पोस्ट्स

ग्लोबल वॉर्मिंगची ढोबळ वॉर्निंग

इमेज
  ‘ग्लोबल वॉर्मिंगची ढोबळ वॉर्निंग’        5 जून रोजी सगळीकडे  ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा होतो. तसा तो प्रतिवर्षी होतच असतो. 2014 साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिनी’ आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रांमध्ये पर्यावरणविरोधी घटकांविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असा सूर साऱ्याच तज्ज्ञांनी लावला. वातावरणातील बदल रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सागरपातळी वाढत असून, त्यामुळे लहान बेटांना धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविरोधी घटकांमुळेच पूर, दुष्काळ, चक्रीवादळ इ. संकटे निर्माण होत आहेत, अशी चर्चा या चर्चासत्रांमध्ये होती.      ‘ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील बदल’ या फार मोठय़ा जागतिक समस्या झाल्या आहेत. लहान बेट असलेल्या बावन्न देशांना हरितगृह वायू उत्सर्जनाच्या वाढीमुळे धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिली.लहान बेटे असलेल्या ग्रेनेडा, मालदीव आणि मार्शल या देशांचे प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते.       वरील बातमीच्या अनुषंगाने नुसतं ‘पर्यावरण’ ...

तळा मारणे: एक आनंदोत्सव

इमेज
(पिरकोन मधील मासेमारीच्या अनोख्या परंपरेविषयक लेख) लहानपणी आम्ही आणि गावातील म्हैशी दोघांचेही हक्काचे स्विमिंग पूल म्हणजे पिरकोनच्या पूर्वेकडील विस्तीर्ण तलाव, गावच्या भाषेत ‘तला’.  पोहण्याच्या सुविधेबरोबरच कपडे धुवण्यासाठीचा धोबी घाटही तोच, विसर्जन तलावही तोच आणि मरणोत्तर विधींसाठीचा घाटही तोच. लग्नसमारंभासाठी लागणारे मंगल जलसुद्धा याच तळ्याचे. गावातील सर्व प्रथा-परंपरांचे केंद्रस्थान म्हणजे हा तलाव.  कालांतराने या नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये माझे पोहणे कमी झाले, मात्र म्हैशींनी अजूनही ही ‘सांस्कृतिक परंपरा’ जपली आहे.  अशा या बहुढंगी तलावाला भेट देण्याचे माझे प्रमाण कमी झाले असले तरी काही महत्त्वपूर्ण प्रसंगी मी आजही आवर्जून हजेरी लावतो. हे प्रसंग म्हणजे गोपाळकाला आणि गणेश विसर्जन. या सणसमारंभांव्यतिरिक्त आणखी एक वेगळा दिवस, ज्यावेळेस  गावातील कर्तबगार मंडळी (त्यात मी सुद्धा आहे बरं का!)  वर्षातून एक दोन वेळा हजेरी लावतात आणि ज्या दिवसाची मी नेहमीच वाट पहात असतो. हा दिवस म्हणजे ‘तळा मारण्याचा’ दिवस. खरं म्हणजे हा साधासुधा दिवस नसून एक उत्सवच;...

यंदाची दिवाली

इमेज
🔥🌾⛈ यंदाची दिवाली⛈🌾🔥           🍃(आगरी काव्य)🍃 वरीसभर राबून  रिकामंच हात, रिकामे पोटान कालचा शिला भात, कापनीचे टायमाचा यो घाताचा म्हैना, आरझोर पान्यानी केली शेतीची दैना, हाताशी आलेली भातां पान्यानी भिजली, यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली. हत्तीचा पाऊस हत्तीसारा धावला, उरवंला कसातरी फाटका कापर लावला, सोनसारे कनसांना हिवाल्यान रो आला, बारबोऱ्या पावसाला अवकाली रोग झाला, कालंकुट ढग संगती चमकती बिजली, यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली. बिनवातीचा कंदिल न बिनतेलाचा दिवा, इझलेले चुलीवर बिनभाकरीचा तवा, सगल्यांचे दाराशी रांगोल्या न पनत्या, आमचे दाराशी पेंढच्या गिनत्या, फटाकरं मांगनारी पोरा फटकं खाऊन निजली, यंदाची दिवाली दादा शेतानूच इझली. ⓒ तुषार म्हात्रे, पिरकोन उरण

गांधी‘वादा’ची नांदी!

