पोस्ट्स

मना गवना इरला (आगरी काव्य)

इमेज
मना गवंना इरला [आगरी 'पावसाला'] या मावलतीचे बाजूशी वारा जोशानं फिरला, धांदल उरली माझी मना गवंना इरला. कसा सांजचे वख्ताला आभ पान्यानी भरला, कावट आली तरी मना गवंना इरला. पयले पान्याचा जोर माझे अंगान जिरला, वलाधीन झालू तरी मना गवंना इरला. असा दरसालाचा पावना आला वस्तीला -हावाला, आल्या सतीर, कोठ्या डोईवरी आमी इसारलो इरला. -तुषार म्हात्रे

उधवानीची चिवणी (आगरी काव्य)

इमेज
उधवानीची चिवणी (दैनिक कर्नाळा, 9 जून 2018) उधवानीची चिवनी ( आगरी काव्य ) उभधाय यो पानी म्हनून, खाजना मी जेलो; कांडी बुरलेली शेता बघून, मनानशीच मेलो. नवा इनलेला पाग घेवून, बांधावरती चऱ्हलो; पाग तलीन न मी चालीन, असा आरवा तिरवा परलो. “पाग सलामत तं चिवनी पचास”, बोलून कसातरी उठलो; आखंदन गवं नाय म्हनून, खोशीकरं पलत सुटलो. उघरीवरती आसू मांडून, म्होटे आशंन मी बसलो; वावासंगती वाव्हून जेलो, नं दुसरे दारान फसलो. पाग फाटला आसू मोरली, खाज माझी निवली;  खाली डोबुकरी घरा हानून, फाटकी आसू शिवली; परत उधवानीला जावाचू नाय,  बोलून बाववालीकरं जेलो; शंभरची पाच चिवनी, मुकाट्यान घेऊन आलो -  तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

चिरनेर : झाकलेला आणि राखलेला इतिहास

इमेज
चिरनेर : झाकलेला आणि राखलेला इतिहास         गाभाऱ्याच्या पायऱ्यांचा थंडगार स्पर्श, दगडी दिव्याचा मंद प्रकाश आणि वर्तुळाकार घुमटाखाली पितळी सापाने वेढलेले कोरीव शिवलींग. गळ्यात नक्षीदार पट्टे असलेल्या कलात्मक नंदीला नमस्कार करून गेल्यावर दिसणारे हे दृश्य. हे दृश्य आहे ‘ महागणपती ’ तिर्थक्षेत्र म्हणून नावारुपाला येत असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर गावातील शीव मंदिराचे. मंदिराच्या शेजारील तलाव     सुंदर अशा तलावाशेजारील या परिसरात पेशवेकालीन महागणपती मंदिर, मारूती मंदिर, पुरातन शीव मंदिर, भैरवनाथाचे मंदिर आणि जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्मारक असे बरेच काही आहे. त्याचबरोबर गावाबाहेरच्या डोंगरावरील अलिकडच्या काळात निर्माण झालेले ‘इंद्रायणी’ देवस्थानही प्रसिद्ध आहे. संकष्ट चतुर्थी आणि सुट्टयांच्या दिवशी या गावाचे रुपांतर पर्यटनस्थळात  होते. चिरनेर म्हणजे महागणपती... चिरनेर म्हणजे जंगल सत्याग्रह... चिरनेर म्हणजे इंद्रायणी देवस्थान...      पण चिरनेर म्हणजे केवळ इतकेच नाही, आणखी काहीतरी या परिसरात आहे, जे या परिसराच्या इ...

आमचे जीवाची माती

इमेज
🍁🍃 आमचे जीवाची माती 🍂🍁 उधानाचा पानी🌊 घरादारान घुसला नं धरनांचा पानी तोंड फिरवून रूसला😒 हिव खालीव दमभं आथा निंभाराचा चटका नं तखरं देशावरती बोलतं गारांचा फटका वारा 🌪सुटतंय तरी पुन घामाच्या धारा,😰 चइन नाय जीवाला सकाल-सांचे 🌄पारा दर्यान नाय गवं पयलेसारकी मासली,🐠 आगरी-कोल्यांची तं साली जिंदगानीच भासली.😔 रानान 🌳आथा ऱ्हाला नाय जीव नं जान,🍂 डोंगराची🗻 माती जेली ऱ्हाली नाय शान या असां कसां सगला उलटफेर झाला?🤔 पयलेसारका पुना मातोसरीचा फेरा आला!👹 डोंगर इकलंव त्याचा पैसा 💰आज मोप हाय, मातोसरीचा नाय यो माती सरलंचा🌋 कोप हाय. 🌾मालान नाय ठेवलीव यक गवताची पाती,🌱 तुमचा निसता भराव नं आमचे जीवाची माती. - तुषार म्हात्रे, पिरकोन(उरण)

विमला कोण होती?

