पोस्ट्स

स्टीव्ह-टीवचा खेळ

इमेज
          2001 सालातल्या नोव्हेंबर महिनातला एक नाट्यमय प्रसंग. स्थळ होते दक्षिण आफ्रिकेतील ‘पोर्ट एलिझाबेथ’ मैदान. कसोटीच्या चौथ्या दिवशी सचिन गोलंदाजीला आला. त्याने चार-पाचच षटके टाकली असतील आणि टी.व्ही. कॅमेरा त्याच्या हातावर रोखला गेला. वेगवेगळ्या कोनांतून, झूम करून सचिनच्या हालचाली टिपल्या गेल्या. सामनाधिकारी माईक डेनिस यांनी तातडीने सामन्याचे रेकॉर्डींग तपासणीसाठी मागवले.        काहीतरी वाईट घडतंय हे सर्वांना कळत होते. संध्याकाळी माईक डेनिस यांनी कर्णधार गांगुलीसह सर्व खेळाडूंची मिटींग घेऊन सचिन तेंडुलकरने चेंडू कुरतडल्याचे सांगून त्याला एक वर्षाच्या सामनाबंदीची शिक्षा होऊ शकते असे जाहीर केले. यानंतर सचिनला बाजू मांडण्याची संधी मिळाली. चर्चेअंती एक सामन्याची बंदी आणि 75% मानधनात कपात अशी शिक्षा सुनावण्यात आली.        दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचे मथळे नेहमीप्रमाणे सचिननेच भरलेले होते, पण यावेळेस त्याच्या महानतेवर, नैतिकतेवर शंका घेणारे. बऱ्याचशा उथळ माध्यमांनी त्याला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. हे ‘ मह...

नमक-हराम

इमेज
        “डबल फोर्टीफाईड- आयोडीनयुक्त, सबसे शुद्ध नमक!”   अशी जाहीरात आपण मोठ्या आवाजात आणि वारंवार टी.व्ही.वर पहात-ऐकत आलो आहोत. अायोडीनयुक्त मीठ खाल्ल्याचे होणारे विविध फायदे कंटाळवाण्या सरकारी जाहिरातींपासून ते मीठ उत्पादक कंपन्यांच्या झकपक जाहिरांतीत आपल्या मनावर ठसवले जातात. आपल्या घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर ‘आयोडीनयुक्त मीठ’ , असे लिहिलेले दिसेल.  आयोडीन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉइड ग्रंथीमध्ये या आयोडीनपासून थायरॉक्सीन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे विविध आजार होतात हे माहित असल्यानेे आयोडीनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा जादा पुरवठा केला जातो.     या सर्व बाबी सत्य असल्या तरी ‘आयोडीनयुक्त मीठाची’ दुसरी खारट बाजू पाहूया.      आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ वा खाद्य तेल यांचा वापर करता येतो. त्यामुळे १ किलो मिठात सुमारे १५ ते ३० मि. ग्रॅ. या प्रमा...

पिरकोनमधील वीरगळ (भाग 2)

इमेज
(शोध अज्ञात वीराचा)          ‘ वीरगळ ’ हा शब्द आता ‘ पिरकोन ’ परिसरात अनेकांच्या तोंडी रुळला असावा. नवी मुंबई, मुंबई  पासून अवघ्या तासाभराच्या अंतरावरील या परिसरात वीरगळ आढळले आहेत, हे मागील लेखामुळे बहुतांश लोकांना ज्ञात झाले. आपल्या राज्यात बऱ्याचशा ठिकाणी असे विरगळ आहेत. आपल्याकडे आढळणारे वीरगळ हे मुख्यत्वे मराठवाडा,पुणे  पासून ते कोकण, रायगड पर्यंत पसरलेले आहेत. वीरगळांना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रीय महत्त्व आहे. महाराष्ट्रात वीरगळांचे अनेक प्रकार आहेत. वीराच्या पराक्रमानुसार व पदानुसार दगडाच्या एकाच बाजूने तर कधी दोन्ही बाजूने किंवा चारी बाजूने चौकट करून वीराच्या युद्धप्रसंगाचे चित्र कोरले जाते. युद्ध प्रसंगात बरीच विविधता असते. पायदळ, घोडदळ स्वरूपातील युद्धप्रसंग आहेतच, पण हत्तीवरून आणि नौकेवरून झालेल्या लढायांचे प्रसंगही आढळतात. पारंपारिक युद्ध प्रसंगांसह आणखी काही वेगळ्या घटनांवरील वीरगळ असू शकतात. चोर लुटारूंपासून गाई गुरांचे रक्षण करताना मरण स्विकारलेला वीर किंवा रानटी प्राण्यांशी लढणारा वीर असेही काही प्रसंग आहेत.     आपण पिरकोन...