इमेज
सुमारे चार वर्षापूर्वीचा प्रसंग.डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत फरिदाबाद येथील एक कॉन्फरन्स आटोपून दिल्लीकडे निघालो. दिल्लीत फिरण्यासाठी पुढील योजना आखत होतो. माझ्यासोबत आणखी चार सहकारी होते. सकाळी दहाच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ पोहोचलो. सोमवार असल्याने किल्ल्याचे प्रवेशद्वार बंद. बाहेरूनच धुक्यामुळे पांढरा झालेला लाल किल्ला पाहिला आणि एक टुरिस्ट बस पकडून जिवाची दिल्ली करण्यास निघालो. एक दोन स्थळे पाहिल्यानंतर गाईडने पुढील स्थऴाचे नाव घोषित केले. राजघाट! नाव ऐकून डोळे चमकले.उत्साहाने हिरवळीतून मार्गक्रमण करत समाधीस्थळाजवळ पोहोचलो. महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.तेथील वातावरण पाहून भारावून गेलो.  सोबत असलेल्या राहुलला आवर्जून माझा फोटो काढायला लावला. माझ्या मनातील  एक  अपूर्ण इच्छा पूर्ण झाली. ‘तिरस्कार ते आदरभावना’ असा दोन विरूद्ध टोकांचा प्रवास सहज होत नाही. माझ्याबाबतीत तो घडलाय. याला कारणीभूत अाहे महात्मा गांधींची ‘कृतियुक्त विचारशैली’.      शाळेत असल्यापासून भिंतीवर हसऱ्या छबीची गांधी प्रतिमा पाहत आलोय. जोडीला रंग उडालेल्या भिं...

घड(व)लेले पदार्थ

इमेज
माझं नाव तुषार म्हात्रे, पेशाने आणि पैशानेही शिक्षकच! गेली दहा वर्षे नोकरीच्या निमित्ताने भटकंती करतो आहे. मुंबईला जवळ असूनही अस्सल ग्रामीणपणा टिकवलेल्या पिरकोन गावचा कधीकधी रहिवासी. म्हणजे एकप्रकारे अनिवासी पिरकोनकरच. पाककलेचा फारसा अधिकृत पूर्वेइतिहास नसलेल्या कुटूंबातला आणि एकेकाळचा शुद्ध(!) मांसाहारी मनुष्य. एकेकाळचा म्हणण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत शुद्ध मांसाहारी ते शुद्ध शाकाहारी असा कठीण प्रवास झाल्यानंतर सध्या मिश्रहारी हे बिरूद मिरवत आहे. चहा हे आमच्या संपूर्ण कुटुंबाचं राष्ट्रीय पेय. पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये ज्याप्रमाणे एखाद्या घटकाचे विश्लेषण करून मिळते त्याप्रमाणे आमच्या घरातील व्यक्ती चहा पिऊन झाल्यानंतर त्यातील चहापत्तीचे प्रमाण, साखर, दूधाचा प्रकार इ. सहज सांगू शकतात. (खोटे वाटत असेल तर माझ्या मोठ्या भावाला म्हणजेच भाईला चहाला बोलवून पहा.) असो, आता नमनालाच घडाभर चहा झाल्यानंतर मी मूळ मुद्द्याकडे येतो.मी पदार्थ (बि)घडवायला कधी लागलो? नेमकं आठवत नाही पण, माझ्या पाककलेची सुरूवात माझ्या आवडी-निवडीमुळेच झाली. ज्या वेळी ताटात माझ्या आवडीचे जेवण नसेल त्यावेळी मी स्वत: उठ...

