‘वेस्टर्न’ मार्गातील देशी संस्कृती!

विरारच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये “ पुढील स्टेशन...अगला स्टेशन... नेक्स्ट स्टेशन...” असा तिहेरी पुकारा झाल्यानंतर एक नवखा प्रवासी “प्लॅटफॉर्म कौनसे बाजू में आयेगा?” म्हणून विचारणा करतो. “इस साईड में आयेगा लेकीन उस साईड में खडे रहना” एकदा डाव्या बाजूकडे हात दाखवून उजव्या बाजूकडे पहात अनुभवी प्रवासी उत्तर देतो. आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर आणत नवखा प्रवासी ज्या बाजूला उतरायचे असते त्याच्या विरूद्ध दारात उभा राहतो. अखेर ‘अगला स्टेशन’ येते, गाडीचा वेग कमी होऊन थांबण्याआधीच आणि आतील उतारू उतरण्यापूर्वीच काही चढारू ( उतरणारे : उतारू : : चढणारे : चढारू ) धसमुसळेपणाने चढत राहतात. जागा अडवण्यासाठी धडपड करतात. त्यांची चढाई संपून आता गाडी सुटण्याच्या मार्गावर असते. हा नवा अनुभव शिकलेले नवखे प्रवासी आणि या अनुभवात शेकलेले जुने प्रवासी शांतपणे ‘पायदान आणि फलाटामधील अंतर’ मोजत उतरतात. ज्या बाजूला उतरायचे असते त्याच्या विरूद्ध दिशेला उभे राहण्याचा धडा शिकवणारे हे स्टेशन म्हणजे ‘नालासोपारा’. असे वैशिष्ट्य असणारे बहुधा जगातील एकमेव स्टेशन. रेल्व...