नमक-हराम

“डबल फोर्टीफाईड- आयोडीनयुक्त, सबसे शुद्ध नमक!” अशी जाहीरात आपण मोठ्या आवाजात आणि वारंवार टी.व्ही.वर पहात-ऐकत आलो आहोत. अायोडीनयुक्त मीठ खाल्ल्याचे होणारे विविध फायदे कंटाळवाण्या सरकारी जाहिरातींपासून ते मीठ उत्पादक कंपन्यांच्या झकपक जाहिरांतीत आपल्या मनावर ठसवले जातात. आपल्या घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर ‘आयोडीनयुक्त मीठ’ , असे लिहिलेले दिसेल. आयोडीन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉइड ग्रंथीमध्ये या आयोडीनपासून थायरॉक्सीन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे विविध आजार होतात हे माहित असल्यानेे आयोडीनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा जादा पुरवठा केला जातो. या सर्व बाबी सत्य असल्या तरी ‘आयोडीनयुक्त मीठाची’ दुसरी खारट बाजू पाहूया. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ वा खाद्य तेल यांचा वापर करता येतो. त्यामुळे १ किलो मिठात सुमारे १५ ते ३० मि. ग्रॅ. या प्रमा...