पावसाळी स्पर्धांचे चिखल

इमेज
सध्या संपूर्ण राज्यात फुटबॉल फीव्हर चालू अाहे. आपल्या ‘सवासो करोड’ लोकसंख्येच्या देशाला या सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या खेळात केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागलीय हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. सदस्य देशांची संख्या सर्वात जास्त असलेल्या या वेगवान खेळामध्ये आपण पहिल्या शंभरात देखील नाही आहोत. सध्याचे मिशन फुटबॉलचे सामने पहात असताना मला काही वर्षांपूर्वी झालेल्या शालेय स्तरावरील 'पावसाळी क्रीडा स्पर्धे'ची आठवण झाली. मी त्यावेळेस रायगड जिल्ह्यातील पोलादपूर सारख्या दुर्गम अशा परिसरात शिक्षक म्हणून कार्यरत होतो.   शिकविण्याचे विषय विज्ञान व गणित असल्याकारणाणे खेळाशी फारसा संबंध येत नव्हता. परंतु क्रीडा स्पर्धांच्या वेळेस तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थी घेऊन जाण्याचे काम मी ब-याच वेळेस केले. त्या वर्षी पहिल्यांदाच केवळ जिल्हास्तरावर होणारी फुटबॉल स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात आली. फुटबॉलचा समावेश झाल्याने त्या खेळाचा सराव करणे गरजेचे होते. आमच्या विद्यार्थ्यांचा जोरदार सराव मैदानावर सुरू झाला. ऑफ तासाच्या वेळेस सहज लक्ष गेले असता, सर्व मुले फुटबॉलच्या मागे धावताना दिसली. जो आपल्या मना...

सामान्यांचे असामान्य टॉकीज

इमेज
(‘विलक्षण अनुभवांचे लिखित क्षण’- तुषार म्हात्रे)        अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा या आमच्यासारख्या सामान्य भारतीयाच्या मूलभूत गरजा. पहिल्या तीन गरजांपैकी एखादी अपूर्ण राहिली तरी चालेल पण ‘सिनेमा’ ही गरज पूर्ण व्हायलाच हवी हे नक्की. खोटं वाटत असेल तर खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये तल्लीन होऊन मोबाईलवर पायरेटेड सिनेमे पाहणाऱ्यांना विचारा. इतर प्रवासी दोन पायांवर सरळ उभे राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना भक्तीभावाने सिनेमे पाहणाऱ्यांना आठवा. पोटात भूक, कपडे विस्कटलेले आणि उभे राहण्यासाठीही जागा नसताना चित्रपटाचा आनंद घेतला जाणे ही बाब चित्रपटाला मूलभूत गरजांमध्येच नेऊन ठेवते. संपूर्ण जग या सिनेमांच्या प्रेमात पडला असताना मी सुद्धा त्याला कसा अपवाद असेन? टी.व्ही, लॅपटॉप, मोबाईल, टॉकीज; शक्य होईल त्या मार्गाने मी माझी चित्रपट पाहण्याची हौस भागवत आलो आहे. माझ्या सिनेमॅटीक आठवणींमध्ये महाडच्या एका टॉकीजचे नाव चोवीस कॅरेट सुवर्णाक्षरांनी लिहलं जाईल. मी नोकरीच्या सुरूवातीच्या काळात पोलादपूर येथे वास्तव्यास होतो. रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पोलादपूर ...

मातीतून भरारी घेणारा फिनीक्स

इमेज
नदाल पुन्हा जिंकला. यावेळेस हार्डकोर्टवर त्याने बाजी मारली. एखाद्या अव्वल मानांकीत खेळाडूने अमेरिकन ओपनसारख्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे ही काही विशेष बाब नाही. पण ही कामगिरी जेव्हा ‘राफा’ करतो तेव्हा माझ्यासारख्या चाहत्यांसाठी ती विशेष बाबच ठरते. या विजयासह 31 वर्षीय नदालने आपल्या कारकिर्दीतले 16वे ग्रँडस्लॅम पदक मिळवले. राफेल नदाल परेरा म्हणजेच राफा हा क्रीडासंस्कृती जोपासलेल्या स्पेन या लहानशा देशाचा टेनिसपट्टू, पण त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खेळामुळे संपूर्ण जगभर त्याचा चाहतावर्ग अाहे. 2005 साली एका वृत्तवाहिनीवर उपांत्य सामन्यात रॉजर फेडररला  हरवून पुढे फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या नदालची बातमी पाहिली. मानेवर रूळणारे लांब केस, उंच आणि शीडशीडीत शरीरयष्टीचा एक किशोरवयीन मुलगा रॅकेट उंचावून आनंद व्यक्त करत होता.  तेव्हापासून आजतागायत याच पद्धतीने दोन्ही हात उंचावून आनंद व्यक्त करताना त्याला पाहतोय.  काय आहे राफामध्ये ज्यामुळे त्याचे चाहते कामधंदे सोडून खेळ पाहण्यासाठी टी.व्ही. समोर बसतो? इतकं काय विशेष आहे त्याच्या खेळात? टेनिस खेळण्यासाठी महत्त्वपूर...

