधी सवड आहे म्हणून आपला समाज रोजची चाकोरी सोडून या सणांमध्ये सहभागी होत असतो. आपल्या देशात मोठ्या शहरांपासून ते लहान खेड्यांपर्यंत  विविध उत्सवांची ‘जत्रा’ कायमच भरलेली असते. या बहुरंगी देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या बहुढंगी मुंबईपासून जवळचे ‘पिरकोन’ हे गाव देखिल उत्सवप्रेमीच. या गावातही आवडीचे, सवडीचे सण-उत्सव तितक्याच साजरे होत असतात. या सर्व सणांच्या जोडीला पिरकोनमध्ये एक अनोखा उत्सव साजरा होतो. हा उत्सव म्हणजे ‘उर्स’ किंवा ऊरूस. या उर्साला अनोखे म्हणण्याचे कारण म्हणजे आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या गावात सध्या एकही मुस्लिम वस्ती नाही, तरीही गावकरी मोठ्या आनंदाने हा उर्स साजरा करतात. केवळ पिरकोनच नव्हे तर त्याच्या पश्चिमेला असणारा आवरे आणि उत्तर पूर्वेकडील मोठीजुई या गावांमध्येही असाच उरूस साजरा केला जातो. हे उर्स म्हणजे तरी काय? ...