पिरकोनमधील वीरगळ (भाग-1)

इमेज
नवी मुंबईलगतच्या उरण तालुक्यातील पिरकोन हे एक सामान्य गाव. पिरकोनच्या दक्षिणेला लोकवस्तीपासून दूर पण लोकांची ये-जा असलेले ‘शिव मंदिर’ आहे. काही दशकांपूर्वी जीर्णोद्धार केलेल्या या नेटक्या मंदिराचे ‘शंकर-विष्णू देवस्थान’ म्हणून नामकरणही झाले आहे. ‘ शैव ’ आणि ‘ वैष्णव ’ अशा दोन्ही परंपरांचे एकत्रिकरण या मंदिरात आहे.सिमेंटीकरणाच्या काळातही आपला नैसर्गिकपणा टिकवलेल्या शांत परिसरात हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या समोरील बाजूस झीज झालेल्या रुपातील दोन दगडी नंदी आहेत. या मंदिराच्या चौथऱ्याखाली उतरल्यावर दोन शिळा आधाराने ठेवलेल्या दिसतात. तशीच एक भग्न शिळा समोरील बोडणीच्या(छोटा तलाव) कडेला ठेवल्याचे आढळते. गेली कित्येक वर्षे उन-पाऊस झेलत या शिळा मंदिराबाहेर पडून आहेत. नाही म्हणायला कधी कधी त्यांच्यावर एखादा शेंदूरतिलक अथवा चुना फासून या दुर्लक्षित शिळांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ते तेवढ्यापुरतेच. पण या दुर्लक्षित शिळांकडे इतके लक्ष वेधण्याची गरजच काय? काय वैशिष्ट्य आहे या दगडांचे? चला महत्त्व जाणून घेऊया, पिरकोन मधील या ऐतिहासिक पाऊलखुणांचे... ...

जीप आणि जिप्सी

इमेज
                                      ‘जीप आणि जिप्सी’                             (धम्माल प्रवासाचे कम्माल अनुभव) जुलै महिन्याचा पावसाळी दिवस. पाठीवर सामानाची जड बॅग, झोप अपुरी झाल्याने तितकेच जड झालेले डोळे आणि दूर बदली झाल्याने डोक्यात आलेले त्याहूनही जड विचार अशा ‘भारा’वलेल्या आणि भांबावलेल्या अवस्थेत जव्हार स्थानकात उतरलो. गुगल मॅपच्या साह्याने अजून किती अंतर जायचे आहे याचा अंदाज बांधला. डेपोत उभ्या असलेल्या बसच्या अनोळखी फलकांकडे एक नजर टाकली, इतक्यात बाहेरच्या बाजूला   ‘चला मोखाडा-मोखाडा’  असा आवाज ऐकला. डोळ्यांतला आणि डोक्यातला जडपणा उडवून बाहेर उभ्या असलेल्या जीपच्या दिशेने निघालो.एका जुन्या रंग दिलेल्या अर्माडा जीपमध्ये हातात पिशवी असलेला पंधरा-सोळा वर्षाचा मुलगा ड्रायव्हरच्या सीटवर बसला होता. त्याच्याकडे शंकास्पद नजरेने  पहात, बॅग सांभाळत शेजारील जागेत बसलो. अजूनही बाहेर ‘चला मोखाडा-...

मदतीचा हात

इमेज
वेस्टर्न रेल्वेवरील नायगाव स्टेशन,वेळ दुपारी सव्वा दोनची... चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या फास्ट ट्रेनमधून 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उतरलो. स्टेशनच्या पूर्वेला जाण्यासाठी मागे वळलो. ट्रेनने जेमतेम वेग घेतला असेल तेवढ्यात 40-45 वयाचा दिसणारा एक माणूस चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर पडला. त्याचे पाय प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील मोकळ्या जागेत होते. ट्रेनच्या वेगामुळे तो ट्रेनखाली खेचला जात होता. माझ्या पुढे असलेल्या एकाने त्या अडकलेल्या व्यक्तीच्या हातांना धरून ठेवले. त्याच्या मागून मी लगेच हातातले सामान टाकून त्याला प्लॅटफॉर्मवर खेचले. आम्ही दोघांनी त्याला उचलून एका बाकड्याच्या आधाराने बसवले. ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मध्ये पाय सापडल्याने एका पायाला जबर दुखापत झाली होती. पाईपलाईन फुटल्यानंतर जसे पाणी निघते तसे रक्त बाहेर पडत होते. मी पलिकडील 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीसांना आवाज दिला. दोन रेल्वे पोलीस त्या प्लॅटफॉर्मवरील बाकांवर बसून ड्युटी(!) करत होते. ते तिथूनच क्या हुवा? क्या हुवा? करत होते. अखेर मी जिन्यावरून धावत जाऊन त्या पोलीसांपासून 5 पावलांवर असलेल्या मदत केंद्रात धावत जाऊन माह...

