Posts

Showing posts from December, 2020

कोई मिल गया

Image
    निळसर रंग आणि शरीराच्या तुलनेने मोठे डोके अशी वेगळीच रचना असलेले ‘जादू’ नावाचे पात्र आठवत असेल. परग्रहावरून आलेल्या  जीवाभोवती फिरणारी सायन्स फिक्शन प्रकारातील ‘कोई मिल गया’ या चित्रपटाची ही कथा. हृतिक रोशनच्या अभिनय कौशल्याला आणि प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा हा चित्रपट. ‘जादू’ असे नामकरण केलेला परग्रहावरील एक जीव आणि त्यामुळे घडणाऱ्या घटनांभोवती फिरणारे हे कथानक. चित्रपटात या अनोळखी प्राण्याला पाहून लोकांच्या मनात कुतूहल, भिती, आकर्षण अशा संमिश्र भावना निर्माण होत असल्याचे प्रसंग रंगवलेले आहेत. ‘Reel Life’ मधील या प्रसंगाशी साम्य असणारी ‘Real Life’ मधील घटना मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीवर घडून आली. फरक इतकाच की इथे हा अपरिचित जीव परग्रहावरील नसून आपल्या पृथ्वीतलावरीलच होता.          महाराष्ट्रात गेल्यावर्षी  साधारणत: ३० ते ४० मीटर खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर बोटीच्या जाळ्यात एक काळ्या रंगाचा मासा अडकला. या अपरिचित माशाला पाहून इथल्या मच्छिमारांवर “कोई मिल गया” असेच म्हणायची वेळ आली. मच्छिमारांसाठी अनोळखी असणारा हा ज...