कॅच मी इफ यू कॅन!

कॅच मी इफ यू कॅन! जेमतेम विशीचा वाटणारा ‘फ्रँक अबॅग्नेल’ नावाचा एक उमदा तरूण, ज्याच्या मागावर युरोप-अमेरिकेतील पोलीस आहेत. फसवणुकीचे कित्येक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. पोलीसांनी त्याच्यासाठी रचलेल्या सापळ्यात प्रवेश करतो आणि सर्वांदेखत आपला कार्यभाग उरकून अलगदपणे निसटूनही जातो. आधी पुस्तकरुपात आणि पुढे चित्रपटाद्वारे गाजलेल्या सत्यकथेतील हा प्रसंग. इकडे मुंबई-रायगडच्या खाडीलगत काही लोक मासेमारी करण्यासाठी गळ टाकून बसले आहेत. थोड्या वेळाने पाण्यात थोडी हालचाल जाणवते. गळ काढून पाहील्यानंतर त्याला लावलेले आमिष खाऊन मासा पसार झाल्याचे समजते. या परिसरात वेळ घालवण्यासाठी किंवा पोटापाण्यासाठी गळ टाकून मासेमारी करणाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच घडणाऱ्या मत्स्यकथेतील हा दुसरा प्रसंग. या दोन्ही प्रसंगांतील कथानायक देखणे आहेत, चलाख आहेत. एका कथेचा नायक आहे पडद्यावर आकर्षक वावर असणारा लिओनार्डो डी कॅप्रियो, तर दुसऱ्याचा आहे पाण्यावर आकर्षक वावर असणारा ‘टार्गेट फिश’. दोघेही आपल्या कृतीतून म्हणतात, “Catch me if yo...