विजयाची घंटा!
विजयाची घंटा! रायगड जिल्ह्यातील सरसगडाच्या पायथ्याशी असलेले अष्टविनायकांपैकी एक देवस्थान म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर. येथून जवळच्या सुधागडावरील एक श्रद्धास्थान भोराईदेवी. अलिबागजवळील प्राचिन कनकेश्वर आणि श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर; रायगड जिल्ह्यातील ही सर्व सुप्रसिद्ध श्रीक्षेत्रे. यापैकी पाली, हरिहरेश्वर आणि कनकेश्वर ही क्षेत्रे तशी नेहमीच भक्तांनी गजबजलेली. गणेश, शिव, हरिहर आणि शक्ती यांसारखी उपास्य देवतांमध्ये विविधता असणाऱ्या ही स्थाने. या चार वेगवेगळ्या देवस्थानांची एकत्रितपणे चर्चा करण्यासारखे काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे, जी या मंदिरांना एका समान धाग्याने जोडते? या सर्व क्षेत्रांतील समान गोष्ट म्हणजे या मंदिरांतील घंटा! “आगमनार्थ तु देवानां, गमनार्थ तु राक्षसाम। कुरू घंटे रवं तत्र देवताहा न लक्षणम।।” अर्थात ‘हे घंटे, देवतांच्या आगमनासाठी आणि असुरांना पळवून लावण्यासाठी, तू देवतांना पुकारणारा नाद कर!’ असे घंटेच्या बाबतीत म्हटले जाते. घंटा ही हिंदू, जैन, ख्रिश्चन या धर्मात विशेष महत्त्व असणारी वस्तू. सर्वसाधारणपणे मंदिरांच्या प्रवेशद्वार...