निर्मात्याच्या शोधात

‘ निर्मात्याच्या शोधात’ नेहमीची वर्दळ पार करत नालासोपारा रेल्वे उड्डाणपुलावरून पश्चिमेच्या ‘शूर्पारक’ नगरीत म्हणजेच सोपारा गावात दाखल झालो. इच्छित स्थळाकडे जाण्याऐवजी विरारच्या दिशेकडे मार्गक्रमण केले. विष्णूमूर्ती- बोळींज बोळींज गावातील एका वृक्षाखाली उभी असलेली एक कोरीव विष्णूमूर्ती, केवळ आयुधांच्या जागेत बदल असणारी करमाळे येथील तलावात सापडलेली व सध्या सुरक्षित छप्पराखाली असणारी आणखी एक विष्णूमूर्ती पाहीली आणि पुन्हा सोपाऱ्याच्या दिशेने निघालो. विष्णूमूर्ती- करमाळे सृष्टीकर्त्या ब्रम्हालाही हेवा वाटेल असे टुमदार बंगले आणि सभाेवतालच्या हिरवळीने नटलेला हा मार्ग. नालासोपाऱ्याच्या पूर्वेला जमिनीसह आकाशातही जागा व्यापणाऱ्या गच्च इमारती तर पश्चिमेला इमारतींबरोबरच गावपण टिकवून ठेवलेल्या वाड्या आहेत. दोन्ही बाजूकडील लोकवस्त्यांमध्ये जमिन अस्मानाचं अंतर. याच मार्गाने पुढे जात एका लहानशा विहीरीला वळसा घालून तलावाजवळील ‘ चक्रेश्वर महादेव ’ मंदिराजवळ पोहोचलो. प्राचीन शुर्पारक नगरीतील चक्रतीर्थ ...