प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव

प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव ! पोलादपूर! रायगडचे दक्षिण टोक. राजधानी रायगड, शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा प्रतापगड आणि इतर लहानमोठ्या गडकोटांनी वेढलेला हा परिसर. इतर सर्वसामान्य गावांप्रमाणे इथल्या गावांनाही नवरात्रोत्सवाचे आकर्षण आहे. इथेही आश्विन महीन्याच्या प्रारंभी घराघरात घटस्थापना होते, गावोगावच्या मातेच्या मंदिरांमध्ये उत्साह, नवचैतन्य निर्माण होतो. ‘गरबा-रास-दांडीया’च्या आकर्षक चक्रात पोलादपूरही फेर घेतो. पण त्याचबरोबर या उत्सवादरम्यान ही फेर धरणारी पाऊले मोठ्या संख्येने महाबळेश्वर घाटाच्या दिशेने वळतात. या मार्गातील प्रतापगडावरील नवरात्रौत्सवासाठी महाड व पोलादपूर येथील भाविक वर्षानुवर्षे येत असतात. एकाअर्थी सातारा आणि रायगड जिल्ह्यांना सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारा हा उत्सव. ज्या भवानी मातेच्या नावाने गडावर नवरात्रौत्सव साजरा होतो, त्या देवीच्या स्थापनेमागचा इतिहासही रंजक आहे. तुळजापूरची भवानी माता ही शिवाजी महाराजांची म्हणजेच भोसले घराण्याची कुलदेवता. त्याकाळी तुळजाभवानी मंदिर परिसरावर आदिलशाही सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ सा...