Posts

Showing posts from January, 2024

वानंचा बाव

Image
    नवी मुंबई परिसरातल्या अजूनही गावपण टिकवून ठेवलेल्या गावांमध्ये अशी हाळी कानी पडली की मासेखाऊ मंडळींचे कान टवकारले जातात. कारण विक्रेत्याचा हा आवाज म्हणजे ताजी मासळी मिळण्याची खात्री. खाडीतील लहान मोठे ताजे मासे या मासे विक्रेत्यांकडे असतात. या हाळीतील ‘बांव’ म्हणजे मच्छी, पण  यातील ‘वाना’ म्हणजे काय? वाण, वान किंवा वाना हा नक्की काय प्रकार आहे?        खरंतर मासेमारी हा मानवाचा फार पुरातन काळापासून चालत आलेला एक व्यवसाय आहे. आदिमानव अन्न मिळविण्यासाठी इतर प्राण्यांच्या शिकारीबरोबरच नदी, समुद्रातील माशांची शिकार करायचा. जाळे टाकून मासे पकडणे, भाल्याने मासे मारणे  किंवा गळ टाकून मासे पकडणे याची माहिती मानवाला बऱ्याच आधीच्या काळापासून असावी. ईजिप्तमध्येही प्राचीन काळापासून मासेमारी होत होती, असे काही प्राचीन शिलाचित्रांवरून दिसून येते. भारतात अंदाजे चार हजार वर्षांपूर्वीच्या काळातही मासेमारी अस्तित्वात होती, असे सिंधू खोऱ्यातील मोहेंजोदडो येथील उत्खननात आढळले आहे. इथे भाजलेल्या तांबड्या मातीच्या भांड्यावर महसीरसारख्या माशांची व ते पकडण्यासाठी वापर...