पोस्ट्स

‘निरा’ हे सदा के लिए!

इमेज
  श्रीस्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही उत्तर कोकणच्या शिलाहारांची राजधानी. या राजवंशातील ‘छित्तराजा’चा मुरूडजवळील भोईघर येथे सापडलेला एक ताम्रपट आहे. इसवी सन १०२४च्या या ताम्रपटात नारळ, फणस, चाफा, आंबा यांवरील कर पद्धतीची माहिती दिली आहे. या ताम्रपटातील एका वाक्याची अंमलबजावणी अगदी हजार वर्षानंतरही कायम आहे. ही ओळ अशी आहे- ‘सुरामण्डवृक्षश्चाभ्यन्तरवर्ती बाह्यो वा राजकीय एव’ म्हणजे, ‘ज्या वृक्षांपासून ‘सुरा’ अर्थात दारू निघते, ते सर्व वृक्ष बाहेर असोत वा आत, राजाच्या/सरकारच्या अखत्यारीत आहेत!’ अलिकडच्या काळातील सुप्रसिद्ध ‘सरकारमान्य’ या शब्दाचा उगम अशाच आदेशांमध्ये असल्याचे सांगता येईल. आधुनिक काळातही ताड, माड, खजूर, शिंदी यांसारखे तालवृक्ष सरकारच्या अखत्यारीत येतात. पर्यायाने या वृक्षांशी निगडीत व्यवसायांवर देखील सरकारची नजर असते. आपणही इथे अशाच एका सुरावृक्षाशी संबंधित ‘सरकारमान्य’ व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत; फरक इतकाच की- आपण ‘सुरे’च्या वाकड्या मार्गात न शिरता सरळमार्गाने ‘निरा’ व्यवसायाकडे वळणार(!) आहोत. उन्हाच्या दिवसांमध्ये प्रवास करताना रस्त्याच्या कडेला...

शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा

इमेज
शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा     मुंबईच्या उत्तरेला पश्चिम रेल्वे मार्गावरील एक गजबजलेले उपनगर म्हणजे नालासोपारा. भारताच्या जवळपास सर्व राज्यांतील (काही परराष्ट्रातील सुद्धा) माणसे इथे आढळू शकतील इतकी विविधता इथल्या लोकसंख्येत आहे. खरे तर नाळा आणि सोपारा अशी दोन स्वतंत्र गावे इथे आहेत. एका मान्यतेनुसार ही मूळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी. याचे प्राचीन नाव शूर्पारक. कोणे एके काळी हे शहर एक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर आणि कोकण प्रांताच्या राजधानीचं शहर म्हणून वैभवाने भरलेलं होते.  स्वत: गौतमबुद्धांनी या परिसराला भेट दिली असंही सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायाची बाजारपेठ म्हणून शूर्पारक बंदर जगप्रसिद्ध होते. इथून परदेशात मोठा व्यापार चालत असे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत शूर्पारक नगरी कोकण प्रांताची राजधानी होती. सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हे बुद्धगयेहून आणलेली महाबोधी वृक्षाची फांदी घेऊन याच बंदरातून श्रीलंकेला गेले होते. त्यानंतरच जगभर बौद्धधर्माचा प्रसार सुुरु झाला. या प्राचीन नग...

मोतियाने द्यावी भरून

इमेज
           मेगॅस्थेनिस हा ‘सेल्युकस निकेटर’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्यां’च्या दरबारातील एक राजदूत. याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत ‘इंडिका’ हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथात तो एकेठिकाणी म्हणतो की, “भारतात सोन्यापेक्षाही मोत्याला अधिक किंमत आहे.” अर्थात भारतीयांच्या दृष्टीने मोत्यांचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे. प्राचीन भारतीय वाङ्‌मयात मोत्यांचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदात देवांच्या अस्थिपासून मोती होतात, असे म्हटले आहे. पुढे वराहमिहीराच्या बृहत्संहिता या संस्कृत ग्रंथात ‘मुक्ताफल’ परीक्षा या प्रकरणात मोत्यांविषयी बरेच लिहिले आहे.        तसे पाहता रत्नशास्त्रानुसार मोती हे एक प्राणिज रत्न आहे. नावाप्रमाणेच ते भूगर्भात वगैरे न मिळता थेट शिंपल्याच्या शरीरातच सापडते. अन्न म्हणून शिंपले पकडताना बहुदा या चमकदार आणि आकर्षक रत्नाचा शोध मानवाला लागला असावा. पण त्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर मोती मिळवण्याच्या उद्देशानेच ही कालवे गोळा केली जाऊ लागली. जगभरात मोती तयार करणारी कालवे खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातही आढळतात. पण भारतात मात्र गोड्या पाण्यातील कालवा...

देवदिवाळी: देवांची आणि मनुष्याची...!

इमेज
देवदिवाळी: देवांची आणि मनुष्याची...!        आषाढी आणि कार्तिकी  ह्या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या. याच दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास (चतुर्मास) पाळला जातो. याच काळात कर्क संक्रांतीस सूर्याचे उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास सुरुवात होते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. थोडक्यात कर्क संक्रांतीपासून देवांची रात्र चालू होते. साधारणपणे कर्क संक्रांत येते आषाढ मासात. याच मासात रात्र असल्याने ‘देव झोपी जातात’, अशी समजूत आहे. म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. तर  कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोपेेेेतून जागे होतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ किंवा ‘देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात. तसे पाहता दक्षिणायन सहा महिन्यांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण कार्तिकी एकादशीपर्यंत चारच महिने होतात. म्हणजे, एका अर्थाने दिवस उजाडायच्या आतच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. या काळात श्रीविष्णू निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. भगवान विष...