दैवी अनुभूती

इमेज
    संध्याकाळच्या 4.53 च्या वसई-पनवेल पॅसेंजरने प्रवास करत होतो. बसायला सीट न मिळाल्याने एका कोपऱ्यात आधाराला टेकून उभा राहिलो. संध्याकाळचे 5 वाजले तरी वातावरण तापलेलेच होते. मोबाईल आणि मी दोघांचीही बॅटरी उतरू लागली होती. डिसचार्ज होण्याच्या भितीने मोबाईल वापरता येत नसल्याने ऑक्सिजनचा साठा संपत आल्याचा फील येत होता. हातातील घड्याळाकडे वैतागाने पहात घरी वेळेत पोचण्याचे गणित आजमावत होतो. इतक्यात ‘चढता सुरज...’ या सुरेख कव्वालीचे सुंदर संगित कानी पडले.एका दुसऱ्या डब्ब्यातून व्हायोलीनचा मधुर आवाज येऊ लागला. मी उत्सुकतेने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक 20 ते 22 वर्षाचा मुलगा हातात व्हायोलीन पकडून या अप्रतिम कव्वालीचे अत्यंत कठीण पण सुरेख स्वर लीलया काढत होता. मी त्याला या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच पहात होतो. सुमारे 7 मिनीटांची ही कव्वाली त्याने जशीच्या-तशी वाजवली. या दरम्यान मला सीट न मिळाल्याचे दु:ख मी विसरून गेलो. एक गाणं संपल्यानंतर त्याने प्रवाशांकडे पैशांसाठी हात पसरला, एक-दोन रूपये, पाच रूपये असे पैसे लोक देऊ लागले. माझ्या हातून पैसे फार कमी वेळा सुटतात, तरीही मी स्व:खुशीने द...

मी आणि माझे गुरूजी

मी आणि माझे गुरूजी आयुष्यातला शाळेत जाण्याचा पहिलाच प्रसंग. हातात दगडी पाटी, पेन्सिलला मोडून शर्टाच्या खिशात ठेवलेले दोन तुकडे अशा तुटपुंज्या साहित्यासह पहिलीच्या वर्गात दाखल झालो. ज्या हॉलमध्ये दोन वर्ग बसवले होते त्याच वर्गात तोंडं एका दिशेला फिरवून प्रार्थना सुरू झाली. राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञेसाठी हात पुढे करण्याची सूचना मिळाली. इतरांकडे पाहून हात पुढे केला. ‘भारत माझा देश आहे’ अशी सुरूवात झाली आणि का कुणास ठाऊक मला नाव नोंदणीसाठी शाळेत आल्याचा दिवस आठवला. नाव नोंदणीच्या दिवशी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा नाही हे ओळखण्यासाठी तिथल्या गुरूजींनी मला उजवा हात डोक्यावरून घेऊन डाव्या कानावर पोहोचवण्यास सांगीतले होते. या कृतीची मला आठवण झाली आणि मी प्रतिज्ञेला पुढे केलेला हात डोक्यावरून डाव्या कानाला लावला. माझा हात कानावर पोचतो न पोचतो तोच पाठीमागून लाकडी रूळाचा हलकासा फटका माझ्या पाठीवर बसला. मागे वळून पाहीले तर राष्ट्रगीताच्या वेळेस पेटी वाजवणारे लाल डोळ्यांचे शीडशिडीत गुरूजी डोळे वासून माझ्याकडे पहात होते. पहिल्याच दिवसाचे असे जोरदार स्वागत पाहून माझ्या डोळ्यांतून पाणी वाहू लागल...