ऐ ‘ईल’ है मुश्किल

ऐ ‘ईल’ है मुश्किल... “ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ ज़रा हट के, ज़रा बच के ये है बॉम्बे मेरी जान!” ओ.पी. नय्यरजींच्या जादुई संगीताने सजलेले हे गीत. सहा दशकांहूनही अधिक काळ उलटून देखिल या गीताचा गोडवा कमी झाला नाही किंवा मजरूह सुल्तानपुरींनी वर्णन केलेली मुंबईची स्थिती बदलली नाही. मोठमोठ्या इमारती, भरधाव वाहने आणि कंपन्यांच्या गजबजाटातील मुंबईकरांचे जीवन अजूनही ‘मुश्किल’च आहे. Indian Shortfin Eel ) या नावाने प्रसिद्ध असणारा हा सापासारखा भासणारा मासा. या प्राण्याचे शास्त्रीय नाव अँग्विला बायकलर पॅसीफीया ( Anguilla bicolor pacifica ). मुंबईच्या वास्तवदर्शी गाण्यातील “ इक चीज़ के है कई नाम यहाँ ” ही ओळ शब्दश: खरी करणारा हा प्राणी मुन्हेर, मुनेर, मुनेट, मुलेट, रातेलका या वेगवेगळ्या स्थानिक नावांने ओळखला जातो. समुद्राने वेढलेल्या या बेटांवर माणसालाच राहणे कठीण असताना इतर जीवांचा विचार कोण करेल? त्यातच ज्या प्राण्याचा प्रत्यक्षात आपल्याला काहीच उपयोग नाही, त्याच्या संरक्षणाची अपेक्षा बाळगणे म्हणजे विरार लोकलमध्ये विंडोसीट मिळण्याची अपेक्ष...