इमेज
विमला कोण होती? (What’s in the name - नावात काय आहे?)               करकचून उन लागत होतं. अशा कडक उन्हातच उरणला एका लग्नसमारंभात हजेरी लावून घरी येण्यासाठी निघालो. शहरातल्या अंतर्गत रस्त्यांची कामे चालू असल्याने ‘ट्राफिक जाम’ मध्ये फसलो.  गुप्तधनाचा शोध चालल्यासारखे रस्ते खोदलेले, म्हणून नेहमीच्या मार्गाने जाण्याऐवजी उरणमधील विमला तलावाच्या बाजूने बाईक काढली. तळ्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ‘गोळा-सरबत’च्या गाडीने लक्ष वेधले. थंडगार लिंबू सरबत घेतली. चव नेेहमीपेक्षा वेगळी होती; बहुधा नजरचुकीने आज ग्लास धुतले गेले असतील! एकेक घोट घेत ( सरबताचा ) समोर तलावाकडे नजर टाकली. थंडगार पाण्यात पाणपक्षी डुबक्या मारत होते. मलाही तीच इच्छा झाली. सध्या डुंबण्यालायक वाटणारा हा तलाव कधीकाळी पिण्यालायक होता . या शहराला पिण्याच्या पाण्याचे तीन महत्त्वपूर्ण तलाव होते. त्यापैकी एक उरण-मोरा(मौर्य?) रस्त्यावर, दुसरा उरण-करंजा रस्त्यावर आणि हा तिसरा शहराच्या मध्यवर्ती - ‘विमला तलाव’ . सभोवतालच्या राखलेल्या हिरवाईने नटलेला, शांत परिसरा...

‘पुरी’कथेतील राजकुमारा...

इमेज
⚔ ‘पुरी’कथेतील राजकुमारा... (शोध हरवलेल्या राज्याचा, शोध इतिहासाच्या पाऊलखुणांचा)      दहिसरला एक सदिच्छा भेट घेऊन ‘बोरीवली वेस्ट’ला जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो. ज्या ठिकाणी जायचं ती वास्तू फारशी प्रसिद्ध नाही, स्थानिक लोकही त्याबाबत अनभिज्ञ. त्यामुळे फक्त “देविदास रोड, बोरीवली वेस्टला याल का?” असा प्रश्न  विचारला. हिंदीत होकारार्थी प्रतिसाद आला. आता ज्या वास्तूच्या शोधात मी निघालोय ते रिक्षावाल्याला हिंदीत सांगणं कठीण जाईल हे जाणून शांतपणे रस्ते शोधून देणाऱ्या गुगलताईंची मदत घ्यायचे ठरवले. हिरव्या झाडींमध्ये लपलेल्या बोरीवली पश्चिमेच्या दिशेने रिक्षा निघाली. यावेळेसच्या शोधमोहीमेत संसारातील एकमेव मार्गदर्शक आमच्या सौभाग्यवतीही सोबत होत्या. रिक्षाने मंडपेश्वर लेणींना वळसा घालताच आमच्या मोबाईलचे नेटवर्कही कैलासवासी झाले. आता इच्छित स्थळाचा शोध घेणे आणखिनच कठीण झाले. गुगल मॅपवर मागे एकदा ‘देविदास रोड’वरील एल.आय.सी. कॉलनीचे नाव वाचल्यासारखे आठवले. चालकाला एल.आय.सी. कॉलनीजवळ नेण्यास सांगीतले. त्यानेही ‘इधर पुछता हूँ-उधर पुछता हूँ’ करत  कॉलनीच्या फाटकापर्यंत क...

केसांची ‘बाल’कथा

इमेज
      परवा रस्त्याने जाताना एक बोर्ड पाहिला-‘ सीजर पार्लर ’. नाव थोडं गंमतीदार वाटल्याने पुढे अशा नावांच्या फलकांकडे आपोआप लक्ष जाऊ लागले. जेन्टस् पार्लर, हेअर ड्रेसर, मेन्स सलून पासून ते केशकर्तनालय अशा विविध नावांखाली, चकचकीत काचांआड केस कापले जात होते. झाडाखाली मोडक्या लाकडी खुर्चीत तुटपुंज्या साहित्यासह मांडलेल्या लहानशा दुकानापासून ते तारांकीत इमारतीच्या सुखयोयीयुक्त स्पा पर्यंतचे वैविध्य या केशकर्तनाच्या व्यवसायात आहे. पुरूषांच्या दुनियेतला हा नविन झगमगाट पाहून मला जुन्या दिवसांची आठवण झाली.     मी लहान असतानाच्या, केस कापण्याविषयक काही आठवणी आहेत. लहानपणी मी घरातही सर्वात लहान होतो. त्यामुळे घरातील ‘मोठे’ मानल्या जाणाऱ्या सर्वच व्यक्तींची आज्ञा पाळणे माझे परम कर्तव्य होते. केस कापण्यासारख्या वैयक्तिक बाबीतही वडीलधारी मंडळी सांगतील तोच आदेश पाळणे बंधनकारक होते. या आदेशान्वये एका व्यक्तीची निवड घरच्यांनी केली.  घरोघर जाऊन केस कापणारा एक कर्तनकार आमच्या केसांची निर्घृणपणे हत्या करायचा. शेजारच्याच गावातून येणाऱ्या या केशकर्तनकाराचे  दुकान ए...

