ग्लोबल वॉर्मिंगची ढोबळ वॉर्निंग

‘ग्लोबल वॉर्मिंगची ढोबळ वॉर्निंग’ गेल्या 5 जून रोजी सगळीकडे ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा झाला. तसा तो प्रतिवर्षी होतच असतो. 2014 साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिनी’ आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रांमध्ये पर्यावरणविरोधी घटकांविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असा सूर साऱ्याच तज्ज्ञांनी लावला. वातावरणातील बदल रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सागरपातळी वाढत असून, त्यामुळे लहान बेटांना धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविरोधी घटकांमुळेच पूर, दुष्काळ, चक्रीवादळ इ. संकटे निर्माण होत आहेत, अशी चर्चा या चर्चासत्रांमध्ये होती. ‘ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील बदल’ या फार मोठय़ा जागतिक समस्या झाल्या आहेत. लहान बेट असलेल्या ५२ देशांना हरितगृह वायू उत्सर्जनाच्या वाढीमुळे धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिली.लहान बेटे असलेल्या ग्रेनेडा, मालदीव आणि मार्शल या देशांचे प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते. वरील बातमीच्या अनुषंगाने नुसतं ‘पर्यावरण’ हा श...