शोले आणि ‘सांभा’ दगड

शोले आणि ‘सांभा’ दगड ‘शोले’ चित्रपट रिलीज होऊन यंदा पन्नास वर्षे झाली. इतक्या वर्षानंतरही चित्रपट रसिकांमध्ये शोलेची जादू अजूनही कायम आहे. त्यातील दृश्ये, संवाद, गाणी अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. यातील केवळ मुख्य कलाकारच नव्हे, तर अगदी लहानात लहान भूमिका करणारेही तितकेच गाजलेत. तुम्हाला “कितने आदमी थे?” असे म्हणत हातातला पट्टा दगडांवर घासत चालणारा गब्बर आठवत असेलच. गब्बरच्या जोडीला “अरे ओ सांभा!” असा आवाज दिल्यानंतर भल्या मोठ्या दगडावर नेम धरून बसलेला “जी सरदार!” म्हणनारा ‘सांभा’ही डोळ्यांसमोर येत असेल. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या आणि गब्बर कमाई करणाऱ्या या चित्रपटातल्या दगडांची कथाही तितकीच मनोरंजक आहे. गेली पन्नास वर्षे ‘सांभा’ ज्या राखाडी रंगाच्या दगडांवर बसून गब्बरला उत्तरे देतोय, ज्या दगडांवर ‘जब तक है जान’ म्हणणाऱ्या बसंतीची पावले थिरकलीत, ते दगड तब्बल अडीचशे ते तिनशे कोटी वर्षांपासून तिथे उभे आहेत. बेंगलुरूजवळच्या रामनगरा जिल्ह्यातील हे दगड ‘रामनगर खडक’ याच नावाने ओळखले जातात. याच ...