स्टीव्ह-टीवचा खेळ

इमेज
          2001 सालातल्या नोव्हेंबर महिनातला एक नाट्यमय प्रसंग. स्थळ होते दक्षिण आफ्रिकेतील ‘पोर्ट एलिझाबेथ’ मैदान. कसोटीच्या चौथ्या दिवशी सचिन गोलंदाजीला आला. त्याने चार-पाचच षटके टाकली असतील आणि टी.व्ही. कॅमेरा त्याच्या हातावर रोखला गेला. वेगवेगळ्या कोनांतून, झूम करून सचिनच्या हालचाली टिपल्या गेल्या. सामनाधिकारी माईक डेनिस यांनी तातडीने सामन्याचे रेकॉर्डींग तपासणीसाठी मागवले.        काहीतरी वाईट घडतंय हे सर्वांना कळत होते. संध्याकाळी माईक डेनिस यांनी कर्णधार गांगुलीसह सर्व खेळाडूंची मिटींग घेऊन सचिन तेंडुलकरने चेंडू कुरतडल्याचे सांगून त्याला एक वर्षाच्या सामनाबंदीची शिक्षा होऊ शकते असे जाहीर केले. यानंतर सचिनला बाजू मांडण्याची संधी मिळाली. चर्चेअंती एक सामन्याची बंदी आणि 75% मानधनात कपात अशी शिक्षा सुनावण्यात आली.        दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचे मथळे नेहमीप्रमाणे सचिननेच भरलेले होते, पण यावेळेस त्याच्या महानतेवर, नैतिकतेवर शंका घेणारे. बऱ्याचशा उथळ माध्यमांनी त्याला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. हे ‘ मह...

नमक-हराम

इमेज
        “डबल फोर्टीफाईड- आयोडीनयुक्त, सबसे शुद्ध नमक!”   अशी जाहीरात आपण मोठ्या आवाजात आणि वारंवार टी.व्ही.वर पहात-ऐकत आलो आहोत. अायोडीनयुक्त मीठ खाल्ल्याचे होणारे विविध फायदे कंटाळवाण्या सरकारी जाहिरातींपासून ते मीठ उत्पादक कंपन्यांच्या झकपक जाहिरांतीत आपल्या मनावर ठसवले जातात. आपल्या घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर ‘आयोडीनयुक्त मीठ’ , असे लिहिलेले दिसेल.  आयोडीन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉइड ग्रंथीमध्ये या आयोडीनपासून थायरॉक्सीन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे विविध आजार होतात हे माहित असल्यानेे आयोडीनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा जादा पुरवठा केला जातो.     या सर्व बाबी सत्य असल्या तरी ‘आयोडीनयुक्त मीठाची’ दुसरी खारट बाजू पाहूया.      आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ वा खाद्य तेल यांचा वापर करता येतो. त्यामुळे १ किलो मिठात सुमारे १५ ते ३० मि. ग्रॅ. या प्रमा...

पिरकोनमधील वीरगळ (भाग 2)

इमेज
(शोध अज्ञात वीराचा)          ‘ वीरगळ ’ हा शब्द आता ‘ पिरकोन ’ परिसरात अनेकांच्या तोंडी रुळला असावा. नवी मुंबई, मुंबई  पासून अवघ्या तासाभराच्या अंतरावरील या परिसरात वीरगळ आढळले आहेत, हे मागील लेखामुळे बहुतांश लोकांना ज्ञात झाले. आपल्या राज्यात बऱ्याचशा ठिकाणी असे विरगळ आहेत. आपल्याकडे आढळणारे वीरगळ हे मुख्यत्वे मराठवाडा,पुणे  पासून ते कोकण, रायगड पर्यंत पसरलेले आहेत. वीरगळांना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रीय महत्त्व आहे. महाराष्ट्रात वीरगळांचे अनेक प्रकार आहेत. वीराच्या पराक्रमानुसार व पदानुसार दगडाच्या एकाच बाजूने तर कधी दोन्ही बाजूने किंवा चारी बाजूने चौकट करून वीराच्या युद्धप्रसंगाचे चित्र कोरले जाते. युद्ध प्रसंगात बरीच विविधता असते. पायदळ, घोडदळ स्वरूपातील युद्धप्रसंग आहेतच, पण हत्तीवरून आणि नौकेवरून झालेल्या लढायांचे प्रसंगही आढळतात. पारंपारिक युद्ध प्रसंगांसह आणखी काही वेगळ्या घटनांवरील वीरगळ असू शकतात. चोर लुटारूंपासून गाई गुरांचे रक्षण करताना मरण स्विकारलेला वीर किंवा रानटी प्राण्यांशी लढणारा वीर असेही काही प्रसंग आहेत.     आपण पिरकोन...