उकळणारे दगड

‘उकळणारे दगड’ गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगाला ज्याची तिव्रतेने गरज भासली असा घटक म्हणजे ‘ऑक्सीजन’. हवेतील उपलब्ध ऑक्सीजन पुरेशा स्वरूपात मिळवू न शकणाऱ्या कोविडबाधित रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत. हवेतून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळविण्याच्या काही पद्धतींपैकी ’निवडक अधिशोषण (Selective Adsorption)’ ही एक चांगली पद्धत आहे. सुप्रसिद्ध ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ यंत्रांमध्ये हे तंत्र वापरले जाते. यात हवेसारख्या वायूंचे मिश्रण एका विशिष्ट खनिजापासून बनवलेल्या पृष्ठाच्या पात्रामधून सोडले जाते. हा खास पृष्ठभाग नायट्रोजन शोषतो. त्यामुळे या पात्रामधून जो वायू बाहेर पडतो त्यामध्ये आधीच्या तुलनेत जास्त ऑक्सिजन असते. हा पृष्ठभाग ज्या खनिजापासून बनवला जातो ती खनिजे तुम्हाला अक्षरश: रस्त्यावर सापडतील. पनवेल परीसरात राहणाऱ्यांना ही खनिजे पहायची असल्यास राष्ट्रीय महामार्ग-४बी लगत ‘डोंबाला कॉलेज’ प्रवेशद्वाराजवळील एका मोकळ्या भूखंडावर पहायला मिळतील. इथे भरावासाठी अंथरलेल्या दगडांमध्ये काचेसारखे चमकणारे स्फटीकदगड स...