ये लाल रंग...!

इमेज
अंगणात तुळशीवृंदावन, दारात पायरीजवळ वेलकमसदृश काहीतरी  लिहलेले एखादे पायपुसणे आणि कुंपण वगैरे असलेच तर त्यावर नावाची पाटी असे काहीसे वर्णन आपल्या घरांचे करता येईल. फ्लॅटसंस्कृती येऊनदेखील यात फारसा बदल झाला नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपासून दारासमोरील घटकांमध्ये आणखी एका वस्तूची भर पडली आहे. सजावटीचा, संस्कृतीचा भाग नसूनही या वस्तूने घरासमोरील मानाचे स्थान पटकावले आहे. ही नविन गोष्ट म्हणजे ‘ लाल रंगाची बाटली’ ! साध्या कौलारू घरांपासूून ते बहुमजली इमारतींपर्यंत, शेतकरी कष्टकऱ्याच्या दारापासून ते उच्चशिक्षित आणि धनाढ्यांच्या बंगल्यांपर्यंत या लाल बाटलीने स्थान मिळवलेय. असे काय विशेष आहे या बाटलीत? कशासाठी या घरासमोर ठेवल्या जातात? या ‘ लाल बाटल्या ’ ठेवण्यामागचं कारण एव्हाना तुम्हाला कळलं असेलच. भटक्या कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी, घरापासून दूर हाकलण्यासाठी या बाटल्या ठेवल्या जाताहेत. या लाल रंगाच्या बाटल्या बघून कुत्रे त्या परिसरात फिरकत नाहीत असा दावाही केला जातोय. जेव्हा एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणावर केली जाते तेव्हा त्यावरील विश्वास वाढत जातो. अशा विश्वासातूनच सगळीकडे ह...

ग्लोबल वॉर्मिंगची ढोबळ वॉर्निंग

इमेज
  ‘ग्लोबल वॉर्मिंगची ढोबळ वॉर्निंग’        5 जून रोजी सगळीकडे  ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा होतो. तसा तो प्रतिवर्षी होतच असतो. 2014 साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिनी’ आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रांमध्ये पर्यावरणविरोधी घटकांविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असा सूर साऱ्याच तज्ज्ञांनी लावला. वातावरणातील बदल रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सागरपातळी वाढत असून, त्यामुळे लहान बेटांना धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविरोधी घटकांमुळेच पूर, दुष्काळ, चक्रीवादळ इ. संकटे निर्माण होत आहेत, अशी चर्चा या चर्चासत्रांमध्ये होती.      ‘ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील बदल’ या फार मोठय़ा जागतिक समस्या झाल्या आहेत. लहान बेट असलेल्या बावन्न देशांना हरितगृह वायू उत्सर्जनाच्या वाढीमुळे धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिली.लहान बेटे असलेल्या ग्रेनेडा, मालदीव आणि मार्शल या देशांचे प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते.       वरील बातमीच्या अनुषंगाने नुसतं ‘पर्यावरण’ ...

तळा मारणे: एक आनंदोत्सव

इमेज
(पिरकोन मधील मासेमारीच्या अनोख्या परंपरेविषयक लेख) लहानपणी आम्ही आणि गावातील म्हैशी दोघांचेही हक्काचे स्विमिंग पूल म्हणजे पिरकोनच्या पूर्वेकडील विस्तीर्ण तलाव, गावच्या भाषेत ‘तला’.  पोहण्याच्या सुविधेबरोबरच कपडे धुवण्यासाठीचा धोबी घाटही तोच, विसर्जन तलावही तोच आणि मरणोत्तर विधींसाठीचा घाटही तोच. लग्नसमारंभासाठी लागणारे मंगल जलसुद्धा याच तळ्याचे. गावातील सर्व प्रथा-परंपरांचे केंद्रस्थान म्हणजे हा तलाव.  कालांतराने या नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये माझे पोहणे कमी झाले, मात्र म्हैशींनी अजूनही ही ‘सांस्कृतिक परंपरा’ जपली आहे.  अशा या बहुढंगी तलावाला भेट देण्याचे माझे प्रमाण कमी झाले असले तरी काही महत्त्वपूर्ण प्रसंगी मी आजही आवर्जून हजेरी लावतो. हे प्रसंग म्हणजे गोपाळकाला आणि गणेश विसर्जन. या सणसमारंभांव्यतिरिक्त आणखी एक वेगळा दिवस, ज्यावेळेस  गावातील कर्तबगार मंडळी (त्यात मी सुद्धा आहे बरं का!)  वर्षातून एक दोन वेळा हजेरी लावतात आणि ज्या दिवसाची मी नेहमीच वाट पहात असतो. हा दिवस म्हणजे ‘तळा मारण्याचा’ दिवस. खरं म्हणजे हा साधासुधा दिवस नसून एक उत्सवच;...